मंगळवार, १८ डिसेंबर, २००७

समांतर

समांतर चाललो आहोत दोघी
एकमेकांना भेटण्याच्या
खुळ्या प्रयत्नात..
चाचपडतं जुन्या खुना
शोधतोय कधी न घडलेला भुतकाळ
काटेदार वाटांवरुन चालताना
लागत आहेत अनुकुचीदार वळणं
आंधारात डोळे दिपतील इतका
सहन न होणारा प्रकाश झळकतो मद्येच
तरीही समांतर चाललो आहोत दोघी...
एकमेकांना भेटण्याच्या
खुळ्या प्रयत्नात..
...स्नेहा

1 टिप्पणी:

आशा जोगळेकर म्हणाले...

सुंदर भाव आन नेमके शब्द .