बुधवार, ३० एप्रिल, २००८

ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...

ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...
तो धावत होता
पण हाती येण्यासाठीच
पण कधीतरी चुकतोच अंदाज
मग खुप दुर होत जात अंतर
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

कधी येतो तो हातात
मग राज्यही तोच घेतो
आपण धावतो अन तो पकडायला येतो
मग जणुन बुजुन आपण त्याच्या हाती लागतो
मह्णतो आपण बास आता
शांत बसु या... पण हट
कळाला अन कदाचित त्यालाही हे मान्य नसत
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

कितीही धावल तरी
लवकर हाती सापडतच नाही
मग दमतो आपण..
तो मात्र दमत नाही
धावत सुटतो दुर दुर
आपनही पळत असतोच
पण त्याचा वेग आता वाढत जातो
तो आपल्याला विसरुन
दुसर्‍याच डाव खेळु लागतो
आपण मात्र.....
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

...स्नेहा

बुधवार, २३ एप्रिल, २००८

कागज़ के फ़ुल ..

कागज़ के फ़ुल ..
कागज़ के फ़ुल आज़कल मेहेंगे हो गये है
असली फ़ुल तो फ़िर भी मुस्कुराते है
पर उस मुस्कान के पिछे
कुछ दर्दसा छुपा है जैसे
कागज़ के फ़ुल आज़कल मेहेंगे हो गये है..

सब अपने हिसाबसे जिते है इधर
हसते है बोलते है कभी चुप से होते है
अपनेही मर्जी के मालीक..
असली फ़ुल मुरझा जाते है
फ़िर बदलने पडते है
कागज़ के फुलो का अच्छा है
मुरझाते भी नही
दिखते भी सुंदर है
रही बात खुषबु की..
उतना तो एगजेस्ट होता है भाई
वैसे तो आज कल खुशबु भी
बाजारो में मिलती है
कागज़ के फ़ुल आज़कल मेहेंगे हो गये है
कागज़ के फ़ुल ॥

...स्नेहा

नुसतीच साद..

साद घालतेय मी
कुणीच दाद देत नाही
सादही मुकीच माझी
मनातुन दिलेली फक्त
कदाचित कुणाच्याच
अंतरापर्यंत न पोहचणारी
तरिही साद घालतेय मी...

शब्दांसह बोललं
तरीही नेमका भावार्थ
पोहचत नाहीच..
मग शब्दच खोटे वाटतात
कागदी फुलांसारखे...
पण शब्दांना तरी का दोष द्यायचा?
समोरच्याला ते ऐकायचच नसत
ते बहुदा त्यांना हव तेच ऐकतात..
नाहीतर फ़क्त गैरसमज होतात...
नुसतीच साद घालतेय मी .......

...स्नेहा

गुरुवार, १० एप्रिल, २००८

आजकाल...

आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास..
समोर येईल ते मुकट्याने जगण
मी खरचं का कधी अशी होते?
उंच उडण्याची माझी इच्छा
माझ आभाळ.. माझ नवं क्षितिज..
सगळच शोधतेय मी..
कुठे आहे सारं?
आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)
काय आहे हे नेमकं?
याला जगणं नक्कीच नाही म्हणत..
कुठे आहेत त्या भावना ते माझे शब्द?
सगळच काळाआड दडलयं
का माझ्या मागे लपलयं?
आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)
मला नाही जगवत आश्याने
पावल मागे वळवताही येत नाही
पंखातल बळ चक्क गेल्यासारख वाटतंय
झेप घेण्या आगोदरच
आभाळ माझ फाटलंय...

आता फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)

...स्नेहा

आभाळ माझ फाटलंय... या ओळीच श्रेय विरेन्द्रला जात बरं का?



मंगळवार, १ एप्रिल, २००८

भरकटं... एक उनाड दिवस

आज मला फ़क्त मोकळ व्हायला लिहायचयं... (नेमकी गोची कुठे होते माहित आहे का? माझ नाव चक्क इथे दिसत.. म्हाणजे कधी कधी वाटत टोपन नावाने जर ब्लॉग सुरु केला असता तर काय बिघडल असत? मग अश्या वेळी जास्वंदी आणी संवादिनी सारख्या लोकांचा हेवा वाटतो असो) तरीही आज मी मोकळेपणाने आणी काहीही विषयावर म्हणुन लिहणार नाही.. केवळ मुक्तछंद... मला नेमकं काय लिहायच आहे माहित नाही पण लिहायच आहे काहितरी... विचित्र मनस्थिती आहे ना ही... म्हणजे खुप साठलय नेमक कशावर लिहु कळत नाही....मी ना आज काल जरा विचित्र वागायला लागले आहे.. म्हणजे अस काही करते जी ते केल्यावर 'मी'अस केल? असा प्रश्न मलाच चकीत करुन जातो.. आता परवाच बघा ना? रविवारचा दिवस.. हॉस्टेल मधुन घरी जायची इच्छा नव्हती (हे घरच्यांनी कोणी वाचल तर माझी वाट लागेल इतक नक्की) तर मला घरी कोणाकडे जावस वाटत नव्हत... होस्टेलवर नुसत बसुन राहण स्वभावात नाही.. नक्की करु तरी काय? हे असे प्रश्न पुर्वी मला कधी पडले नव्हते कारण मुळात मी उद्योगी पण मी कधी काळी खुप उद्योगी होते हे अत्ताच्या मला बघुन कोणी म्हणनार नाही हे नक्की... (मी वाहवत चालले आहे ना?) हं तर मी शेवटी रविवारी पहाटे १० ला उठले... परत काय करायचा हा मोठा प्रश्न आ वासुन उभा होता जणु... पटापट आवरल आणी दादरचं प्लाझा गाठलं... एकटीने पिक्चर बघायची ही माझी पहिलीच वेळ... पण आमच्या प्रिय मित्रांपैकी बर्‍याच जणांना माझी दया वाटायची की मी केवळ ते दुर आहेत आणी कोणाची सोबत नाही म्हणुन सिनेमे बघत नाही... :( पण मग त्यांचेच उद्देश एकटी जायच सरळ... मग शेवटी मीही धाडस केल... आणी वळुच तिकीट काढल... थेटरमध्ये शिरताना द्विधा मनस्थिती होती... येस आपण एकटे आलो.... लोक शेजारी बरी मिळु दे रे देवा...पण मग काहीच वाटल नाही एकदा तो सिनेमा सुरु झाला की माझ कुठे लक्ष जात कोणाकडे? मद्यांतरात दोन सामोसे आणी एक कॉफ़ी एकटीनेच मट्टम केली.. पिक्चर संपला आवडला..पण लोकांना आवडला इतका नाही.. ते जाऊ देत.. तर बाहेर पडले आता पुढे काय हा प्रश्न परत दत्त म्हणुन आमच्या समोर उभा... तर मी परत मला आहो आश्चर्यम वाटेल अस काम केल... त्याच थेटर मध्ये रेस लागला होता बघण्याची विषेश अशी इच्छा नव्हती तरीही लायनीत उभी राहीले... आणी तिथे एक मुलगी स्मित हास्य देत आली ''मेरे लिये दो तिकिट्स निकालोगी प्लिझ...'' म्हणाली असही आम्हाला कोणाला नाही म्हणता येत नाही आणी म्हटल बर आहे कोणी टवाळ पोर नको शेजारी त्या पेक्षा हिच बरी म्हणुन तिन तिकिट्स काढली तिच्या हातात दोन सोपविली आणी मी माझ्या वाटेला जाणार तितक्यात तिने तिच्या मित्राची ओळख करुन दिली.. मी विषेश रस नाही दाखवला करण मी स्वतःची कंपनी एनजॉय करत होते.. पण ती दोघे कदाचित जरा जास्तच चांगली होती... त्यांना बिचार्‍यांना मझा एकटेपणा बघवला नाही आणी झाल त्यांची बडबड सुरु.. माझ्यातल पुणेरी मन खर तर जाग होत होत पण मी आडवल.. मग जवळ जवळ जबरदस्तीनेच मला शेजारच्या हॉटेलात नेण्यात आलं आणी मला न विचारता पेप्सी मागविण्यात आल... डोक खरतर फ़िरत होत पण मी सगळ्याला हसुन सामोरी जात होते का याच उत्तर मलाही माहीत नाही... मला ना समोरच्याला दुखवता येत नाही ते दोघे अनोळखी होते पण असे वागत होते जसे मी त्यांच्या बरोबरच आले आहे.. झाल आश्या प्रकारे आमच्या सुखावर विर्जण पडल (कारण एकटेपणाचा कंटाळा आलेली मी खुप महिन्यांनंतर तो एनजॉय करत होते).. मग काय त्यांच्या सोबतच परत आमची स्वारी थेटरात... एकदाचा पिक्चर सुरु झाला.. आणी त्या निशा नामक मुलीची टकळीही तिही हिंदीत.. मला नं नाटक सिनेमा या मध्ये कोणी बडबड केली की डोक्यात जाते .. सांगावस वाटत की आपण तो तास नंतर ठेउ ... मग शेवटी मी तिला सांगीतल बाई सिनेमा कसाही असो पण मला तो सहन करता येतो पण शेजारच्यांची बडबड नाही... अर्थात अगदी अस नाही सांगीतल.. आणी खरच तो सिनेमा पाहण्याचा निर्णय घेण्याची दुर्बुद्धी आम्हांस कुठुन सुचली असे वाटुन गेले.. इतका वाईट होता... झाल एकदाचा संपला सिनेमा... मला टेन्शन आल की हे दोघ आता मला कुठे जाण्यास विचारु नये म्हणजे मिळवल माझ्या डोक्यात आता पुढे काय याच उत्तरही होत...त्यांनी तसा प्रयत्न केला पण तो मी फ़ोल ठरवला... सरळ सांगीतल की मठात जातेय... ते सरळ निघुन गेले मला बाय म्हणुन.. चांगले होते बिचारे.. झाल मग मठात जाउन आल्यावर वेगळाच फ़्रेशनेस जाणवला मग चालत चालत स्टेशन गाढल... आणी परत होस्टेल ... मी गादीवर पडल्या पडल्या स्वतःशी हसले हे अस काही करेल अस स्वप्नात वाटल नव्हत... पण हा दिवस उनाड पणे जगले.. आणी खरच जगले..
[फ़ार पाल्हाळ लावल आहे वाटेल.. पण काहीही विचार न करता लिहीत सुटले होते.. पण इथेही उनाड्पणे लिहल आहे.. जे सुचेल ते :P]