बुधवार, २५ जून, २००८

मरणाचा सोहळा

खुप प्रयत्न केला तरी आपण काही गोष्टी टाळू नाही शकत... हे पोस्ट मला आठवड्यापुर्वीच टाकायच होत पण नको म्हणुन थांबवल स्वतःला.. पण काही करुन मनातुन हा विषय जात नाही.. नुसत आठवल तरी तळपायाची आग मस्तकाला जाते... इथे काहीतरी खरडुन शांतता मिळेल अस नाही..पण.. माहीत नाही इथे मोख़ल करावस वाटतय...नेहमीप्रमाणे त्या दिवशीही सकाळी ऑफिसला गेले.. काही वेळाने एका माणसाने सांगितल की काल मॅडमची आई गेली... जास्त वाईट वाटायच कारण नव्हत त्यांच वय खूप झाल होत .. म्हणुन नेहमी प्रमाणे गोराई प्रवासला सुरुवात .. प्रवासात गप्पा गाणी बडबड सगळ नेहमी सारख चालु झाल... परत ऑफिस मध्ये येई पर्यंत डोक्यात मॅडम त्यांची आई हे विषय पुसुन गेले होते... दिवसाला सुरुवात झाली नेहमी प्रमाणे.. मग क्लेयरने सांगितल की आपल्याला चर्च मद्ये जायच आहे दुपारी.. आणी दुपारी आम्हा सगळ्यांची स्वारी दादरकडे निघाली... निघण्या पुर्वी सगळ्या स्टाफला येण्याच विचारण्याच काम माझ्या कडे सोपविण्यात आल होत.. तिथे पहिला आश्चर्याचा धक्का बसला... माणसं अशीही असु शकतात अस वाटुन गेल... एका शिक्षिकेला विचारल तु येणार का? तेव्हा तिने प्रति प्रश्न केला कोण कोण येणार... तिथपर्यत ठिक होत पण ती येणारहि नव्हती पण दुसर्‍या वर्गातल्या शिक्षिका येणार तर सरांच्या नजरेत आपण येउ मग आपल्य नोकरीला धक्का आहे वैगेरे विचार ती मांडत होती मला तिचा रागच आल होत.. मि सरळ तिला म्हणाले मनात नाही तर येऊ नकोस तिथे कोण आल आणी कोण नाही हे बघत बसायल कोणालाच वेळ नसेल आणी कोणी त्या मनस्थितीतही नसतील...(खुप पल्हाळ लावतेय पण ही घटना महत्वाची आहे) आणी आम्ही दादरला निघालो.. माला त्या दिवशी काय झाल होत माहित नाही.. मि अशी कोणाला तरी भेटायला चालले आहे तरी मस्त मज्जा मस्ती चालु होती संपुर्ण प्रवासात... नंतर गाडी ददर मद्ये शिरली आणी एका घरा समोर उभी राहीली तशी मी अचानक शांत झाले आणी मला परिस्थितीच भान आल... वर त्या आजींचा म्रुतदेह होता त्याच अंतिम दर्शन घ्यायला अम्ही आलो होतो... सगळे वर गेले.. मला अशा ठिकाणी जायला खरच नकोस होत... पण मीही धिर धरुन वर गेले.. खाली येताना खुप हळवी झाले होते आज परत एका मुलीने तिच्या आईला गमवल याची जाणीव होऊन मन हळव झाल होत.. खाली उतरले तर जिन्याच्या बाहेरच सर आणी आमच्या ऑफिसचा स्टाफ हसत आणी खिदळत उभे होते.. हा दुसरा धका..त्या नंतर आम्ही चर्चमध्ये गेलो... माझ मन सुन्न झाल होत... चर्च मध्ये ५०० लोक होती.. पण ती फक्त गर्दी होती शाळेत त्या शिक्षिकेला जी भिती वाटली होती त्या भिती पोटीच ही माणस जमा झाली होती... माझा जिव तिकडे गुदमरत होता... त्यांच्या प्रार्थना सुरु झाल्या.. माझ्या ऑफिस मधल्या एका महामयेने मला त्या वातावरणात दात काढत विचारल तुझे विचारल स्नेहा जमता तुझे जमता है ना इनके जैसा उठक बैठक करना ही ही ही... मला त्या क्षणी तिच्या कानाखाली जाळ काढण्याची इतकी इच्छा झाली होती.. कारण ती बाई मैतीला आलो आहोत अस विसरुन फ्युनरल पार्टीला आली आही आशा आर्विभावात वागत होती... नंतर फक्त तिच तस वागत नाही हे समजाल आणी माझ्या चहुकडे माणुस या नावाखाली वावर्णारे कुठलेसे विक्षिप्त नालायक आणी भावनाशुन्य प्राणी आहे हे जाणवल.. पण उशिर झाला होता प्रार्थना सुरु झाल्या होत्या आणी मी जरा आतल्या बाजुस उभी असल्या मुळे मला निघताही येत नव्हत... दोक्यात प्रचंड चिड राग दुःख सगळ एकत्र झाल आणी दोळ्यातल पाणी मी थांबवु नाही शकले... तिथे उभ राहण अशक्य होत पण पर्याय नव्हता... माझी नजार राहुन राहुन मॅडम कडे जात होती... किती संयम आहे त्यांच्याय वयाने इतका संयम येत असावा... ह्या बाईने आज आइला हरवल पण जास्त रडारड नाही.. त्यांच्य पध्द्ती आणी रुढी प्रमाणे सगळे सोपस्कार करत होत्या.. मला हेवाच वाटला त्यांचा... खुप आदर वाढला.. पण....त्या दिवशी देवाच्या मनात काय होत कोण जाणे ? चर्च नंतर आम्ही स्मशानात गेलो.. माझ्या मनात काय काहुर माजल होत मलाच माहित... पाय आणि मन सुन्न सगळच झाल होत... तिकडच द्रुश्य बघुन तर ... काय कराव कळेना.. खुप शिव्या घालाव्याश्यासुटलो वाटत होत्या सगळ्यांना... मेलेल्याच्या टाळुवरच लोणी खाणारे होते सगले.. दोन थडग्यांच्या मध्ये चालायला वाट केलेली असते हे विसरुन लोक थडग्यांवरुन पाय देत पुढे जात होती.. काही जण चक्क धडग्यावर उभे राहुन मरण सोहळा बघत होते... मला सगळ अनावर होत होत... मी त्या गर्दीचा एक भाग आहे ही भावना ...शब्द नाही सापदत मला... शेवटी तोही विधी संपला.. वाटल त्या आजी मॅडम आणी मी तिघेही एकदाचे सुटलो... म्हणजे या मरण सोहळ्याच्या अंकाचा इथे शेवट झाला... या लोकांमध्ये त्या खड्यात माती टाकायची पध्दत आहे मी तिथपर्यन्त जाण टाळल... तर आमच्या क्लेयर बाईंना काय हुक्की आली कोण जाणे तिला वाटल मी सगळ्याला घाबरतेय की काय.. म्हणे चल आपण दोघी जाऊन माती टाकु... ती ते अश्या पध्दतीत बोलली जस ..जाऊ देत... तिच्या साठीही तो सोहळाच होता हसण खिदळन..सगळच तिठली लोक सहज करत होते... अम्हि निघालो.. तिथला एक एक क्षण इतका जड जात होता.. मी डोळे मिटल्यावर मला माझी आई दिसत होती.. माझ मन माझ्या बाबांच्या कुशीत धाव घेत होते... पण त्यतल सगळ्च अशक्य होत आहे.. हि जाणिव होत होती.. माझा घराकडे प्रवास सुरु झाला... मध्ये मैत्रिणिकडे ही चिड चिड बोलुन झाली.. डोळ्यासमोर सतत मॅडम त्यांच्या डोळ्यातुन आलेले ते आष्रु .. माझी आई आणी...ऑफिस मधल्या मैत्रिणि बरोबर बोलताना हा विषय निघाल मला तिने विचारल काल तुझ्या डोळ्यात पाणी का होत... मि उत्तर दिल एक मुलगी पोरकी झाली म्हणुन.. तिल एवढच झेपण्यासारख होत... तर तिच उत्तर ऐकुन सगळ्यत मोठा धक्क बसला... तिच्या निरिक्षणाला दाद दिली पाहिजे... ति म्हणाली स्नेहा उधर सबसे दुखी सिर्फ़ तुही लग रही थी .. ओर तु किस बेटी की बात कर रही है? तुने देखा नही वो सिल्क की अच्छीखासी प्रेस की हुयी साडी ऑर लिप्स्टिक लगाये हुवे आयी थी उसकीही मॉ के फ़्युनरल पर... तु ना पागल है ज्यादा सोचती है...छोड॥
मी निशब्द्च होते...

