गुरुवार, २२ फेब्रुवारी, २००७

काय सांगु.....?

काय सांगु माला माझच काही कळत नाही..?
शब्द शब्द होता येत नाही प्रत्येक वेळेला...
मग सुरु होतात मौनांची भाषांतरे...
प्रत्येक क्षणांची गणिते...
चुक अचुक याची परवा नसते...
काय सांगु माला माझच काही कळत नाही..?
तशी मी बेफ़िकीर वागणार्‍यातली मुळीच नाही...
समाजाच्या चौकटीत जगणारी
असही म्हणता येत नाही...
स्वतःहाच्या शोधात हरावणारी मी
का? अस्तिवा करिता झगडणारी?
काय सांगु माला माझच काही कळत नाही..?

स्नेहा...