गुरुवार, २६ नोव्हेंबर, २००९

तर्पण

२६/११/२००८ भारताच्या इतिहासातील काळा दिवस.. ते साठ तास मुंबई दहशती विरुध्द लढत होती... यात आमचे जवान आणि आमचे आधिकारी कामी आले.. तसच आमच्या देशाची यंत्रणा किती सXअम आहे तेही उघड झालच! एरवी गजबटाने नटलेली रात्र त्या दिवशी मात्र रक्त बंबाळ झाली होती आणि शुकशुकाटाच्या किंकाळ्या फोडत आक्रोश करत होती... आणि जॉर्ज जी.टी सारख्या हॉस्पिटलस् मध्ये जाणारे रस्तेही लाल झाले होते.. हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप लोक आणि लोकांचे देह घेउन येण्यार्या त्या ऑब्युलन्स चा ओघ थांबत नव्हता.. आख्खी मुंबई भेदरली होती.. बेसावधपणे तिच्यावर हला झाला होता.. ही काळी रात्र तब्बल तिन दिवसानंतर उजाडली.. तेव्हा आख्खी मुंबई एकत्र झाली... एकत्र येउन लोकांनि मेण्बत्या लावल्या पोस्टरस.स आणि काळ्या फीतीतून सगळ्यानीच निषेध नोंदवला...कोणी घोषणाही केल्या.. आता मेणबत्या विझल्या घोषणाही विरल्या हो कुठल्याश्या पोकळीत्परत आमची मुंबई धाऊ लागली ..पण दहशद संपली का ? याच उत्तर मिळवण्याची धड्पद तीच काय?

शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९

झुंज

किती छळतेय ती स्वतः? का? तिला कोणत्याच प्रस्नाच उत्तर मिळत नव्हत... मिळत नव्हत का ती शोधत नव्हती? का इतके आरोप पण तिच्यावर..?
थकली आहे ती.. रस्ता काट्यांचा कुठे विसावा घेणार..थकलेल्या पायांपेक्शा.. खोल खोल जखमा झालेल मन घेउन प्रवास करत करता कहिच नकोस झालय तिला.. पण का हरायच.. ही जिद्द आहेकुथेतरी जिवंत..पण त्याच बरोबर नव्याने एक प्रश्न त्या मनावर जखमा कर्तोय.. जिंकून करायच देखिल काय? कोणासाठी? त्या जखमांसकट लढण कठीण होत चाललय आत... असो.. अता पहायचय परिस्तिती आणी तिची जिद्द या मद्ये जिंकतय कोण?

सोमवार, १९ ऑक्टोबर, २००९

गुंता..

छान गोफ होता ..खरतरं एकमेंकात गुरफटून एकरुप झालेला..
पण त्यातली एक सर...उचकटुन टाकली .. ती सुटली त्या गोफातून...
जड दुःख तिलाही झालच असेल...पण तिचा गुंता नाही झाला...
पण ज्याच्यात गुरफटलेली त्या धाग्याचा गुंता झाला..
तो गुंता आता कोण सोडवणार?
तो गुंता..गुंता.. गुंता झालाय हे तरी कुणाच्या कुठे लक्षात आलयं?
असो...

बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

भोंडला

क्रूष्णाच अंगड बाई क्रूष्णाचं टोपड
धोब्या कडे धुवायला टाकिल
शिंप्याकडे शिवायला ताकील
चंद्रभागे खळबळलं
जाई-जुईवर वाळवल
चंदनाच्या पाटावर घडी घातली
घडीचा घडरंग बाई क्रूष्णाचा पलंग
चारी राट्री जन्मली श्रीक्रूष्ण गोपाळ..

बरीच गाणी आठवतायेत पण लिहालया गेले की सुचत नाहिये..:(
फ़ुरसतीत टाकेन.. सईच आहे ..कारल्याच वेल.. शिवाजी.. हरिच्या नैवद्याला... सासुरीच्या वाटे.. अजून्खूप खूप... :) तका बर पट पत
सॅम माझा खो तूला गं!


वेळ मिळत नाहीये.. नाहीतर आज आणि लिहली असती..

कळी चंद्रकला नेसू कशी नेसू कशी?
दमडीच तेल आणू कशी आणु कशी?
दमडीच तेल आणल आणल..
सासू बाईंची वेणी झाली ..मांजीची शेंडी झाली
उर्लेल तेल झाकून ठेवल..
लांडोरीचा पाय लागला..
सासूबाई सासूबाई अन्याय झाला..
वरण-भात जेवायला वाढा...