एक अजुन निर्लज्ज गोष्त म्हणजे या मरण सोहळ्याचे फोटो काढले जात होते

बुधवार, १८ जून, २००८

अघळपघळ

ह्म्म्म आजकाल माझ्यात मस्त बदल झालाय अस जाणवायला लागल आहे... (आधिच्या पोस्टवर जाऊ नका ते वर्षापुर्वी लिहलेल होत अत्ता पोस्ट केल ईतकच आणी हो ते काल्पनिक समजा) तर काय म्हणत होते ..माझ्यात झक्कस बदल झालाय... बदल नाही म्हणता येणार त्याला कारण मी अशीच होते आधी मध्ये काय फेफ़रं भरल होत कुणास ठाउक? माझा बंद पडलेला रेडिओ अर्थात तोंडाचा मस्त सुरु झालाय... आणी आमच FM चॅनलही मस्त फेमस झालय... ऑफिसात गप्प गप्प बसणारी मी आता धिंगाणा घालताना बघुन लोकं आश्चर्य व्यक्त करत होती... सगळ्यात लहान असल्या कारणाने स्नेहाच स्नेहा बच्चा कधी झाल कळलच नाही त्यांनाही अन मलाही... एकुणच धम्माल चालु आहे... गम्मत म्हणजे मी आजकाल माझी टेन्शस का काय म्हणतात तेही मस्त एन्जॉय करू लागलेय.. कस माहीत नाही पण करतेय हे नक्की... मध्येच चिडचिड होण साहजिक आहे पण त्रासलेली अज्जिबात नसते... सध्या हसा आणी हसु द्या अस धोरण सुरु केलंय.. ऑफिसात बरेच वाद विवाद आणी सगळ्याच ऑफिस मध्ये असत तस रादर जरा जास्तच राजकारण चालु होत आहे...मला हे एक कळल लोक ऑफ़िस मध्ये येऊन कामापेक्षा राजकारण जास्त खेळतात, हेच परिश्रम आणी डोकी कामात वापरली तर... असो पण माझ्यावर कुठलाच परिणाम जाणवत नाही हे आहो आश्चर्यम आहे... कारण बर्‍याचदा लोक मलाच मोहरा म्हणुन वापरण्याच्या प्रयत्नात असतात... पण मी दगड झाले का काय ठाउक नाही पण चक्क र्दुलक्ष करायला शिकलेय... जो दुश्मन है उनको भी हसाते है आजकल हम...त्यात दुधात साखर म्हणजे चिल्लु पिल्लु लोकांची शाळा सुरु झाली आहे... वर्गात जायचं आणी मज्जा करायची... त्यात काल शाळेचा पहिला दिवस होता... सगळ्या बाई लोकांना खुप काळजी वाटत होती.. की आज फक्त रडण ऐकाव लागणार.. पण अगदी तसच झाल अस नाही... त्या लोकांनी हसणार्‍या आणी खेळकर मुलांची जवाबदारी मस्त पार पाडली आणी रोंदुलाल डिपार्ट्मेन्ट आमच्या कडे नकळत सोपविण्यात आल... हम भी कुच कम नही सगळ्यात भयानक म्हणजे भोकाड पसरवण म्हणजे नक्की काय याची प्रचिती होत होती अशी दोन मुल जरा आवघड होती बस... त्यातला मुलगा नर्सरी मधला आणी एक ज्युनियर केजी मधला... या दोन केस सोडुन बाकी दाये हात का मल का काय म्हणतात तस होत... नर्सरीतल आमच कार्टुन... आदित्य नाव त्याच... इतका जोरात भोकाड पसरवल होत त्याने आणी त्याला कोणी धरलच तर त्याचे हातपाय जोरात लागायचे इतकच... त्याला मी उचलुन घेतल आणी पंधरा मिनिट शांत करण्याचा प्रयन करत होते... एक तर त्याची भाषा कोणती हे कळात नव्हत आणी त्या बिचार्याला इंग्रजी भाषा आवगत नव्हती... मग मी त्याच रडण कान देउन ऐकल... तर कळाल अरे हा तर मराठीत रडतोय... हुश्श झाल ... पाच मी त्याला समजावयाच म्हणुन विचारल आरे बाला तु शहाणा की नाही.. तर भोकाड पसरत नाहि मी वेडाssss मनात म्हटल चला आपल्याच जातीचा दिसतोय... कस बस पाच मिनिटात शांत केल .. आणी साहेब काही झालच नाही मला खुप मज्जा येतेय आशा आविर्भावात खेळायलाही लागले... त्याच्या वर्गातली शिक्षिका आणी त्याला सांभाळायचा प्रयत्न केलेले सगळे मला... 'कीती पराक्रमी ही' या नजरेतुन बघत होते... ;) केस नंबर दोन ज्युनियर केगी... त्या वर्गाकडे मी मोर्चा वळवला तिथे गेला एक तास ते कर्ट रडत होत याच नाव आर्या बर याच्या भाषेची कल्पना आधिच आलेली त्या मुले काय कराव सुचत नव्हत... तो तमिळ का मल्लु होता पण सुदैवाने त्याला आणी मला तोडक मोडक इंग्रजी येत होत.. पण साहेब ऐकतायेत कसले... याच चार जणांना बडवुन झाल होत.. आणी त्याच्या मात्रुभाशेत रडण चालु होत... आणी ती भाषा कोणालाच अवगत नसल्याने सगळ्यांच्या नाकी नौउ आले होते... शेवटी धिर करुन त्याला उचलुन घेतल.. आणी मला वाटल त्याची आता माझ्यावर वार होणार तर उलट झाल त्या पिल्लाला काय वाटल कुणास ठाउक मला बिलगल आणी मुसमुसुन रडु लागल.. मला काही सुचेना... मी त्याला काहीही न बोलता फक्त कुरवाळत राहीले आणी तो मला बिलगून बसला होता... हळु हळु त्याच मुसमुसण थांबल आणी इतर मुलांप्रंआने त्याच लक्ष ति.व्हि कडे गेल मग माझ्या कडेबघुन गोड हसला... माझ्या मांडिवर आसनस्थ होउन महाराज कार्टुन बघू लागले.. त्याच्या वर्गातल्या त्याच्या बाईंना गदगदुन आल.. केवढे हे उपकार... हे भाव तिच्या डोळ्यात दिसत होते...असो अजुनही काही गमती जमती आहेत... पण तुम्हाला पकवायच नाही... अघळपघाळ लिहीत गेलेय... आजुनही लिहावस वाटतय पण थांबवतेय॥ माझ प्रेमात न पडता '' आज़कल पॉव जमी पर नही पडते मेरे '' अस झालय॥

गुरुवार, १२ जून, २००८

एक भिजरी आठवण

पाऊस! पावसाच्या सरिंसोबत कित्येक आठवणी सुध्दा भिजतात ना? जणु प्रत्येक पावसाबरोबर त्याच्या सरींसोबत प्रत्येक आठवणी ओल्या होतात.. त्या कधी हसर्‍या असतात तर कधी नुसत्याच ओल्या...लहानपणी मज्जा म्हणुन डबक्यात मारलेल्या उड्या.. अन मग पाठुन बसलेले आईचे धपाटे ... आनि मोठेपणी जाणुन बुजुन व्हिनचिटर विसरुन मुदाम पाससात भिजणं अगदि रोजचच.. मग आईसाहेबांच्या बोलण्या... कशाचीच मुभा न राखता मनसोक्त भिजत रहायचं...प्रत्येक थेंबाबरोबर नवी आठवण अन मग पावसाची नि त्या आठवणींची चढाओढ.. मग कळत्रच नाही की आपण त्या आठवणींमध्ये जास्त भिजतो का त्या पावसात? साराच खुळा खेळ पण हवाहवासा.. कधी ते आठवणींचे क्षण पावसाशिवाय भिजवतात..तर कधी पवसासकट...तो पाऊसही तसाच आठवतो. तो गार वारा.. वेगाने येणार्‍या सरी.. मातीचा सुगंध.. मग माझ मलाच विसरुन त्या पावसाच्या सरि झेलणं .. नुसतच भिजत राहण... तशी मी वेडीच आहे पावसाकरिता.. पावसाच येण म्हणजे माझ भान हरपुन पावसाचचं होण... सगळ जग विसरुन जाऊन मन बागडु लागत.. त्या वेळेस मनाच वयं विचारायच नसतं.. सगळ्या सिमा रेषा ओलांडुन ते पावसाशी एक्रुप होत.. गाणं गुणगुणनं.. गिरकी घेण.. सगळ माझ्याही नकळत होत उरतो तो फ़क्त पाऊस अन मी (?)... त्या दिवशिही तसच झाल.. मी एकटीच होते पावसासोबत... आजुबाजुला कुणीच नाही.. त्या मुळे माझा अन पावसाचा जणु मुक संवाद चालु झाला.. त्याची प्रत्येक सर झेलण्याचा माझा खुळा प्रयत्न सुरु होता.. मी अन तो गुणगुणतच होतो... हाताच तळ करुन पावसाला साठवत होते मी.. मध्येच एखादी गिरकी घेत होते... एकुणच सगळा वेडा प्रकार (जगाच्या द्रुष्टीने) सुरु होता.. मी हरवुन गेले होते पावसात तित्क्यात तो आला.. माझ्या नकळत.. कठड्याला टेकुन उभा रहिला.. माझ्या कडे बघतच... मला कळलच नव्हत त्याच येण.. मी मनसोक्त भिजत होते आणि तो फ़क्त माझ्याकडेच बघत होता... एखाद्या कादबरीत किंवा पिक्च्र मद्ये घडाव तसा प्रसंग होता.. मी एक गिरकी घेता घेता माझ लक्ष त्याच्या कडे गेलं.. तो तसाच उभा होता माझ्याकडे टक लावुन... क्षणभर मला काही सुचलच नाही ... आणी चक्क चक्क मी लाजले (?) माझ मलाच आश्चर्य वाटल की मी लाजु शकते?.. असो त्याला भानावर आणत आणी मुख्य म्हणजे मी स्वतः भानावर यायला क्षण दोन क्षण तरि गेलेच असतील... संभाषणाला सुरुवात करावी म्हणुन मी विचारल, '' येतोस भिजायला?'' नंतर लगेचच दाताखाली जिभ गेली आणी स्वतःशीच पुटपुटले काय विचारल हे? तो नुसताच हसला.. मानेनेच नकार देत कोरदा चिट्ट तो म्हणाला अताच भिजलो... दोन मिनिटे मला कळलच नाही तो काय म्हणाला ते आणी जेव्हा समजल तेव्हा सुचलच नाही काय कराव ते... भिजलेली मी अन माझ मन पावसाच्या सरींमद्ये जास्त भिजलो का त्याच्या शब्दामद्ये कळलच नाही....
...स्नेहा