शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २००७

अगदी नकळतच.....

नकळत नात्याची विण गुंफ़त जाते
भावने सकट..
स्व्प्नांची चित्र मग
मनात रेखाटत जातात...
आथवणीचे बांध्ही
मग बांधु लागतात...
हळवे बोलणे...
रुसणे.. फ़ुगणे..
चिंच आवळ्यासाठी
केलेली पोरकट भाड़णं..
एक वेगळ विश्वच असतं सारं.
मग आपल ते खोटं खोटं
घर घर खेळणं..
आज काय मग जेवयल?
पोळि भाजी ..वरण भात...
हे काय गं... रोजचचं काय ते?
हे बघ मुकट्याने जेउन घे अस दराडवणं
सगळच खोटं पण मानापसुन खेळणं
प्रत्येक खेळ मनापसुनचा असतो....
मग अचानकच तो का विस्कटतो...
हरवतो आपण आपल्यालाच...
गुरफ़टत जातो नव्या खेळात..
मग सारे पोरकट वाटु लगते..
स्व्तःहावरच हसु येउ लगते...
चिंच बोरं या व्यवहारत
जगणारे आपण..
कधी खर्‍या व्यवहारात हरवतो कळतच नसतं..
नंतर मात्र आथवणींशिवाय
कहीच उरत नसतं...
ती नकळत गुंफ़त गेलेलि घत्त
नात्यची विण कधि उसवते
हेही उमगत नसतं...
अगदी नकळतच.....


स्नेहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: