शनिवार, २७ जानेवारी, २००७

काहीतरि गवसले होते मला...

काहीतरि गवसले होते मला...
काय होते ते समजायच्या आतच
सारे निसटुन गेले..
ओन्जळ रितीच राहिली..
कुठलासा सुवास मात्र क्षणंभर तसाच दरवळत राहिला...
कहीतरी गवसले होते मला..

तो क्षणं नाही वर्णवता येत..
काहीस गवसण्याच्या आनंदी असवांमद्येच
काही हरवण्याचे दुःख शामिल झाले..
काही समजण्याच्या आतचं
सारे काहि संपुन गेले....
काहीतरी गवसले होते मला..
त्याला म्रुगजळही नाही म्हणवत
तो क्षणं मी जगले होते...
निमिष मात्र का होइना मी
काहीतरी अनुभवले होते..
सारं होतं एका स्वप्ना सारख
हवंहवंसं वाटणारं...
पण.. पण जगात हव हवस वटत
ते कधिच मिळत नसतं
म्हणुन आयुष्य जगण सुधा सोदता येत नसत...
काहीतरि गवसले होते मला...
काय होते ते समजायच्या आतच
सारे निसटुन गेले..
स्नेहा...

1 टिप्पणी:

nikogetcat म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.