शनिवार, १७ फेब्रुवारी, २००७

निखळ पण हवहवसं....

लहान मुलं म्हटलं की आठवतो तो त्यांचा निरागस पणा...त्यांचं गोड हसणं.. सगळच खर खुरं.. त्या मद्ये कुठेच कसलाच खोटे पणा नसतो. सगळच हवहवसं वाटणारं...मला तर लहान मुलं खुप आवडतात...त्यांच बोबडं बोलणं.. हसणं रडणं लुटुलुटु चालणं सगळ्यातुन निरागसता डोकावत असते.... मला विषेष वाटत ते त्यांच्या बुध्धिमत्तेच.. अणि त्यांचे तर्क.. अफ़ाट असतात..... काही किस्से आहेत जे मला खरच थक्क करतात... आणि त्या लहान्ग्यान्च्या बुध्धिच कौतुकही वाटतं... ते आणि त्यांचे प्रश्न.... सगळच भन्नाट असतं
माझ्या मैत्रिनीच्या खालच्या फ़्लॅट मद्ये राहणार्‍या चिमुकल्याला त्याची आजी भरवत होती आणि त्याला भरवतानच ते संभाषण ऐकण्या जोग होतं... ते असं,
आजी ''पोळी GIRL असते म्हणुन आपण ती पोळी म्हणतो आणि भात हा BऑY असतो त्याला तो भात म्हणतात..... आणि भाजी GIRL म्हणुन ती म्हणतात''या वर सहेबांनी काय विचारले ठाउक आहे?'' आजी.... मगं वरण म्हणाजे काय गं GIRL की BऑY ?''आजीने काही सांगण्याच्या आधिच याचे उत्तर काय माहित आहे? ''वरण म्हणजे आजोबा... बरोबर ना आजी?
आजी बिचारी काय बोलणार?नंतर ऐकु आला तो हस्याचा स्फ़ोटच...माझा भाच्चा आहे पाच वर्षाचा.. पण त्याचे प्रश्न आणि त्याचे तर्क.. सगळच अतर्क आहे... त्यातुन सहेबांना गोष्टीइ ऐकायला खुप आवडतात ... रामायण तर FEVORATE एकदा मला बोलता बोलता म्हणाला, '' आत्या मी महिते तिन तीन तीन रण्या करणार..''मला पहिल्यांदा कळलच नाही त्याला काय म्हणायच आहे ते.. मी: म्हणजे?तो: अगं तीन तीन राण्या म्हणजे तीन वेळा लग्न करणार आहे... (मला काही सुचेच ना..तरीही विचारल) मी: का रे? तीन लग्न का?तो: अगं आत्या दश्रथाला नाही का तीन तीन राण्या होत्या?मी कपाळालाच हात लावला..काय सन्गावे याला... कसबस समजावुन सांगीतल...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: