मंगळवार, १८ डिसेंबर, २००७

एक काटेरी मोरपीस...

का आठवतात नको त्या आठवणी...? बोचतात त्या मनात... छळ चालतो त्यांचा... कोण तो माझ काय त्याच्याशी घेणं देण? सगळ केव्हाच संपल आहे ... सुंदर दिसणार काटेरी स्वप्न होत ते॥ मी त्याला कधी ओळखलच नव्हतं... काटे दिसलेच नाही मला... जवळ घेतल गोंजारल.. हाताल बोचलेले काटेही कळले नाही.. नंतर दिसले ते फ़क्त रक्तबंबाळ झालेले हात ... हं वेडी मी त्याला तर काही झाल नाही ना म्हणुन त्याच्या जखमा शोधत बसले... आणी माझ्या हातावरच्या जखमा आधिकच खोल होत गेल्या मग... दोन वर्ष उलटुन गेली..ऽअजुनही सलतायेत त्या जखमा... पण आता वाटतय भावनाच बोथट झाल्या आहेत माझ्या... सवय झाली आता त्या जखमांची.. आत तोही मनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे .. मनाने तो कप्पा त्य जखमांसकट आजुन जपुन ठेवलाय .. एखाद्या मोरपीसासारखा .. पण हे मोरपीस काटेरी आहे हेहे न कळुन कस चालेल?... तरीही...


...स्नेहा

५ टिप्पण्या:

Tejaswini म्हणाले...

chhan lihites!

kateri morpis? sahich! khup chhan shabd vaprlays... can very well relate with this!

don म्हणाले...

ek number

अनामित म्हणाले...

morpis ha aataprayant me fakt mavu tyacha sparsh haluvar asto evedhch samajla hota pan katerihi asu shakto he aaj ya kavita mule jannavala
tya saathi dhnyawad
asach off the track vichar karat raha

अनामित म्हणाले...

Khup sundar lihila aahes...

no words 2 tell what i felt wen i read u r blog..

Abhijeet

अनामित म्हणाले...

Khup aswasth vichar vatatat...