शुक्रवार, २८ डिसेंबर, २००७

परिघ....

प्रत्येकालाच असते...
स्वप्नांनी व्यापलेल
भावनांनी साठलेलं
आपलं अस परिघ..........
पण शुन्यही पण गोल असतो
त्यालही परिघ असतेच ना?...
त्याचा नेमका अर्थ काय?
हे कुणालाच ठाउक नसते
सारा बहुदा शुन्याचा खेळ
शुन्याने शुन्याला गुणायचं
अन शुन्य म्हणुनच उरायच...
का दिवसेंदिवस व्यापत जाणार्‍या
त्या परिघात हरवायच?
...स्नेहा

Bye Bye 2007

नविन वर्ष... आता नाही म्हणता म्हणता नवीन वर्ष उजाडतय.... २००७ ने बरच काही हिसकावुन घेतल... बरीच नवीन वळण दाखवली... आयुष्य असही असत ह्याची जाणिव करुन दिली... या वर्षात खुप काही हरवल मी आयुष्यातल... माझी आई सुद्धा... पण नव्याने जगवायला लावणार २००८ समोर दत्त म्हणुन उभ आहे... काय गवसल आणी गमवल या विचारांपेक्षा आता काय करयच हे ह्याच वर्षात मी शिकले...या पुढे कधी हताश व्ह्यायच नाही हा येणार्‍या वर्षाचं रेझोल्युशन... या पुढे नवी स्वप्न नव्या दिशा स्वगतासाठी सज्ज झल्या आहेत... आकाशही निरभ्र पणे सज्ज होऊन माझ्या झेपेची वाट बघतय... ही नवी सुरुवात आहे नव्याने जगण्याची... नव्या वर्षाच स्वागत असो....

शनिवार, २२ डिसेंबर, २००७

हे हे हे..... :)

हे हे हे..... मी उद्या किंवा परवा पुण्यात येत आहे............... :) मनावरच मळभ निघुन गेलय... नुसत्या विचारांनी मन खुश होतय.... सही... खुप आनंद झालाय.. मन अचानक उड्या मारु लागलय.... तब्बल अडिच महिन्या नंतर माझ्या घरी जाणार मी...:)पवसाळ्यात कधी कधी खुप दाटुन येत... सगळ जग मरगळलेल वाटु लागत आणी..मग.. अचानक खुप दिवसानंतर सुर्यदेवाच दर्शन घडत... तसं काहीस वाटतय.... मी खरं सांगु मला कळत नाही मी काय लिहित आहे आणी का? पण खुप खुश आहे इतकच महिती आहे मनाला... सगळीच मरगळ निघुन गेली मनावरची... आता लक्ष ते पुण्याला जाणार्‍या गाडीवर... सो मित्र-मैत्रिणींनो भेटुया...

बुधवार, १९ डिसेंबर, २००७

कुजबुज

आठवतायेत ते स्पर्श
मुके पण खुप काही सांगणारे..
ते डोळे फ़क्त मला शोधणारे..
ती हाक मायेने गहिवरुन आलेली...
ती वाट...
जिथे तु माझी प्रतिक्षा करत असलेली..
ती वाट तिथेच आहे कदाचीत...
पण तिथे तुझे स्पर्श ..
तुझे भावनेने ओथंबलेले डोळे..
तुझे गहिरे शब्द
आणी तु...कोणीच उरलेल नाही...
नाही म्हणता म्हणता सगळच संपल
निमिषर्धान.....
एका हंबरड्यासह....
तो भयाण आवाज अन त्या नंतरची शांतता...
आजुनही कुजबुजते आहे कानात.....


स्नेहा

मंगळवार, १८ डिसेंबर, २००७

एक काटेरी मोरपीस...

का आठवतात नको त्या आठवणी...? बोचतात त्या मनात... छळ चालतो त्यांचा... कोण तो माझ काय त्याच्याशी घेणं देण? सगळ केव्हाच संपल आहे ... सुंदर दिसणार काटेरी स्वप्न होत ते॥ मी त्याला कधी ओळखलच नव्हतं... काटे दिसलेच नाही मला... जवळ घेतल गोंजारल.. हाताल बोचलेले काटेही कळले नाही.. नंतर दिसले ते फ़क्त रक्तबंबाळ झालेले हात ... हं वेडी मी त्याला तर काही झाल नाही ना म्हणुन त्याच्या जखमा शोधत बसले... आणी माझ्या हातावरच्या जखमा आधिकच खोल होत गेल्या मग... दोन वर्ष उलटुन गेली..ऽअजुनही सलतायेत त्या जखमा... पण आता वाटतय भावनाच बोथट झाल्या आहेत माझ्या... सवय झाली आता त्या जखमांची.. आत तोही मनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे .. मनाने तो कप्पा त्य जखमांसकट आजुन जपुन ठेवलाय .. एखाद्या मोरपीसासारखा .. पण हे मोरपीस काटेरी आहे हेहे न कळुन कस चालेल?... तरीही...


...स्नेहा

समांतर

समांतर चाललो आहोत दोघी
एकमेकांना भेटण्याच्या
खुळ्या प्रयत्नात..
चाचपडतं जुन्या खुना
शोधतोय कधी न घडलेला भुतकाळ
काटेदार वाटांवरुन चालताना
लागत आहेत अनुकुचीदार वळणं
आंधारात डोळे दिपतील इतका
सहन न होणारा प्रकाश झळकतो मद्येच
तरीही समांतर चाललो आहोत दोघी...
एकमेकांना भेटण्याच्या
खुळ्या प्रयत्नात..
...स्नेहा

सोमवार, १५ ऑक्टोबर, २००७

धुरकट झालेल्या वाटेवरुन...

धुरकट झालेल्या
वाटेवरुन चालत जाताना
कित्येक काटे पायात रुतले
रक्ताळलेले पाय झाले
तरिहि कुठलिच सल जाणवत नव्हती
धुरकट झालेल्या वाटेवरुन...

मद्येच वळणावर
फ़ुलासारखे दिसणारे
भासही होते फ़सवे
मन रेंगाळलं
पण पाय नाही थांबले तिथे
दुरकटलेल्या वाटेवरुन
दिसत होता तो सुर्य
लालबुंद सुर्य
तोही कधी ढगा आड लपलेला
छळ्च जणु चालु होता त्याचा
पण द्यास होता तो फ़क्त सुर्याचा
रक्ताळलेल्या पायांना
येणार्‍या प्रत्येक वळणाच काही नव्हत
सुर्या पर्यत पोहोचण इतकच
कय ते भान होतं
संपणार अस वाटणार अंतरही
फ़सवंच होत
पण ढगा आड तर कधि लखाखणार्‍या
सुर्याच तेज डोळ्यात होत..
धुरकट झालेल्या वाटेवरुन...

...स्नेहा

सोमवार, १ ऑक्टोबर, २००७

एक प्रवास ...............

कधी कधी कळतच नसत अपण नक्की काय करतोय आणि आपल्याला नक्की काय हवंय ते॥ कदाचीत महित असत नेमक काय हव आहे पण ते शक्य नसत...स्वतःहा शिवाय कोणाचीच मर्जी शामील नसते त्यात॥ आणी कदाचित हीत दुसर्‍याच ऐकण्यात असत... पण मनाला कोण समजावणार? शेवटी मनाचे हट्ट न पुरवता मना विरुध्द जायच... काय चालु आहे हे? का पटत नाही मनाला? आता मी नाही हट्ट पुरवणार मनाचे.... जे आहे त्याच्या समोरे जायची ताकद आहे त्यात... आणी काय वाईट आहे मुंबईत? मला जायचच होत ना कधी ना कधी? का ऐकत नाही मन? आता प्रॅक्टीकल व्हावचं लागेल मग एवढा झगडा कशा साठी?पुण्यात कोण आहे आता? हाच असतो सगळ्यांचा प्रश्न....पुणं... काय दिल पुण्यानं? याचा हिशोब न लावलेला बरा... पण ते सोडवत नाही हे नक्की... खुप आठवणी आहेत.. चुटकीभरच का होइना पण माझ बालपण जगले मी इथे... यश अपयश यातुन तालुन सुलाखुन निघाले... अनेक नाती जोडली गेली... सख्ख्या पेक्षा जवळची नाती... माझे बाबा सुध्धा इथेच मिळाले मला हे विसरुन कस चालेल?नाटक... बालगंर्धवचा पुल... भरत.. गरवारे.. आणी अशी असंख्य ठिकाणं... आणि मुख्य म्हणजे माझं घर.... आणी माझी आई.. घरात अजुनही आईच अस्तित्व जाणवत.. आता... सुटणारी ट्रेन दिसते.. आणी नजरेस ठिपका होत जाणार पुणं.. मनामद्ये अजुनच सामवत जात... जणु सगळ मी बरोबर घेउन चाललेय ...मुंबईत जाताना एक अशा आहे की माझ जग असलेले मझे बाबा मुंबईत येत आहेत कधी माहित नसल तरी येणार म्हणुन का होइना थोड सोप्प जाइन...पुण्याला अल्विदा म्हणवत नाही त्यामुळे शक्य तितकं पुणं सोबत घेउन चाललेय.. कदाचीत पुण्याशी नाळ तुटतेय.. नव्या जगात जाण्या करिता... पण परतुन येण्याची इछ्छा आहे.. करण इथे मिळ्नारा विसावा आईच्या कुशीत आल्याचा भास कुठेच मिळनार नाही.. आणी पुण्याशी नाळ तुटली तरी नात कधीच तुटणार नाही..
तु खुप दीलस... घेतलस.. मी इथे किती मिळवल किती गमावल इतकी हिशोबी नव्हते पन तरिही मला खुप आठवणी आणी मुख्य माझे बाबा दिलेस.. त्या करिता शतशः प्रणाम...

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २००७

शोध स्वतःहाचा .....

आज काल मला एक नवं खुळं लागलं . पण ते नक्की खुळं आहे की काळाची गरज हे उमगलं नव्हतं . आता वाटते आहे की हे गरजेतुन निर्माण झालेल खुळं असावं .... परिस्तीतीने मांङलेल्या डावात नेमके नको असलेले पत्ते येतात अन् केवळ डाव मोड़ता येत नाही म्हणुन आहे त्या पत्यात डाव जिंकायाचा ..पण त्यासाठी सोबत लागतेच.. सोबत स्वतःहालाच स्वतःहाची.. मग आपण आपल्याला शोधण्याचा खुळा(?) प्रयत्न सुरु होतो... मग आपण आपल्याला नव्याने सापडायला लागतो... :) मग कळत हार जित नाम कि चीज है ? ;) सगळच क्षणभंगुर... त्यात खर तर आपणच जिंकतो कारण आपण आपल्याला सापडतो कायमचेच... कदाचीत कधी न हरवण्या करीता .. माझाही शोध चालू आहे शोध स्वतःहाचा .....

उमेद

सकाळ्चे ६.३० वाजले असतील मी कल्याण स्टेशनवर होते. पुण्याल निघालेले. भोवतालची गर्दी, आवाज या वरुन आख्खी मुंबईच जागी झाली आहे असं वाटल... (पुण्याची आहे अस वाटण साहजीक आहे). या मुंबईकरांना पहील की आठ्वत ते घड्याळ, यांची आयुष्य घड्याळाला बांधलेली हे अचुक विधान आहे. पण क्षणभर एक विचार डोकावुन गेला... ही माणसं आहेत का मशीनस? नुसती धावतायेत... मग स्वतःहालाच म्हणाले काय हे स्नेहा इतका नकारार्थी विचार? आधी मुंबई खुप वेग़ळी वाटायची...स्वप्नाळु...ती स्वप्न पुर्ण करायची ताकद .. पुर्ण पडेल ते कष्ट सोसण्याची मुंबईच द्यायची.. देते.. मग अचानक असं का वाटवे मला? क्षणभर भितीच वाटली. आई गेल्यापासुन मन शुन्य झालेल पण भावनाही अश्या प्रतीत होतील? खुप कससं झाल... तितक्यात एका माणसाचा धक्का लागला.. तशी विचारांतुन झागी झाले(?)(भानावर आले असे नाही म्हणता येणार) सोबत मवशी काका होते.. त्यांच्याकडे बघत स्वतहाशीच हसले अन सहजच लक्ष उजवी कडील जिन्याकडे गेल... वारुळातुन मुंग्या बाहेर पडाव्यात तशी ती माणसं वाटत होती. माझ लक्ष वेधल ते त्या मुलाने.. जिन्याच्या एका कोपर्‍यात मस्त ताणुन दिली होती त्याने.... प्लॅटफ़ॉर्म वरील ती ग़जबज मद्येच येणार्‍या सुचना, आजुबाजुचा गोंधळ मद्येच च्याय आलेय अश्या तत्सम आरोळ्या…लोकांचे धक्के कशाचही भान न ठेवता तो शांत झोपला होता तो खर सांगु त्याला लहान नाही म्हणवत, त्याच्या वयाशिवाय त्याच्या आयुष्यात काहीच लहान नसाव... खुप थकला असेल नाही तो? खुप कामं केली असतील. म्हणुन तर एवढा गाढ झोपला आहे..ख़ाय हे? मी कुठेय? कसला त्रास आहे मला?किती तरी दिवस झाले मि झोपुच शकत नव्हते. ज़्होपेच्या गोळ्या हाच एक शेवटचा पर्याय पण त्या नाही घ्यायचा हा वेडा हट्ट.. त्या मुलाने आपल्या खुप वेगळ जग पाहील आहे ..आपल्या पेक्षा वेगळ.. रोज उठायच नव्या दिवसासोबत एकच स्वप्न अंगी बाळगुन की जगायच आहे... अजुन काय असणार त्याच आयुष्य? तितक्यात मावशी म्हणाली स्नेहा चल गाडी आली...मी फ़क्त शरीराने गाडीत चढले मन मात्र तिथेच रेंगाळत होते..

मना मद्ये नवे(?) प्रश्न होते.. माणसाला नसल्याच दुःख जास्त की असुन नसल्याच? का काही हरवल्याच?मनात नुसतेच प्रश्न आणी तो

शनिवार, ७ जुलै, २००७

सगळच एक स्वप्ना सारख वाटत
भिजवणारा पाउस
आणि त्याच्या सोबत आणिक भिजवणारी
तुझी नजर..
सगळच हवहवस
खरं पण अर्धवट राहिलेलं स्वप्न..
गोड स्वप्न...
नको आता त्याच पुर्ण होण
हसाल माझ्यावर
पण खरचं
त्या अपुर्णतेत अनामिक सुख आहे
मला सापडलेला फ़क्त माझाच पाउस आहे
पावसाच येण निश्चीत नसतं
जाणही...
तो फ़क्त येतो...
एकदाच...
पण त्याच तेच थेम्ब परत मिळत नाहि...
तसे ते क्षणही
परत गवसत नाही
उरते ती फ़क्त एक भिजरी आठवण..
मनात कोसळत राहणार्‍या पावसासह...
...स्नेहा

मंगळवार, २६ जून, २००७

उगाच का भावानांना उसणा बांध घालायचा?

सारा खेळ.. नियतीचा
अस म्हणुन भावनेंवर बांध घालायचे
अता असाच चालायच सगळ
म्हणुन पुढे जात राहायचे
मागे वळण्याची तिथे मुभा नसते
थांबण जगाला अन वेळेला मान्य नसते...
मनाला मत्र यतले काहीच पटत नसते...
मग खेचाखेच होते स्वतहाचीच
भांडण होत मनाचच मनाशी
वेळेशिवाय याला काहीच उपाय नसतो अस म्हणतात..
पण वेळही काय करणार बापडी?
मनालाच सार्‍याची सवय होणार..
मग किती सांभाळायचे स्वतहाला?
का बांध घालायचे भावनांना?
होउन देत ना सगळ मोकळ...
कोलमडलेल्या घराच्या भिंती सांभाळतबसण्यापेक्षा...
असवान्च्या प्रवाहात वाहुदेत ना सगळ...
मग यालाही नियतीचा खेळ म्हणायचा
उगाच का भावानांना उसणा बांध घालायचा?

...स्नेहा

गुरुवार, १४ जून, २००७

ती आई होती म्हणोनी..

कुठुन सुरुवात करावी? असा प्रश्न मला क्वचित पडायचा पण आज खरच सुचत नाहिये सुरुवात कुठुन करावी? प्रश्न प्रश्न प्रश? की सगळ्याचि उत्तर सापडल्याच एक निराळच दुःख....? खुप भल मोठ वादळ कि त्या नंतर्ची भयान शांतता? काहिच सुचत नाहिये.. वाटय कुठल्याश्या प्रवाहामद्ये नुसतच वहण होतयं, जगण्यापेक्ष नुसतच श्वास घेण चालु आहे (तेही थांबवण हातात नाही म्हणुन) सगळचं विक्षिप्त... ती.. तिचा चेहरा डोळ्या समोरुन जात नाही... त्या वेदना.. ते ओरडण.. ते हताश होणं.. तो चेहर्‍यावरचा थकवा.. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न... ते वेदनेमुळे असह्य अन मोठे झालेले डोळे.. तो तास कसा गेला हे कळलच नाही.. सार काही अनपेक्षीत होत.. माझी सारी धड्पड..तिला बर वाटव म्हणुन होती... पण अचानक तीच बेशुध्द होण मला सहन झाल नाही आणी मी आई म्हणुन जो काहिई हम्बरडा फ़ोडला...ते मला आथवातही नाही मी कितिवेळ्तिला हाक मारत होते... मी त्या वेई कदाचीत पहीयांदाच इतक्या मनापासुन तीला हाक मरलि आसवी.............................
'आई' या शब्दात कितीस आणि काय काय दडलय? हे आइ असतान कधीच नाही उमगलं.. ती गेली.. नुसतीच्गेली नाही तर बरंच्काही घेउन गेली.. बरच काही.. अगदी वर्तमानात आणि भविष्यातले शब्धही.. त्या शब्दांपाठच्या भावना अन्खुपसं जे अव्यक्त्य आहे.. आत रोजच्या वापरातली बरीचशि वाक्यही पुसली गेली ''आई! अगं तुला ना काहीच कस गं कळत नाही?'' ''आई.. खुप भुक लगली आहे'' ''आई सारखी सारखी का बाहेर जातेस?'' ''अग. उन्हात भटकत जाउ नकोस.. आई आई आई...... आई! आता ही हाक ऐकणार कोणीच नाहि पण तरीही मन अजुन तिलाच साद घाल्तय.. खरं तर तिच्या शिवाय मला 'माझं' अस म्हणणार कोणीच नव्हत. ती नसण्याने आता जी पोकळी निर्माण झाली आहे.. नव्हे सर आयुष्यच रितं झालय.. मातीत मुळ घट्ट रोवुन उभ राहिलेलं झाड आचानक आलेल्या वाद्ळाने कोल्मडुन पडत अन मग कुठलुआश्या प्रवाहात हेंद्काळे खात नुसतच वाहात राहत तस काहिस झालय.. त्या झाडामद्ये आता प्राण आहेत की नाही ठाउक नाही त्याच भानही आत राहिल नाही ती माती सुट्ली याच दुःख.. छे त्याहुन निराळी भावना.तिची प्रत्येक आठवण मनामद्ये अजुनही दरवळतेय. तिच हसणं बोलणं अजुनही सर्याचा भास होतोय.. वाटत आत्ता फ़ोन वाजेल आणि ती विचारेल ''अगं दब्ब का नाही नेला?'' मग धडपड करत ऑFFईCE पर्यन्त आलि असति मग माझी सारी धावपळ बघुन म्हणाली असती ''काही गरज नाही ऑFFईCE ल जान्याची,खाण्यापिण्याच्या वेळा पळत नाही.. एवढ काम?''मग माझ आणि तिच गोष्टिवरुन जोरदार वाजल असत..माझ हट्टाने ऑFFईCEला जाण चालुच राहिल असतं आणि तिच घरी येयील त्याल माझ तक्रार करणं. मग या युध्दाचा शेवट मी एक दोन महिन्यांनंतर नोकरी सोडल्यावर झाला असता..तशी ती माझी आई असण्यापेक्षा मीच तिची 'आई' जास्त होते. तिला ओरडणं अगं अस नाही अस वाग अस नाहि अस बोल..याचा तगादा लवुन बसायचा... मग तिही एखाद्या टिपिकल मिली सरखी''मला सारख सारख काही ना काही का सांगत असतेस? मला आता सगळ कळत.ऽअणि हो तु नाहि मी तुझी आई आहे कळल?'' मग आइ अशि वागते एइकत नाही म्हणुन माझि अधिकच चिड्चिड व्याय्ची.. मग आईइची बड्बड्चालु व्यायची मग मि चिडुन शांतच बसायचे आणि तुला हव ते कर म्हणुन आमच भआँदण संपवायचे. आम्ही प्रेमाने बोलण्याएक्षा भांडलोच जास्त आणि मि कदाचित जास्तच.. जसं एखद्या आईला मुलगि मोठी व्हावि म्हणुन जे काही वाटत असत तसच काहिस मला आई बद्दल वाटत होतं . मला नाही माहीत तिने मला कधी समजुन घेतल की नाही पण प्रत्येक वेळि मी तीला समजुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आले होते..पण काही वेळा मिही तिला समजुन नाही घेउ शकले.. ती मत्र बर्याच्दा मला चुकिच समजत आलि माझ्या वागण्याचे बर्याच्दा तिने चुकिचेच अर्थ लावले मीही स्पष्टीकरण देण सोदुन दिल होत अर्ठात स्वभावाप्रमाणेच..आमच्या नात्याच संपुर्ण आयुष्य याच सावळ्या गोंधळात गेल. आमच नात आई-मुलगी या चोरसात बसणार होत की नाहि ठाउक नाही पण होत ते हे असच होत... खरं तर मी या सगळ्याच गोष्टीना खुपच कंटाळले होते कारण या सगळ्यामद्ये मला लहान असं कुठेच होता आलं नव्हत आणि आई दिवसगणिक लहानच होत चालली होती तिचे हट्ट वाढतच चालले होते.. पण कशीही असली तरी ती मला हवी होती..ती माझी आई होती.तिने खुप सारं भोगल होत ..सहन केल होत.. तिनेच केलेल्या चुकांची फ़ळं ती भोगत आली होती आणि मी ..मी न केलेल्या चुकांचि....! खुप चिडायचे मी तिच्यावर.. का?माझ्याच बबतित अस का? मग हळुहळु कळत गेल ती मझ्याहुन जास्त सहन करत होति नंतर तिला या सगळ्याची इअतकी सवय झाली की तिला काहिच वाटेनास झाल.. कदाचित त्या सगळ्याच गांभीर्य कळलच नव्हत.. असो आता मला त्याबद्दलही बरच वाटतय अज्ञानात सुख म्हणतात ना..तेवढ का होइना तीला सुख तर मिळाल... पण या बद्दलही शंकाच येते... खरं तर मला तिला प्रत्येक सुख द्याय्च होत माझ्याकडुन.. ती जरा भोळिच होती..स्वतःहासाथी जगणारी पण स्वर्थी नाही स्वछंदी होती.. भाह्य सुखावर भाळणारी मझी वेडी मुलगीच होती..गाडी बंगला अशि स्वप्न बळगणारी स्वप्नाळु होती.. हे सगळ माहीत असुनही मला तीचि सगळि स्वप्न पुर्ण करायची होती.. मझ्या जण्याच कडाचीत हेच कारण होत... हे सगळच मला मिळ्वायच होत ते तिच्या साठीच.. पण सगळच कोल्मडुन पडल.. एखाद तैलचित्र रंगवताना अचानक पाणि सांडुन सगळ फ़िस्कट्त तशीच सारी स्वप्न फ़िस्कटली गेली.ऽअता काहीच उरल नाही कुठलेच प्रश्न नाही... आहेत काही प्रश्न पण त्याना आयुष्यात कधिच महत्व दिल नव्हत...त्यामुळे सगळ्याच प्रश्नाची उत्तर मिळाल्या नंतर आता कुठलाच प्रश्न नाहि हाच मोठा प्रश्न...पण आईची स्वप्न जगवत आहेत आणि जगवतेय ती एक व्यक्ती... आता नवा कँनव्हॉस्वर नवी स्वप्न फ़िस्कट्लेल्या रंगातुन नवा रंग शोधुन नवं चित्र रंगवाव लागणार .. उन्मळुन पडलेल्या झाडाच वाहवत जाण थांबवुन आता मातीत रुजण्याचा नवा प्रयत्न करावा लग्णार.. त्या शिवाय आत गत्यंतरच नाही... वाइट फ़क्त अवढ्याचचं की हे सगळ बघायला आई प्रत्यक्ष समोर नसणार...पण माझे बाबा माझ्या सोबत आहेत आणि कायम राहतील.. नवे रंग आणि नवं अस जगावेगळ नात... माझ्याच वयाचे माझे बाबा आता मला लहान होउन जगु देणार .. सोबत आईच्या आठवणी .. खुप सार ग्घेउन जगायच आहे.. आई साठी आणी माझ्या ज़गावेगळ्या बाबांसाठी...

