शनिवार, ७ जुलै, २००७

सगळच एक स्वप्ना सारख वाटत
भिजवणारा पाउस
आणि त्याच्या सोबत आणिक भिजवणारी
तुझी नजर..
सगळच हवहवस
खरं पण अर्धवट राहिलेलं स्वप्न..
गोड स्वप्न...
नको आता त्याच पुर्ण होण
हसाल माझ्यावर
पण खरचं
त्या अपुर्णतेत अनामिक सुख आहे
मला सापडलेला फ़क्त माझाच पाउस आहे
पावसाच येण निश्चीत नसतं
जाणही...
तो फ़क्त येतो...
एकदाच...
पण त्याच तेच थेम्ब परत मिळत नाहि...
तसे ते क्षणही
परत गवसत नाही
उरते ती फ़क्त एक भिजरी आठवण..
मनात कोसळत राहणार्‍या पावसासह...
...स्नेहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: