सोमवार, ३ नोव्हेंबर, २००८

गर्दी.....

गर्दी गर्दी गर्दी.... किती आवाज ते.... अंगाला खेटुन जाणारी लोकं॥ पाय वाट शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय... पण आता नाही सहन होत... गर्दी गर्दी गर्दी.... जिवाच्या आकांताने ओरडतय मन.. 'ए ए.. चूप बसा...' तोंडून शब्दच फुटत नाही.. राग येतोय ...कोणाचा??? गर्दी गर्दी गर्दी....


प्रत्येक जण अस्तित्व शोधत असत ना आपली ओळख आणी त्या साठीचीच धडपड ना?? अस्तित्व ? ओळख?॥ हं.. ऐशी की तैशी त्याची... गर्दीला कुठे आलाय चेहरा? हो पण अस्तित्व असत ... पण जे जस अपेक्षित आहे तस...? गर्दी गर्दी गर्दी

मला नाही घुसायच त्या गर्दीत... नाही गुदमरायच त्यात... म्हणून॥ दुसर्‍याच रस्त्याने चालु लागते.. तरी अस्वस्थ .. आवाज अजून दबलाय... शब्द फितूर झालेत.. पाय चालतायेत नुसते कुठे का नेतायेत ठाउक नाही.. पण चालतायेत... पण साला... परत एका नव्या वळणावर पोहचले.. तिथेही परत तिच सापडली..

गर्दी गर्दी गर्दी.....