बुधवार, २५ एप्रिल, २००७

कित्येकदा आपण किती चुकतो?

कित्येकदा आपण किती चुकतो?
सरळ चलता चालता
वाकड्या वळणावर वळतो...
कधी कळत कधी नकळत...
पण वळतोच..
स्वतःहाला शोधण्याच्या नादात
स्व मद्येच हरवतो...
कित्येकदा आपण किती चुकतो?
माझं , मी , मला
करत 'त्याला' मात्र वेगळ करतो
तु , तुझ , तुला म्हणताना आपल्या अशा 'त्याला' परकं करतो
कित्येकदा आपण किती चुकतो?
कळत नाही अस करताना
आपण आपले किती असतो?
कुठलस सुख शोधताना
समाधान किती मिळवतो?
जगतो जगतो म्हणुन किती क्षण
जगायलाच विसरतो....
खरच..कित्येकदा आपण किती चुकतो?
...स्नेहा

मंगळवार, १७ एप्रिल, २००७

नक्की कोण मी?

तुझ्याच पाव्यातुन आलेल्या

सुरांची कहाणी..

तुझ्याच शब्धातील अर्थ

तुझ्या ओठांमधल हसु

तुझ्याच डोळ्यातलं पाणी...

तुझच एक रुप..

तुझ्यातच हरवलेल तुझ एक अस्तित्व..

स्नेहा...

सोमवार, ५ मार्च, २००७

कधी वाटतच नाही...

कधी वाटतच नाही
जुन्या चालुन चालुन बोथट
झालेल्यावाटांवरुन चालावसं
ओढ होती ती प्रवाहच्या
विरुध्द जाऊन तरंगण्याची
पंख नसतानाही
वार्‍याशी खेळ्ण्याची...
क्षितिजाला गवसनी घालताना
शहाण्या नजरांनी वेडं ठरवलं
तोही ठाइ ठाइ अडवत होता..
माझ्या पावलाने चाल अस सांगत होता
पण.. पण मीही त्याच सारखी हट्टी
बुडणं मान्य होत...
कोसळ्णही...
पण अस्तित्वाची ओढ... झुंज.
सगळ्यावर माझ त्या बोथट
वाटांपेक्षा जास्त प्रेम होत...
स्नेहा...

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २००७

काय सांगु.....?

काय सांगु माला माझच काही कळत नाही..?
शब्द शब्द होता येत नाही प्रत्येक वेळेला...
मग सुरु होतात मौनांची भाषांतरे...
प्रत्येक क्षणांची गणिते...
चुक अचुक याची परवा नसते...
काय सांगु माला माझच काही कळत नाही..?
तशी मी बेफ़िकीर वागणार्‍यातली मुळीच नाही...
समाजाच्या चौकटीत जगणारी
असही म्हणता येत नाही...
स्वतःहाच्या शोधात हरावणारी मी
का? अस्तिवा करिता झगडणारी?
काय सांगु माला माझच काही कळत नाही..?

स्नेहा...

मंगळवार, २० फेब्रुवारी, २००७

अस्मितेच्या नावाखाली..........

अस्मितेच्या नावाखाली
सहन केल तिने सारं
त्यांना देव मानल
त्यांना चार चौघात
वरमाला घातली होती
तिने त्याच्या गळ्यात...
त्याने मात्र तिला वाटुन घेतलं
पाच जणांत...
तीही हो म्हणाली...
समाजाच्या चौकटी मोडुन सुध्धा
अभिमानने जगली होती....
अस्मितेचा पदर पांघरुनच बसली होती...

पण त्यांनी काय केल?
धर्माच्या नावाखाली आणि
सत्याचे झुल पांघरुन
तिला द्रुतात लावलं
तिच्या समर्पणाच असं बहुलं केलं
तीच रडणं ओरडणं त्यांनी सहन केल
पण स्वतःहाच्या
शब्धाला जस्त महत्व दिलं
आपले पणाच ओलावा
त्यांनी असा संपवला होता...
ती मत्र अस्मितेच्या नवा खाली
सर काही सहन करत आली

ती अग्निकन्या होती
पण तेवत रहीली ज्योती सारखी
मनामद्ये मात्र
खुपचा जाळ लपलेला होता....
त्याचे कोणाल काहीच नव्हते
होती ती फ़क्त तिच्या अस्तिवची ओढ...
आन स्वतःहाच्या अहंकारची जिद्द...
ती मत्र अस्मितेच्या नावा खाली
सार काही सहन करत आली...

स्नेहा

शनिवार, १७ फेब्रुवारी, २००७

निखळ पण हवहवसं....

लहान मुलं म्हटलं की आठवतो तो त्यांचा निरागस पणा...त्यांचं गोड हसणं.. सगळच खर खुरं.. त्या मद्ये कुठेच कसलाच खोटे पणा नसतो. सगळच हवहवसं वाटणारं...मला तर लहान मुलं खुप आवडतात...त्यांच बोबडं बोलणं.. हसणं रडणं लुटुलुटु चालणं सगळ्यातुन निरागसता डोकावत असते.... मला विषेष वाटत ते त्यांच्या बुध्धिमत्तेच.. अणि त्यांचे तर्क.. अफ़ाट असतात..... काही किस्से आहेत जे मला खरच थक्क करतात... आणि त्या लहान्ग्यान्च्या बुध्धिच कौतुकही वाटतं... ते आणि त्यांचे प्रश्न.... सगळच भन्नाट असतं
माझ्या मैत्रिनीच्या खालच्या फ़्लॅट मद्ये राहणार्‍या चिमुकल्याला त्याची आजी भरवत होती आणि त्याला भरवतानच ते संभाषण ऐकण्या जोग होतं... ते असं,
आजी ''पोळी GIRL असते म्हणुन आपण ती पोळी म्हणतो आणि भात हा BऑY असतो त्याला तो भात म्हणतात..... आणि भाजी GIRL म्हणुन ती म्हणतात''या वर सहेबांनी काय विचारले ठाउक आहे?'' आजी.... मगं वरण म्हणाजे काय गं GIRL की BऑY ?''आजीने काही सांगण्याच्या आधिच याचे उत्तर काय माहित आहे? ''वरण म्हणजे आजोबा... बरोबर ना आजी?
आजी बिचारी काय बोलणार?नंतर ऐकु आला तो हस्याचा स्फ़ोटच...माझा भाच्चा आहे पाच वर्षाचा.. पण त्याचे प्रश्न आणि त्याचे तर्क.. सगळच अतर्क आहे... त्यातुन सहेबांना गोष्टीइ ऐकायला खुप आवडतात ... रामायण तर FEVORATE एकदा मला बोलता बोलता म्हणाला, '' आत्या मी महिते तिन तीन तीन रण्या करणार..''मला पहिल्यांदा कळलच नाही त्याला काय म्हणायच आहे ते.. मी: म्हणजे?तो: अगं तीन तीन राण्या म्हणजे तीन वेळा लग्न करणार आहे... (मला काही सुचेच ना..तरीही विचारल) मी: का रे? तीन लग्न का?तो: अगं आत्या दश्रथाला नाही का तीन तीन राण्या होत्या?मी कपाळालाच हात लावला..काय सन्गावे याला... कसबस समजावुन सांगीतल...

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २००७

अगदी नकळतच.....

नकळत नात्याची विण गुंफ़त जाते
भावने सकट..
स्व्प्नांची चित्र मग
मनात रेखाटत जातात...
आथवणीचे बांध्ही
मग बांधु लागतात...
हळवे बोलणे...
रुसणे.. फ़ुगणे..
चिंच आवळ्यासाठी
केलेली पोरकट भाड़णं..
एक वेगळ विश्वच असतं सारं.
मग आपल ते खोटं खोटं
घर घर खेळणं..
आज काय मग जेवयल?
पोळि भाजी ..वरण भात...
हे काय गं... रोजचचं काय ते?
हे बघ मुकट्याने जेउन घे अस दराडवणं
सगळच खोटं पण मानापसुन खेळणं
प्रत्येक खेळ मनापसुनचा असतो....
मग अचानकच तो का विस्कटतो...
हरवतो आपण आपल्यालाच...
गुरफ़टत जातो नव्या खेळात..
मग सारे पोरकट वाटु लगते..
स्व्तःहावरच हसु येउ लगते...
चिंच बोरं या व्यवहारत
जगणारे आपण..
कधी खर्‍या व्यवहारात हरवतो कळतच नसतं..
नंतर मात्र आथवणींशिवाय
कहीच उरत नसतं...
ती नकळत गुंफ़त गेलेलि घत्त
नात्यची विण कधि उसवते
हेही उमगत नसतं...
अगदी नकळतच.....


स्नेहा

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २००७

विरहात ...

विरहात अस वाहुन जायच नसत
हे मान्य आहे
पण विरहानंतर रदयच तळणं
अशक्यच आहे...
फ़क्त स्वःत त्यत भिजुन बुदुन जौ...
इतकही रडायच नसतं..
दोन सरीतच स्वतःहाला थंबवयच असतं..
कोणही अश्रु पुसणार नहि यचहि भान
ठेवायच असतं...
मग शुन्यात बघत
कोणलही शोधयच नसत...
इतकही कोणामद्ये स्वतःहाल हरवायच नसत...
विरहात अस वाहुन जयच नसत...
ज्य वळनावर भेटलो तिथे
परत कधी जायच नसत..
विरलेल्या क्षणांन परत
कधि शोधायच नसत...
खुळा खेळ असतो सारा मनानेच
मनाशी रचलेला....
मिटलेली कवाडं परत उघडत नसतात
वाजवण्याचे खुळे खेळ चालुच रहतात..
म्रुगजळच्य मागे मनं ढवत बसतं
कुठल्यश्या अठवणिंचे वेदे अर्थ लावत बसत...
विरहात अस वाहुन जायच नसतं..

स्नेहा....

मंगळवार, ३० जानेवारी, २००७

कधितरी नकळतच....

कधितरी किती नकळतच आपण
कोणाचे तरी होउन जातो....
त्याचे शब्द त्याने दिलेली सादं
त्याचि आठवण
त्याची स्पप्न पाहु लागतो..
त्याच हसणं बोलणं
त्यातचं जगु लागतो..
त्या नात्याचा नेमका अर्थ
लागत नसतो...
त्याला नाव देण्याचा हट्टं हि नसतो
असते ती मनाची आनामिक गरज
आनि स्वतःहाशीच
स्वतःहाने मांडलेला खेळ..
आणि आपण आपल्याच
मांडलेल्या खेळात फ़सतो..
कधितरी नकळतच.....

स्नेहा...

शनिवार, २७ जानेवारी, २००७

काहीतरि गवसले होते मला...

काहीतरि गवसले होते मला...
काय होते ते समजायच्या आतच
सारे निसटुन गेले..
ओन्जळ रितीच राहिली..
कुठलासा सुवास मात्र क्षणंभर तसाच दरवळत राहिला...
कहीतरी गवसले होते मला..

तो क्षणं नाही वर्णवता येत..
काहीस गवसण्याच्या आनंदी असवांमद्येच
काही हरवण्याचे दुःख शामिल झाले..
काही समजण्याच्या आतचं
सारे काहि संपुन गेले....
काहीतरी गवसले होते मला..
त्याला म्रुगजळही नाही म्हणवत
तो क्षणं मी जगले होते...
निमिष मात्र का होइना मी
काहीतरी अनुभवले होते..
सारं होतं एका स्वप्ना सारख
हवंहवंसं वाटणारं...
पण.. पण जगात हव हवस वटत
ते कधिच मिळत नसतं
म्हणुन आयुष्य जगण सुधा सोदता येत नसत...
काहीतरि गवसले होते मला...
काय होते ते समजायच्या आतच
सारे निसटुन गेले..
स्नेहा...

का कोणास ठाऊक...

का कोणास ठाऊक...
काधी तरी कळतच नही
असं का होत ?
आयुष्याची गणितं का चुकतात ?
क्षितिजाच स्वप्न बळगणार मनं
चार पाउला टाकायला सुधा कचरतं..
कसली तारि अनामिक भिती दाटते मनात
उरते ती फ़क्त निराशाच...
उमेदीची चिन्ह कुठेच दिसत नसतात
कळोखच्या भुयारात मनं स्वतःहाल
लोटत जातं..
आधारसाथि हात कधिच नव्हते
ते शोधण्यचाअ पोरखेळही आता बंद होतो...
आयुश्याची गणितं कधितरी चुकतातचं...
का कुणास ठाऊक?
स्नेहा..

बुधवार, २४ जानेवारी, २००७

एक दाद ....

जगताना बरं वाईट अस
सगळच घडत असत...
आपण मात्र हसुन
जगण्याला स्विकारयचं असत...
प्रत्यक्ष किती क्षणं जगतो
किती मरतो...
ह्या हिशोबा पेक्षा कुणाला तरी
जगवायचं असत...
सुख दुःखाच्या...
वाटेवरुन चालताना
जगण्याला दाद देउन जायचं असत...
जगताना बरं वाइट असं
सगळचं घडत असत...
स्नेहा...

शनिवार, २० जानेवारी, २००७

मनाचे खेळं...

प्रत्येक रंगांची
उधळणं होतच असते मनात ....
कधी हसणं कधी रडणं..
कधि प्रत्येक क्षन जगणं..
तर कधि मरणं....
सगळचं अटळ असतं....

प्रत्येक लहान मुलाला
मोठं व्हायचं असतं
अन एकदा मोठ झालं
की प्रत्येक मनाल परत लहान
व्हाय्चं असतं....

जगताना बर्याचदा मनाच पाऊल
सराणाची ओढ घेतं..
आणि जेव्हा सरणावर जाण्याची वेळ होते
त्यावेळी प्रत्येक माणसाल आणखी काही
क्ष्हण जगायच असतं
सरेच वेदे हट्ट...
पण अफ़्सोस.. त्यातला एकही हट्ट
आपण पुरवत नसतो
मनाचे असले फ़ाजील लाद
कितीही पुरवायचे झाले तरि
कोणहि पुरवु शकत नसतं....

मनाचे असे वेदे हट्ट..
अन म्रुगजळा मागे धावण सुरुच असतं...
कधी तरी मनाकडे दुर्लक्ष करायच असतं....
अन्वतःहच्या वेदे पण वर हसायच असतं....

स्नेहा....

बुधवार, १० जानेवारी, २००७

तुझ्या बद्दल लिहायला............

तुझ्या बद्दल लिहायला गेले
की पान कोरचं राहतं....
हातात्ला पेन्ही मग अबोल होतो..
अन सुरु होते ती
मनामध्ये आठवणीन्ची चढाओठ.....
सारं कहि स्पष्ट दिसु लागतं...
तुझ्या बद्दल लिहायला गेले कि
पान कोरचं राहतं...


तुझं लहान मुला सारख रुसणं..
माझ त्यावर हसण....वय विसरुन केलेलि भान्डणं....
सगळच काल घडल्या सारख वाटत..सगळच एक स्वपना सारखं सजतं.
तुझ्या बद्दल लिहायला......

तुझ ते अबोल राहुन बोलणं
तर कधी तुझ शब्द शब्द होणं..
कधी नुसतच मझ्या कदे पहणं... आन तुझ उबदार स्पर्श..सगळंच स्पश्त जणवतय.....
तुझ्या बद्दल लिहायला गेले की....

पण ..पण भिती वाटते..या आथवणीन्चि...
त्य कदाचित पुसट होत जातिल.ऽअकाशातल इन्द्र धनुश्य कसं
हळुवर रंग छेडीत फ़िकट होत जातं तसचं...
तुझ्या बद्दल लिहायला गेले की....

तुझी ति हळवी नजर..
थर्थरणारे शब्द...
कदचित शब्द तसेच रहतील..
अर्थ्पुर्ण की नुसतेच कोरडे शब्द?
याच नेमकं उत्तर नाही देता येणर..
शेवति ख़्शितिज कोणाच्या हाति सापडलय का?
असते ति निव्वळ धडपड..
स्वतःहच स्वतःहशि केलेले हत्त...
खरं तर कोणच्याच हातात काहिच नसत....
तुज़्ह्या बद्दल लिहायला गेले की माज़्ह पन कोराच राहतं....

मंगळवार, ९ जानेवारी, २००७

धुर........

अस्तीत्व... माणुस नेहमीच अस्तिवा करिता झगडत आला...
पण कहि माणसान्च अस्तित्व..
धुरासमान असतं....
ख़्शभर राहुन नंतर विरुन जातं.

धुर! तो समईची ज्योत विझल्या नंतर्च असेल..
तर एक वेगळचं समाधान अन शान्तत मिळते..
खुप कहि देउन गेल्याच एक वेगळाअच आनन्द..
पण तोच धुर हुक्क्याचा असेल तर?

ख़्शणभर राहुन झुरवणारा
अन कोणाला तरी हळुवार पणे संपवणारा.
.शेवटी अस्तित्व क्शणिक असल
तरि आपणच ठरवायच असत...
समईतल तेल होणं मान्य क
दुसर्याल हळुवार पणे संपवणार ...
.सगळ आपल्याच हाती असत.....

शुक्रवार, ५ जानेवारी, २००७

अजुनि सर्‍भमात मी.........

मि त्य दिवशी सारंग बरोबर कर्निव्हल मध्ये गेले होते..[सारंग माझा भाउ ] ...कर्निव्हल....फ़ेसाळ्लेले ग्लास आणि धुरान्चे लोट... खरं तर फ़ेसाळलेल तरुण्य अणि धुरटलेल भविष्य.... अस काहिस वाटल....सगळच दुशित वाटलं...
मला कळत नाही लोक असा एन्जोय्मेन्ट नावखालि खलि अस क वागतात... स्वतःहचि शुध ५० रुपयत हरवुन त्यन्न का त्यान मन्या असत....? पण त्यान ते सगळच मन्य असत.... स्वतःहाला हरवुन बसणं त्याना मन्य आसत... मला कल्लत नाहि ती माणसं इतक्या सहज्पणे अस वगु शकतात....?
खरंतर सगळच खुप ओलखिच आ णि सवयिच ज़्हलय.... सगळीकदे
हेच बघायल मिळत... लोकंन्च्य मते हिच तरुन्यचु झिन्ग असते... का याच उत्तर कोणलच सापदत नाहि का ते कोणल शोधयच नहि.ऽअजुन याच समर्‍भमत आहे ........