सोमवार, ७ सप्टेंबर, २००९

........

का रे? का असं वागतोस ?
मला रितं करुन पाठ वळवतोस?
अताशा तर आश्रुंचे फुटतही नाहीतं बांध
उघड्या डोळ्यांनी पहा...
आणि खरं आहे ते स्वतःलाच सांग...

तूझ चुकतयं रे...
कहितरी सांभाळताना
कोणालातरी तोडतो आहेस ...
याचा तूलाही त्रास होतोच की याचा...
मग सहजतेचा आव आणुन का बदलतो आहेस वाटा?

म्हणे वाटा बदलल्या तरी समांतर चालू
का म्हणून सगळ आयुष्य मी ओझ्याखाली काढू?

विचार कर अजुन उशीर नाही झाला
लढ जरा आणी सांग या जगाला...
तुझाही जीव अडकला आहे..
आणि तुझ्या नसण्याच्या नुसत्या
विचारानेच कोणाचातरी आयुष्यचं फाटलं आहे...

मंगळवार, २८ एप्रिल, २००९

वेडा (?)

एक्सक्युज मी मॅडम.... आय ऍम नॉट अ बेगर...ऍम एम.बी.ए स्टुडंट...ऍम स्टेयींग इन कॅम्प...सफरिंग फ्रॉम पॅरलायीसीस...प्लिज मॅम.. हेल्प मी आऊट.. गॉड विल ब्लेस यु.. प्लिSSSSSज
दाढी वाढलेली.. मळकट टी-शर्ट घातलेला.. धारेधार नाक आणि निस्तेज डोळे असलेला तो.. हेच स्वगत सगळ्यांना सांगत फिरतो.. नक्की कोण आहे तो? वेडा? भिकारी? का ड्रगज् हेडिक्ट? रोज सिग्नल वर फिरत असतो आणि आर्जवे करत असतो..
ही अवस्था का बर झाली असावी त्याची? त्याच ते बोलण ऐकताना सिग्नल सुटेपर्यंत ना ना विचार येउन गेले.. आजुनही उत्तर मिळत नाहित..
नक्की त्याच्या या परिस्थितीला कोण जबाबदार असेल? काहीही सुचत नाहिये खर तर.. तो वेडा(?) त्याची ती वाक्य.. मळलेला टी-शर्ट .. निस्तेज अन त्या कशालाही मेळ न खाणार त्याच ते धारेदार नाक...
(मी इथे हे सगळ का लिहल माहित नाही... जे वाक्य मनात आल ते जसच्या तस लिहीत गेले... का परत माहित नाही.. कदाचीत एका वाक्याचा दुसर्याशी सबंध नसेलही तरीही.. कारण ...माहित नाही...)

मंगळवार, १४ एप्रिल, २००९

किती कोरड असाव कोणी.. ?
काहीच कस रे आवडत नाही तुला..?
तो समजावणीच्या सुरात म्हणतो
अस कस म्हणतेस तू आवडतेस की मला...


...स्नेहा

बुधवार, ८ एप्रिल, २००९

तो

शब्दच सुचत नाहीत तुझ्या बद्दल लिहायच तर..
कविता तर दुरची गोष्ट आहे..
माझ्यातल्या कवितेचीच मला शंका येतेय आता..

...स्नेहा

सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

झगर-मगर

झगर-मगर झगर-मगर
दुनियाच साली झगर-मगर
लख लख लखकतेय पण च्यायला
हातीच काय लागत नसतय
फूस लावून स्वप्नांना नुसतीच
चमकत राहतेय..
झगर-मगर झगर-मगर
दुनियाच साली झगर-मगर

वाटंवरुन जाताना
फुललेली झाड..
नी मोठ्यालं तळं दिसतय
जवळ जाऊन पाहिल तर तिथ कुणीच नसतय
सर नुसतच फसवतय
झगर-मगर झगर-मगर
दुनियाच साली झगर-मगर

ठरवल सोनं नसल तर सोन उगळायच
व्हत्याच नव्हत सगळच करत्यात
अपन मात्र नव्हत्याच व्हत करायच
वांझोट्या जमिनीवर पेरायच
नुसत्याच झगरमगर दुनियेला
चमकुनच दावायच.. तवर चालु दे तिची
झगरमगर झगरमगर
साली.. दुनीयाच..

