शुक्रवार, २८ डिसेंबर, २००७

परिघ....

प्रत्येकालाच असते...
स्वप्नांनी व्यापलेल
भावनांनी साठलेलं
आपलं अस परिघ..........
पण शुन्यही पण गोल असतो
त्यालही परिघ असतेच ना?...
त्याचा नेमका अर्थ काय?
हे कुणालाच ठाउक नसते
सारा बहुदा शुन्याचा खेळ
शुन्याने शुन्याला गुणायचं
अन शुन्य म्हणुनच उरायच...
का दिवसेंदिवस व्यापत जाणार्‍या
त्या परिघात हरवायच?
...स्नेहा

Bye Bye 2007

नविन वर्ष... आता नाही म्हणता म्हणता नवीन वर्ष उजाडतय.... २००७ ने बरच काही हिसकावुन घेतल... बरीच नवीन वळण दाखवली... आयुष्य असही असत ह्याची जाणिव करुन दिली... या वर्षात खुप काही हरवल मी आयुष्यातल... माझी आई सुद्धा... पण नव्याने जगवायला लावणार २००८ समोर दत्त म्हणुन उभ आहे... काय गवसल आणी गमवल या विचारांपेक्षा आता काय करयच हे ह्याच वर्षात मी शिकले...या पुढे कधी हताश व्ह्यायच नाही हा येणार्‍या वर्षाचं रेझोल्युशन... या पुढे नवी स्वप्न नव्या दिशा स्वगतासाठी सज्ज झल्या आहेत... आकाशही निरभ्र पणे सज्ज होऊन माझ्या झेपेची वाट बघतय... ही नवी सुरुवात आहे नव्याने जगण्याची... नव्या वर्षाच स्वागत असो....

शनिवार, २२ डिसेंबर, २००७

हे हे हे..... :)

हे हे हे..... मी उद्या किंवा परवा पुण्यात येत आहे............... :) मनावरच मळभ निघुन गेलय... नुसत्या विचारांनी मन खुश होतय.... सही... खुप आनंद झालाय.. मन अचानक उड्या मारु लागलय.... तब्बल अडिच महिन्या नंतर माझ्या घरी जाणार मी...:)पवसाळ्यात कधी कधी खुप दाटुन येत... सगळ जग मरगळलेल वाटु लागत आणी..मग.. अचानक खुप दिवसानंतर सुर्यदेवाच दर्शन घडत... तसं काहीस वाटतय.... मी खरं सांगु मला कळत नाही मी काय लिहित आहे आणी का? पण खुप खुश आहे इतकच महिती आहे मनाला... सगळीच मरगळ निघुन गेली मनावरची... आता लक्ष ते पुण्याला जाणार्‍या गाडीवर... सो मित्र-मैत्रिणींनो भेटुया...

बुधवार, १९ डिसेंबर, २००७

कुजबुज

आठवतायेत ते स्पर्श
मुके पण खुप काही सांगणारे..
ते डोळे फ़क्त मला शोधणारे..
ती हाक मायेने गहिवरुन आलेली...
ती वाट...
जिथे तु माझी प्रतिक्षा करत असलेली..
ती वाट तिथेच आहे कदाचीत...
पण तिथे तुझे स्पर्श ..
तुझे भावनेने ओथंबलेले डोळे..
तुझे गहिरे शब्द
आणी तु...कोणीच उरलेल नाही...
नाही म्हणता म्हणता सगळच संपल
निमिषर्धान.....
एका हंबरड्यासह....
तो भयाण आवाज अन त्या नंतरची शांतता...
आजुनही कुजबुजते आहे कानात.....


स्नेहा

मंगळवार, १८ डिसेंबर, २००७

एक काटेरी मोरपीस...

का आठवतात नको त्या आठवणी...? बोचतात त्या मनात... छळ चालतो त्यांचा... कोण तो माझ काय त्याच्याशी घेणं देण? सगळ केव्हाच संपल आहे ... सुंदर दिसणार काटेरी स्वप्न होत ते॥ मी त्याला कधी ओळखलच नव्हतं... काटे दिसलेच नाही मला... जवळ घेतल गोंजारल.. हाताल बोचलेले काटेही कळले नाही.. नंतर दिसले ते फ़क्त रक्तबंबाळ झालेले हात ... हं वेडी मी त्याला तर काही झाल नाही ना म्हणुन त्याच्या जखमा शोधत बसले... आणी माझ्या हातावरच्या जखमा आधिकच खोल होत गेल्या मग... दोन वर्ष उलटुन गेली..ऽअजुनही सलतायेत त्या जखमा... पण आता वाटतय भावनाच बोथट झाल्या आहेत माझ्या... सवय झाली आता त्या जखमांची.. आत तोही मनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे .. मनाने तो कप्पा त्य जखमांसकट आजुन जपुन ठेवलाय .. एखाद्या मोरपीसासारखा .. पण हे मोरपीस काटेरी आहे हेहे न कळुन कस चालेल?... तरीही...


...स्नेहा

समांतर

समांतर चाललो आहोत दोघी
एकमेकांना भेटण्याच्या
खुळ्या प्रयत्नात..
चाचपडतं जुन्या खुना
शोधतोय कधी न घडलेला भुतकाळ
काटेदार वाटांवरुन चालताना
लागत आहेत अनुकुचीदार वळणं
आंधारात डोळे दिपतील इतका
सहन न होणारा प्रकाश झळकतो मद्येच
तरीही समांतर चाललो आहोत दोघी...
एकमेकांना भेटण्याच्या
खुळ्या प्रयत्नात..
...स्नेहा