शुक्रवार, २४ ऑगस्ट, २००७

उमेद

सकाळ्चे ६.३० वाजले असतील मी कल्याण स्टेशनवर होते. पुण्याल निघालेले. भोवतालची गर्दी, आवाज या वरुन आख्खी मुंबईच जागी झाली आहे असं वाटल... (पुण्याची आहे अस वाटण साहजीक आहे). या मुंबईकरांना पहील की आठ्वत ते घड्याळ, यांची आयुष्य घड्याळाला बांधलेली हे अचुक विधान आहे. पण क्षणभर एक विचार डोकावुन गेला... ही माणसं आहेत का मशीनस? नुसती धावतायेत... मग स्वतःहालाच म्हणाले काय हे स्नेहा इतका नकारार्थी विचार? आधी मुंबई खुप वेग़ळी वाटायची...स्वप्नाळु...ती स्वप्न पुर्ण करायची ताकद .. पुर्ण पडेल ते कष्ट सोसण्याची मुंबईच द्यायची.. देते.. मग अचानक असं का वाटवे मला? क्षणभर भितीच वाटली. आई गेल्यापासुन मन शुन्य झालेल पण भावनाही अश्या प्रतीत होतील? खुप कससं झाल... तितक्यात एका माणसाचा धक्का लागला.. तशी विचारांतुन झागी झाले(?)(भानावर आले असे नाही म्हणता येणार) सोबत मवशी काका होते.. त्यांच्याकडे बघत स्वतहाशीच हसले अन सहजच लक्ष उजवी कडील जिन्याकडे गेल... वारुळातुन मुंग्या बाहेर पडाव्यात तशी ती माणसं वाटत होती. माझ लक्ष वेधल ते त्या मुलाने.. जिन्याच्या एका कोपर्‍यात मस्त ताणुन दिली होती त्याने.... प्लॅटफ़ॉर्म वरील ती ग़जबज मद्येच येणार्‍या सुचना, आजुबाजुचा गोंधळ मद्येच च्याय आलेय अश्या तत्सम आरोळ्या…लोकांचे धक्के कशाचही भान न ठेवता तो शांत झोपला होता तो खर सांगु त्याला लहान नाही म्हणवत, त्याच्या वयाशिवाय त्याच्या आयुष्यात काहीच लहान नसाव... खुप थकला असेल नाही तो? खुप कामं केली असतील. म्हणुन तर एवढा गाढ झोपला आहे..ख़ाय हे? मी कुठेय? कसला त्रास आहे मला?किती तरी दिवस झाले मि झोपुच शकत नव्हते. ज़्होपेच्या गोळ्या हाच एक शेवटचा पर्याय पण त्या नाही घ्यायचा हा वेडा हट्ट.. त्या मुलाने आपल्या खुप वेगळ जग पाहील आहे ..आपल्या पेक्षा वेगळ.. रोज उठायच नव्या दिवसासोबत एकच स्वप्न अंगी बाळगुन की जगायच आहे... अजुन काय असणार त्याच आयुष्य? तितक्यात मावशी म्हणाली स्नेहा चल गाडी आली...मी फ़क्त शरीराने गाडीत चढले मन मात्र तिथेच रेंगाळत होते..

मना मद्ये नवे(?) प्रश्न होते.. माणसाला नसल्याच दुःख जास्त की असुन नसल्याच? का काही हरवल्याच?मनात नुसतेच प्रश्न आणी तो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: