मंगळवार, २६ जून, २००७

उगाच का भावानांना उसणा बांध घालायचा?

सारा खेळ.. नियतीचा
अस म्हणुन भावनेंवर बांध घालायचे
अता असाच चालायच सगळ
म्हणुन पुढे जात राहायचे
मागे वळण्याची तिथे मुभा नसते
थांबण जगाला अन वेळेला मान्य नसते...
मनाला मत्र यतले काहीच पटत नसते...
मग खेचाखेच होते स्वतहाचीच
भांडण होत मनाचच मनाशी
वेळेशिवाय याला काहीच उपाय नसतो अस म्हणतात..
पण वेळही काय करणार बापडी?
मनालाच सार्‍याची सवय होणार..
मग किती सांभाळायचे स्वतहाला?
का बांध घालायचे भावनांना?
होउन देत ना सगळ मोकळ...
कोलमडलेल्या घराच्या भिंती सांभाळतबसण्यापेक्षा...
असवान्च्या प्रवाहात वाहुदेत ना सगळ...
मग यालाही नियतीचा खेळ म्हणायचा
उगाच का भावानांना उसणा बांध घालायचा?

...स्नेहा

३ टिप्पण्या:

सुशील गायकवाड म्हणाले...

छान.

Vidya Bhutkar म्हणाले...

आवडली. :-)
"मग यालाही नियतीचा खेळ म्हणायचा
उगाच का भावानांना उसणा बांध घालायचा?"
हे खास आवडलं.
-विद्या.

Sumedh म्हणाले...

hi sneha...

kavita khoop avadli .... tujhya kavita kiti hridayisparshi ahet...kharach tula devachi den ahe...ashich kavita karat ja ...majhe shubheccha nehmi tujhya barobar astil...grt..god bless u