...स्नेहा

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २००९

आय मिस देम...

मागच्या जूनची गोष्ट आहे..मी खूप आनंदात होते.. माझी बढती झाली होतो.. ऑफिसमधली बैठी कामे करुन कंटाळा आला होता.. रुक्ष काम असल्यागत वाटायच (ते आहेच).. जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावर मराठीसाठी शिक्षक म्हणुन कोणाचीच नेमणूक झाली नव्हती.. त्यात आमची शाळा इंटरनॅशनल.. तिकडे मरठी भाषा माझ्या शिवाय कोणालाच अवगत नव्हती.. त्यामुळे मग काय मला मराठी शिकवायला सांगितले . मग आमची काय स्वारी भलतीच खूष झाली.. दिवसरात्र माझ्या डोक्यात फक्त एकच विषय.. मला शिकवता येईल का? मुलांना नक्की कस शिकवायच? पु.ल. आठवले ते म्हणाले होते शाळेत मराठी अस शिकवतात की त्या बद्दल प्रेम उरत नाही (मला त्यांचे शब्द जसेच्या तसे नाही आठवत पण.. )मग जबाबदारी आणि वाढली अस वाटल.. पण मी ठरवले होते मी वेगळ्या पध्द्ती ने शिकवणार.. तसही आमच्या शाळेत शिकवण्याच्या पध्दती खासच आहेत.. त्याचे प्रशिक्षणही शिक्षकांना दिले जाते ,पण मराठी बाबत अस कुठलच प्रशिक्षण नव्हत.. मूळात महाराश्ट्रात मराठी हव या राज ने केलेल्या हट्टाचा हा परिणाम होता नाही तर कदाचित मराठी आमच्या शाळेत शिकवलही गेल नसत.. (असो..) तर मग अशा प्रकारे शिकविण्याची संधी मिळालीमाझा वर्गात शिकवण्याचा पहिला दिवस... इ.७वी... मी मुलांना शिक्षक म्हणून पहिल्यांदाच भेटणार होते.. त्यामूळे अर्थातच उत्सुक होते.. वर्गात गेले तेव्हा द्रुश्य काहीस वेगळच होत.. मुलं वैतागलेली होती.. ''मराठी.. :( '' अशी त्यांची प्रतिक्रिया.. ''आम्ही फ्रेंच घेणार आहोत आम्हाला मराठी नकोय'' अस सरळ मला शिकायचे काही जणांनी सांगितले. मी शांतपणे ऐकून घेतल सगळ.. ''बर ठिक आहे.. आपण मराठी शिकायचे की नाही हे नंतर बघु.. आपण आधी गप्प मारुयात..'' मी सुरु झाले.. पण त्या मुलांची कळी खूलतच नव्हती.. ते बोलत होते पण काहीसा आव आणुन मोठ्या मुश्किलीने ते मोकळे झाले.. मग आमची मस्त गट्टी जमुन आली.. मी वर्गात गेल्या गेल्या आमची सगळ्यांची मस्ती सुरु व्हायची.. इतर शिक्षक डोकावून जात की वर्गात शिक्षक नसावा इतका गोंधळ.. पण मग इतरांनाही त्याची सवय झाली... मुलांशी बोलल्यावर मला कळल त्यांना मराठी का शिकायच नाही ते. ऐकुन मला धक्का बसला होता.. मला वर्गातल एक मुलगा म्हणाला 'माझा ड्राईव्हर मराठीत बोलतो' तर लगेच दुसरी मुलगी म्हणाली, 'माझी कामवाली बाई मराठी बोलते'. 'मराठी ईस चिप लॅन्गुएज.. एवढी खालची लोक मराठी बोलतात' ही माझ्या विद्यार्थ्यांची मत ऐकून आधी एकेकाच्या वाजवावीशी वाटली असती पण मला माहित होत ही त्यांची मत नाहीत.. मी त्यांच ते डिस्कशन ऐकुन घेतल आणि त्यांन म्हणाले तुम्हाला माहितेय तुमच्या टिचरची (म्हणजे माझी) मातृभाषा काय आहे? बहुतेक मुलांच्या माना नकारात्मक डोलल्या.. काही जण उगाच सांगायच म्हणुन गुजराथी मारवाडी बंगाली अस काहीस सांगीतल.. मग मी म्हाणाले नाही तुमचा ड्राईव्हर आणि कामवाली जी भाषा बोलते तीच माझी मातृभाषा.. मुलांना आश्चर्य वाटल.. आणि गिल्टीही.. मग त्यांना मी समजावुन सांगीतल कोणतीही भाषा असो ती श्रेष्ठच असते. मला कळतय की प्रत्येकाला आपलीच भाषा आवडते पण याचा अर्थ अस दूसर्‍या कुणाचीही भाषा निच वगैरे आणि पेशा वरुन स्टेटस या वरुन भाषा ठरत नसते... मग मी लता मंगेशकर वैगेरे उदाहरणं दिली.. मुलांना त्यांची चुक उमगली.. आमच्या वर्गात एक मुलगी तर थेट अमेरिकेवरुन भारतात आलेली.. ही मुल ३री ते ७वी ची पण एकालाही मुळाक्षरे आणि बाराखडी येत नव्हती सगळाच उजेड.. मुळात परिक्षार्थी असलेली ही मुल भाषेची गोडी यांना समजलीच नव्हती.. मग काय.. मी निरनिराळे प्रयोग सुरु केले.. हे सगळ मजेच्या स्वरुपात चालु होत.. मी मुलांना कधीच सांगितल नाही मी त्यांना शिकवतेय.. मी त्यांन पहिल्यांदा गाणी म्हणायला सांगितली.. पण प्रत्येकाने शक्यतो आपापल्या मातृभाषेत गायला सांगितले.. मग माझी वेळ आली.. मी त्यांच्यासाठी ''ससा रे ससा कापुस जसा गायले..'' मुलांना फार आवडल गाण मग हळूहळू त्यांआ ससा म्हणजे काय वैगेरे सांगायला सुरवात केली.. अश्याने त्यांचा शब्दकोष वाढत चालला.. दुसरी कडे मला त्यांच्या बाराखडीच काहीतरी करायच होत.. तेही त्यांन कळू न देता मग मी युक्ती लढवली.. माझ्या नाटकाची एक एक्झरसाईज् आठवली.. मी फळ्या वर 'क' काढला.. मुलांना विचारले हे काय आहे? वर्गात एकालाही लवकर ओळखता आला नाही.. मग मीच सांगितल की हा आहे 'क'.. आता आपण एक गेम खेळू यात'' .. मग मी फ़ळ्यावर लिहीले.. कंक कंकण कंकई कंकईला.. आणि उचार करुन दाखवला.. आता मी अनुक्रमे प्रत्येकाकदुन हे म्हणुन घेत होते.. काहींची उगाच बोबडी वळत होती.. काहींना लाज वाटत होती.. पण नंतर सगळ्यांनाच त्याची मजा वाटु लागली.. मग हे रागात.. रडत हसत..लाजत.. मोठ्यांदा हसत.. अशा वेगवेगळ्या एक्सप्रेशन मद्ये त्यान्च्या कडून करुन घेतल... त्यांचा 'क' कच्चा न राहता एतका मस्त पक्का झाला तेही हसत खेळत.. मग क ख ग.. करत बाराखडी पुर्ण झाली.. सोबत उच्चारही अस्खलीत.. एव्हाना मुलांची मस्त मैत्रिण झाले होते मी..ते पण त्यांची सुख-दुःख ते माझ्याबरोबर वाटत होते.. ५वीतल्या एका मुलाने तर मला मस्त कॉन्मल्पीमेंट दिली.. निकुंज सरांची.. :) मुलांन खूप आनंद झाला होता.. त्यांना बरखडि न अडखळता लिहिता आणी म्हणता आली होती तेव्हा.. आणि मला त्यांच्या पेक्षा जास्त ..पण कुणास ठाऊक काय नजर लागली? ऑफिसमधल्या राजकारणामुळे.. माझ्या कडून शिक्षकपद काढून घेतल.. आणि वरकढनी सांगितल ''रेग्युलर टिचर नाही होऊ शकत तू पण सबस्टिट्युट टिचर म्हणुन तू आहेस..''खूप वाईट वाटल होत मला.. नवीन शिक्षिका वर्गात जेव्हा गेली तेव्हा कित्येक दिवस मुल हिरमुसून बसलेली असायची.. मी तर मुलांच्या समोर जाण टाळायचे.. समोर आली की हात पकडुन ठेवायचे आणि विचारत राहयचे तुम्ही का नाही येत.. मी शुन्य नजरेने त्यांच्या कडे बघायचे.. काही सुचायच नाही बोलायला.. इतकच म्हणायचे नविन टिचरही छान आहेत.. त्यांच ऐकत जा.. पण मुल हट्टने हात सोडायची नाहीत.. एकदा शेवटी त्यांच्यावर ओरडले.. मनात नसताना.. सरख विचारत जाउ नका... :( आणि कसंबसं तिकडून निघुन आले..आता इतक्या महिन्यांनी आम्हा दोघांनाही सवय झाली.. आणि सत्य कुठेतरी अम्ही स्विकारलं अस वाटत होत.. पण परवा ३रीतल्या निमेषने परत विचारल तुम्ही केव्हा येणार म्हणुन तेव्हा परत त्या प्रश्नाने मन हेलावल..

सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

Happy Valentines day

व्हेलेंटाइन डे जवळ आलाय.. हे कॉलेज मध्ये गेल्यावर कोणी ना कोणी याची आठवण करुन देतच.. मला त्याच्यात काही सोयर ना सुतक.. (हे हे म्हतार्‍यांसारख बोलायला लागलेय).. मी एकतर माझ्या व्हेलेंटाइन डेला माझ्या आई कडुन गिफ़्ट उकळायचे... आणि आई मला कौतुकाने द्यायची.. आणि मी माझ्या जवळच्या लोकांना म्हणजे माझ्या छोटुस काहितरी द्यायचे.. मजा यायची.. पण आता.. खरच कशात इट्रेस्ट उरला नाहिये.. (जास्त टेन्शन वैगेरे घेऊ नये.. मी खूष आहे..). पण आहे ते असं आहे...
माझ्या आयुष्यात 'तो' जर आलाच तर बिचार्‍याची काय अवस्था होइल देवास ठाऊक.. ('तो' कोण हे अजुन माहित नाही.. कळल्यास तुम्हालाही कळवेन)
तर इथे मी अशी आणि माझ्या ऑफिस मद्ये एक पिउन आहे (वाय वर्श ४५ दोन मुलांची आई तेही बर्‍याच मोठ्या).. ती मला आज सांगत होती मला ना १४ला सुट्टी हवी होती नवर्‍याबरोबर व्हेलेंटाइन साजरा करायचा होता.. आणि नेमक रविवार असून ऑफ़िस आहे.. मला यावर काय बोलाव सुचेना.. मला म्हणे ''मी त्यांच्या साठी दोन शोर्ट शर्ट घेतलेत..'' मी फ़क्त हसले.. म्हणाले जमल तर लवकर जा आणि मजा करा..

किती सही ना?? आपल्या जवळ आपली माणसं असली की प्रत्येक सण सण म्हणुन साजरा करता येतो..

रविवार, ४ जानेवारी, २००९

..

कभी कभी लगता है
खुदकोही पेहेचानही ना दुँ
कौन है तू?
आयिने में देखकर पूछती भी हु
तब आयिना धुंदलासा नजर आता है
एक बुँद टपककर कहेती है
अब तू तो पराया मत कर..
...स्नेहा


कधीतरी स्वतःलाच ओळख द्याविशि वाटत नाही
कोण आहेस तू...
आरश्यात पाहुन स्वतःलाच विचारते मी
तेव्हा आरसाही पुसटसा दिसु लागतो..
एक अश्रु टपकतो अन् म्हणतो
आता तू तरी परक नको करु...

( जास्वनंदी आणि Mइ..मराठीत लिहीली बरं का?)

हे हे हे ही ही :P

हसण हसवण
मला जगायचय विदुषकाच जिणं

एक मुखवटा चढवायचाय पर्मनंटली
चिटकवायचाय चेहर्‍यावर
त्याचे रंग मात्र पक्के हवेत
कुठल्याच पाण्याने न पुसणारे
हसण हसवण
मला जगायचय विदुषकाच जिणं

तस सगळच मस्त नाट्यमय आहे..
फक्त तोच तोच चेहरा
मला अन् सगळ्यांनाच नकोसा झालाय
आता जरा वेगळा चेहरा हवाय
अजुन जगण्यासाठी...
हसण हसवण
मला जगायचय विदुषकाच जिणं

...स्नेहा