सोमवार, १७ मार्च, २००८

क्लेयर बाईंचे डोहाळे... :)

क्लेयर बाई.... आमच्या ऑफ़िस मध्ये ही परदेशी बाई (बाई मणजे वाचायला आणी ऐकायला ऑड वाटतं माहित आहे पण .. असो मला म्हणायच आहे) तर क्लेयर बाई वय वर्ष ३०-३२ असाव... निळे शार डोळे... आणी गोरा (का पांढरा म्हणावा?) असा रंग वजन म्हणजे आता अजुन जास्त खाल्ल तर फ़ुटेल अस वाटत...इतक... उंची पाच दोन असावी.... अश्या सुंदर तरुणीने एका भारतीय तरुणावर प्रेम केलं ... आणी इंग्रज जरी देश सोडुन निघुन गेले आणी आपला देश स्वातंत्र झाला... तरी त्या बिचार्‍या तरुणाने आपलं पारतंत्र अस ओढवुन घेतल... (अस म्हणतेय कारण तिची मर्जी सांभाळण खरंच कठीण आहे)... अश्या तर्‍हेने क्लेयर बाईंच आगमन भारतात..मुंबईत झालं आता ती आमच्या परदेशीय शाळेमध्ये व्यवस्थापनात आहे... मी जेव्हा तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला जरा दडपणच आल होत.. एक तर तिची भाषा आणी माझ इंग्रजीच ज्ञान.. म्हणजे जरा कठीणच होत.. त्यातुन ती बोलते त्याला आपण फ़ारफ़ार तर पुटपुटण म्हणु... इतक्या हळु आवाजात बोलायची तिला सवय... पण तरीही कसबस मला तिच बोलण समजु लागल...आणी आता आम्ही गप्पाही मारु लागलो... पण मध्येच दोन आठवडे बाई रजेवर ? काळलं नव्हत... मग दोन आठवड्यांनंतर बाई आल्या त्या गुड न्युज घेउन... तशी खबर आम्हाला आधीच मिळाली होती ;) .. पण तिला गोड बातमी सांगीतल्यावर नव्याने आंनद दाखवावा लागला होता... आम्ही डेरी मिल्क देउन त्यांच तोंड गोड केल... त्या नंतर मग मज्जा सुरु झाली ... काय खायच काय खायच नाही... हे मला जेवढ माहीत तेवढ तिला आज्जी बाईंसारख मी सांगीतल....मग झाल बाई रोज विचारु लागल्या काय खाउ ते? पण ह्या इंग्रजांना डोक जरा कमीच या बाबतीत... हा निष्कर्श निघाला.. कारण बाई उलट्या होतात म्हणुन स्प्राइटची अर्धा लिटर बाटली दिवसाला रिकाम्या करु लागल्या.. एकदा असच ती स्प्राईट विकत घेत असताना तिला म्हणाले हे चांगल नाही तुझ्या साठी तर तिने ड्युक्स ची बाटली उचलली याला आता काय म्हणावं ? तिला म्हणाले पी बाई स्प्राइट्च पी... सांगुन तसाही काहीच उपयोग नाही... पलथ्या घड्यावर पाणी... बाईंना डोहाळे कसली तर मॅगडॉनल्ड्चा चॉकलेट मिल्कशेक आणी पनीर सॅल्सा खायचा... चायनीज नुडल्स... आणी देव जाणे अजुन काय ते.... तिला सफ़रचंद व फ़ळ खायला आवडत नाहीत... फ़ास्ट फ़ूड जिव की प्राण... आधीच वाढता वाढता वाढे... एकटा जिव असेल तर ठीक आहे हो... पण...
आता उत्सुकता आहे ते ते कार्टुन कार्ट कसं निघेल याची कारण क्लेयरशी लग्न केल तो केरळचा मल्लु आहे... त्याच वर्णन करण्याची गरज नाही तुम्हाला कल्पना आलीच असेल... :) आता सहा महिन्यांनी काय तो निकाल लागेल... तो पर्यंत क्लेयर बाईंचे डोहाळे पुरवण्याची जवाबदारी ऑफ़ीशीयल नसली तरी ऑफ़ीस मध्ये माझीच... देव करो तिला सुबुध्दी मिळो...

बुधवार, ५ मार्च, २००८

बरस जा बादल...

बरस जा बादल
मेरे ही अंगना...
मुझे पानी पानी होने दे...
आखो से बरसती मेघा
और तुझमे कोइ फ़र्क सा ना रहे...
बरस जा बादल मेरे ही अंगना...
आज मन मे बोहोतसा बोझ है
फ़िर भी मन हलका है
ये अजिब कश्म्कश मे मुझे खोने ना दे
तेरी रुह मे मुझे समेट ले
बरस जा बादल मेरे ही अंगना....
...स्नेहा



पहिल्यांदाच हिंदीत लिहितेय... माहित नाही कशी झाली आहे. तुमच्या प्रतिसादाची उत्सुकता वाटतेय... आणी भितीही... खर सांगा जमली आहे का नाही ते..