शुक्रवार, २५ जानेवारी, २००८

काचेपल्याड....

रोजच्या त्याच त्याच चौकटीत जगताना.... मला नेहमी त्याच्या बाहेरच विचित्र चित्र बघायला मिळत थोड्याबोहोत प्रमाणात.... पण मग ते हादरवणार असत...मागच्या शनिवारी पुण्यात गेले होते.. मी अदिती अन काकु shoppingला गेले होतो... अद्याने आयुष्यात पहिल्यांदा तीन सडेतीन हजाराच shopping केल असेल ती खुप वेगळ्या मुड मद्ये होती... इतकी महागडी shopping स्वतःहाच्या पैशात केल्याचा आंनद... आणी काही वेगवेगळे भाव होते तिच्या चेहर्‍यावर... आम्ही जेवायला म्हणुन डेक्कनवर आलो... एक वेगळच चित्र दिसल आदयाला डोळ्यासमोर... लगेचच desturb झाली... थोड पुढे आल्यावर मला म्हणाली काय आहे ना मी एवढं shopping करताना काहीच विचार केला नाही, त्यांना पाहीलस? मी मागे वळुन बघितल तर खुप कसंस झाल मला... चारपाच फ़ुगेवाली लहान मुलं एकत्र बसली होती.. एकटक नजर होती त्यांची त्या काचेपल्याड असणार्‍या कपड्यांवर... ते दुकान त्याची झकपक... ह्या सगळ्याच कुतुहल त्यांच्या तोंडावर दिसत होत... आम्हा दोघींना काही सुचलच नाही काय कराव ते....दुसर्‍याच दिवशीच दुसर चित्र ती फ़ुगेविकणारी लहानगी.. ती मुल त्यांच्यापेक्षा अजुन लहान होती ६-७ वर्षाची किंबहुना त्यापेक्षाही लहान... रत्यावर होती... बहिण आणी भाऊ अस नात असाव त्यांच... वयात जास्त अंतर नव्हत.. दोघेही मस्ती करत होते रस्त्यवर ...खळखळुन हसत होते... यांना इतक सहज आणी सुंदर हसता कस येत?आज मी ट्रेन ने येत होते.. खिडकीत बाहेर लक्ष होत तर निराळच द्रुष्य बघितल... एक काठी त्या रुळाच्या बाहेर असलेल्या दगडांमद्ये रोवलेली.. त्याचा आधार घेउन त्याला एक टोक अन रुळाला दुसर टोक अशी झोळी बांधलेली होती... वर ऊन बाहेर त्या झोळीतल्या बाळाला झोका देणारी ४ ते ५ वर्षाची त्याची बहिण.. आजुबाजुला त्याचे आईवडिल ... कुठलस काम करत असलेले... त्यांना किंचीतशी पण भिती वाटली नसेल का येणार्‍या जाणार्‍या गड्यांची ?
मला आठवतो तो दिवस... आमच्या शाळेत ख़्रिसमस साजरा होत होता... इनमिन सात मुल आहेत शाळेत पण छानशी ख़्रिसमस ट्री सांताक्लॉज ..केक.. चॉकलेटस.. सगळी मज्जा सुरु होती.. पण मगे वळुन बघितल तर बांध काम करणार्‍या लोकांची चिमुरडी मुल सगळ आर्श्चयाने सगळा प्रकार बघत होती... मला काही सुचल नाही.. मी खाउची एक डिश आणी फ़ुगे त्या उघड्या पोरांना नेउन दिल... त्यांना बर वाटल असाव.. त्या मुलांनी तो केक कसा खायचा हेच समजत नव्हतं... मी खा म्हट्ल्यावर कशाच्याही विचार न करता खपाखप खन्यास सुरुवात केली... का कोण जाणे मिच जास्त सुखावले...
का आपल्या अन् त्यांच्या जगा मध्ये त्या काचेच अंतर राहणारच?डोळे उघडुन पहा आपल्या काचेपल्याड अपल्याला हे दृश्य दिसत...

गुरुवार, २४ जानेवारी, २००८

माझे मोती...

आपण आयुष्यात माळ गुंफ़त जात असतो नकळत.. नात्यांची... एखादी व्यक्ती आपल्याला भेटते काय आणी आपल्याही नकळत आपण तिचे होउन जातो... आणी ती व्यक्तीही तितकीच आपली होते... पण माझी ती माळ अचानक तुटली आणी गेले काही दिवस मी मोती शोधतेय.. त्यातला सगळ्यात आवडता मोती हरवला होता माझा... तो गवसला... हरवला नव्हताच मुळी तो माझ्याच जवळ होता फ़क्त समोर दिसत नव्हता.. हिरमुसला होता अन्.. गुरफ़टुन गेला होता स्वतःच्या नादात...असे बरेच मोती हरवलेत... कधी गवसतिल की नाही माहित नाही..पण आत जेवढे सापडतील ते फ़क्त माझेच असतील... त्यांना परत गुंफ़ायच.. नव्या आयुष्यात.... आता नवीन मोती पण सापडतायेत.... :)



...स्नेहा

बुधवार, १६ जानेवारी, २००८

दामले मास्तर....

दामले मास्तर बी
शिकवा ना थोडं...
शालत म्या कधी गेलोच न्हाय
शालं मंदे जायच म्हनाले
तर आयेन चन्यामन्याच घमेलं हातात दिल
दामले मास्तर मला बी शिकवा ना थोडं...
शालत शीकुन म्हने लै म्होट व्हता येत
छान सान कापडं घालुन
हाफ़ीसात जाता येत..
मला बी हाफ़ीसात जायचय
जरा पैका कमवायचाय..
दामले मास्तर मला बी शिकवा ना थोडं...
त्या पैक्याने बाच दुकनं पलल
आयेच काम बी सुटल..
तिच्या हताच लै खापरं झालय
त्याला मला त्येलं लावायचयं
दामले मास्तर मला बी शिकवा ना थोडं...
तसा चन्यामन्यनबी पैकं मिलत
पन प्योत नाही भरत...
बा च्या दवादारुला पैकं बी न्हाय पुरत...
पन मला सगल चांगल व्हताना बगायचय
शालत जाउन म्होट व्हता येत नसलं
तरी बी ल्यायला वाचायला शिकायचय
दामले मास्तर मला बी शिकवा ना थोडं...

...स्नेहा




हा माझा पहिला प्रयत्न होता घाटी भाषेत लिहण्याचा...मुळची पुण्याची असल्यामुळे जरा भितीच वाटली या भाषेत लिहण्याची... पण आमच्या दामले मास्तरांवरुन सुचली... ;) ही कवीता आधीच लिहली होती इथे आज पोस्ट करतेय.... तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणण्यासाठी उत्सुक आहे.. चु.भु.दे.घे