मंगळवार, २ जानेवारी, २००७

तो...........

काहि गोष्टी मनाला चटका लावुन जातात.... कधितरि खुप लहान्शी गोष्त मनात खळबळ माजवुन जाते.. मग पर्‍श्नान्च वादळ सुरु होत..... नुसत्य प्रश्नच नाहि तर उत्तर नसलेल्य नुरोत्तर प्रश्न्नच....!! त्या गोष्तिच शेवट असा होतच नाहि..झालच तर दोन आसवान्नि ते वादळ शान्त होत पण कदाचित परतण्य साठीच.......

त्य दिवशि असच झाल..मि त्याल भेटले...त्यच्य डोळ्यात एक वेगळिच चमक होति.....
ओथन्वर ते निखळ पण अनिश्चीत हास्य,बोलका चेहरा...काहिस सान्ग्णर.....कि विनव्नारा?? तो मला निशब्द करनार.....
तो जेमतेम आठ दहा महिन्यन्चा असील...त्याच्य सरखे तुकडे..ऽअनेकजण होते...त्याच्य इताकेच निरागस..ंइशब्द...तरिहि बोलके...पण तो.....? त्याच वागण विलक्शण होत.....मनाल अगदि सुन्न करणार....
त्या दिवशि आम्हि श्रीवत्स मद्ये गेलो होतो....श्रीवत्स! एक अनाथाश्रम! एक दिवसन्पौन ते सहा वर्शाच्य मुलान्च आनाथलय.....मि तिकडे गेलेआणि त्या मुलान्च्य किल्बिलतत पहिल्यन्दा हरवुनच गेले....... चोहोकदे मुलच मुल... आत गेल्यवर शुद्ध हरपायचिच बाकि होति.....त्य सर्वन्च हसाण, बगडण..एकटच खेळण..स्वतहच्या बेद वत लोळण,मद्येच कुणाच्तति रडन...
आम्हि सगळेच त्यान्च्यशि खेळन्यात गुन्ग झलो....ते निरागस जीव देखिल आमच्या बरोबर एक्रुप होउन खेळत होते..मला तर कळतच नव्हत कि कोअणल उचलुन ग्याव...मझ जवळ जवळ्सगळ्यन घेउन झल...पण तो...तो मात्र स्पश्त आथवतो आहेच्याशि अशिच खेळत होते.तोहि खदखदुन हसत होता..पच एक मिनिट झलि असतिल तितक्यात कोनितारि मला हाक मारलि....म्हणुन उथव म्हणले तर समजेन त्याला सोदु कशि? तशिच उठले पण क्श्नभर थाम्बले...तोहि मज़्ह्याकडे काहिश्य वेगळ्य नजरेने पाहु लागला...मला काहिच सुचेना..मि वळले.ऽअन परत मगे वळुन पाहिल...तो तसाच होता...बघता भघता क्शनर्द्धत तो हसला...ऽगदि समजुदर पणे.ऽअणि स्व:तहाच शरिर गदिवर टाकुन दिलऽगदि हसत हसतच..ऽअन स्वतहमद्ये रमुन गेला...मल खहिच सुचल नाहि... डोळे भरुन आले आणि मि पट्कन त्याल उचलुन घेतले..इवलसा जिव तो...पण किति निर्पेक्श..पण समजुत्दार..समाद्धनि...का?..का? त्याने त्याचि परिस्तिति ओळखलि होति?..मनात धस्स झाल त्या जागि आपल कोनाच कार्त असत न तर रदुन गोन्धाळ घतल असता..तिथलिहि बाळ तशिच करतत..स्वभविकच आहे ते.. पण तो त्या परिस्तितिला अवध्या लवकर जाणु शकला? क त्याला या सगळ्यान्चि सवय झालि आहे? खर तर मि श्रीवत्स मद्ये गेले होते ते मला समाद्धन मिळाव म्हणुन...तिथल्या लहान्ग्यन्च्य चेहर्यावर म्हसु द्यायच होत..क्शन्भर क होइना...त्या व्यतरिक्ता आजुन काहिच करु शकत नव्हते म्हणुन निदन ते तरि...पण त्य अ चिमुर्द्याच ते निखळ हस्य पाहुन मल्ल वतल कि जणु तेच मला समाद्धान मिळाव म्हणुन हसतिय...

त्या नन्तर बराच वेळ तिकदे होते..त्याच्य शिवय बाकि जनन्शि खेळले..बोलले ....ऽअणि शेवटि अम्हि तिथुन निघलो.. जद मनाने...एक जणिवे सह...ऽअपल्याला अनाथ हा शब्द्ध उच्चरल देखिल जड जातो..पण ते त्या शब्दासह त्या जणिवेसह जगतात...परिस्तितिने मान्दलेल्या खेळत..ऽअपल आस अस्तित्व निर्मान करण्याच्या द्धदपदित...खरच का ते जगतात?

अम्हि तिथुन निघालो मनात खळबळ घेउन...ऽअणि त्याच ते निरपेक्श माझ्या समाद्धनासाथि हसण मनात बिम्ब्वुन.....

सोमवार, १ जानेवारी, २००७

एक झुज आयुश्याशी.....

एक झुज आयुश्याशी.....
आपल्यात जगणारी....का जगवणारी...?
जिकाण्याची चव सान्गनारी...
तर हरवणारी....
तर कधी हारुन सुद्धा जिन्कवनारी....
एक झुन्ज आयुश्याशी....
आन्धारात चाचपडनारी....
पाउल थेचकाल्नारी...
आन्धारचिअ ओळख करुनप्रकाशाच महत्व शिकवनारी.....
एक झुन्ज आयुश्याशी....

...स्नेहा.

प्रत्येक नात्याला नाव .......

प्रत्येक नात्याला नाव द्यायच नसतकधितरि
रानफ़ुल होउन जगायच असत...
माहित आहे इथे गुलाबलाच जास्त महत्व आहे..
काट्या सकट जगणसगळ्यान्ना मान्य आहे.
रानफ़ुलावर कोणाचही प्रेम अस नसत...
तरी प्रत्येकाच्या आयुश्यातएक तरी रानफ़ुल असतचकधीतरी
तसही जगुन बघायच असत....
प्रत्येक नत्याल नावअस द्यायच नसत....
स्नेहा....