सोमवार, ५ मार्च, २००७

कधी वाटतच नाही...

कधी वाटतच नाही
जुन्या चालुन चालुन बोथट
झालेल्यावाटांवरुन चालावसं
ओढ होती ती प्रवाहच्या
विरुध्द जाऊन तरंगण्याची
पंख नसतानाही
वार्‍याशी खेळ्ण्याची...
क्षितिजाला गवसनी घालताना
शहाण्या नजरांनी वेडं ठरवलं
तोही ठाइ ठाइ अडवत होता..
माझ्या पावलाने चाल अस सांगत होता
पण.. पण मीही त्याच सारखी हट्टी
बुडणं मान्य होत...
कोसळ्णही...
पण अस्तित्वाची ओढ... झुंज.
सगळ्यावर माझ त्या बोथट
वाटांपेक्षा जास्त प्रेम होत...
स्नेहा...