बुधवार, २५ एप्रिल, २००७

कित्येकदा आपण किती चुकतो?

कित्येकदा आपण किती चुकतो?
सरळ चलता चालता
वाकड्या वळणावर वळतो...
कधी कळत कधी नकळत...
पण वळतोच..
स्वतःहाला शोधण्याच्या नादात
स्व मद्येच हरवतो...
कित्येकदा आपण किती चुकतो?
माझं , मी , मला
करत 'त्याला' मात्र वेगळ करतो
तु , तुझ , तुला म्हणताना आपल्या अशा 'त्याला' परकं करतो
कित्येकदा आपण किती चुकतो?
कळत नाही अस करताना
आपण आपले किती असतो?
कुठलस सुख शोधताना
समाधान किती मिळवतो?
जगतो जगतो म्हणुन किती क्षण
जगायलाच विसरतो....
खरच..कित्येकदा आपण किती चुकतो?
...स्नेहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: