गुरुवार, २२ फेब्रुवारी, २००७

काय सांगु.....?

काय सांगु माला माझच काही कळत नाही..?
शब्द शब्द होता येत नाही प्रत्येक वेळेला...
मग सुरु होतात मौनांची भाषांतरे...
प्रत्येक क्षणांची गणिते...
चुक अचुक याची परवा नसते...
काय सांगु माला माझच काही कळत नाही..?
तशी मी बेफ़िकीर वागणार्‍यातली मुळीच नाही...
समाजाच्या चौकटीत जगणारी
असही म्हणता येत नाही...
स्वतःहाच्या शोधात हरावणारी मी
का? अस्तिवा करिता झगडणारी?
काय सांगु माला माझच काही कळत नाही..?

स्नेहा...

मंगळवार, २० फेब्रुवारी, २००७

अस्मितेच्या नावाखाली..........

अस्मितेच्या नावाखाली
सहन केल तिने सारं
त्यांना देव मानल
त्यांना चार चौघात
वरमाला घातली होती
तिने त्याच्या गळ्यात...
त्याने मात्र तिला वाटुन घेतलं
पाच जणांत...
तीही हो म्हणाली...
समाजाच्या चौकटी मोडुन सुध्धा
अभिमानने जगली होती....
अस्मितेचा पदर पांघरुनच बसली होती...

पण त्यांनी काय केल?
धर्माच्या नावाखाली आणि
सत्याचे झुल पांघरुन
तिला द्रुतात लावलं
तिच्या समर्पणाच असं बहुलं केलं
तीच रडणं ओरडणं त्यांनी सहन केल
पण स्वतःहाच्या
शब्धाला जस्त महत्व दिलं
आपले पणाच ओलावा
त्यांनी असा संपवला होता...
ती मत्र अस्मितेच्या नवा खाली
सर काही सहन करत आली

ती अग्निकन्या होती
पण तेवत रहीली ज्योती सारखी
मनामद्ये मात्र
खुपचा जाळ लपलेला होता....
त्याचे कोणाल काहीच नव्हते
होती ती फ़क्त तिच्या अस्तिवची ओढ...
आन स्वतःहाच्या अहंकारची जिद्द...
ती मत्र अस्मितेच्या नावा खाली
सार काही सहन करत आली...

स्नेहा

शनिवार, १७ फेब्रुवारी, २००७

निखळ पण हवहवसं....

लहान मुलं म्हटलं की आठवतो तो त्यांचा निरागस पणा...त्यांचं गोड हसणं.. सगळच खर खुरं.. त्या मद्ये कुठेच कसलाच खोटे पणा नसतो. सगळच हवहवसं वाटणारं...मला तर लहान मुलं खुप आवडतात...त्यांच बोबडं बोलणं.. हसणं रडणं लुटुलुटु चालणं सगळ्यातुन निरागसता डोकावत असते.... मला विषेष वाटत ते त्यांच्या बुध्धिमत्तेच.. अणि त्यांचे तर्क.. अफ़ाट असतात..... काही किस्से आहेत जे मला खरच थक्क करतात... आणि त्या लहान्ग्यान्च्या बुध्धिच कौतुकही वाटतं... ते आणि त्यांचे प्रश्न.... सगळच भन्नाट असतं
माझ्या मैत्रिनीच्या खालच्या फ़्लॅट मद्ये राहणार्‍या चिमुकल्याला त्याची आजी भरवत होती आणि त्याला भरवतानच ते संभाषण ऐकण्या जोग होतं... ते असं,
आजी ''पोळी GIRL असते म्हणुन आपण ती पोळी म्हणतो आणि भात हा BऑY असतो त्याला तो भात म्हणतात..... आणि भाजी GIRL म्हणुन ती म्हणतात''या वर सहेबांनी काय विचारले ठाउक आहे?'' आजी.... मगं वरण म्हणाजे काय गं GIRL की BऑY ?''आजीने काही सांगण्याच्या आधिच याचे उत्तर काय माहित आहे? ''वरण म्हणजे आजोबा... बरोबर ना आजी?
आजी बिचारी काय बोलणार?नंतर ऐकु आला तो हस्याचा स्फ़ोटच...माझा भाच्चा आहे पाच वर्षाचा.. पण त्याचे प्रश्न आणि त्याचे तर्क.. सगळच अतर्क आहे... त्यातुन सहेबांना गोष्टीइ ऐकायला खुप आवडतात ... रामायण तर FEVORATE एकदा मला बोलता बोलता म्हणाला, '' आत्या मी महिते तिन तीन तीन रण्या करणार..''मला पहिल्यांदा कळलच नाही त्याला काय म्हणायच आहे ते.. मी: म्हणजे?तो: अगं तीन तीन राण्या म्हणजे तीन वेळा लग्न करणार आहे... (मला काही सुचेच ना..तरीही विचारल) मी: का रे? तीन लग्न का?तो: अगं आत्या दश्रथाला नाही का तीन तीन राण्या होत्या?मी कपाळालाच हात लावला..काय सन्गावे याला... कसबस समजावुन सांगीतल...

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २००७

अगदी नकळतच.....

नकळत नात्याची विण गुंफ़त जाते
भावने सकट..
स्व्प्नांची चित्र मग
मनात रेखाटत जातात...
आथवणीचे बांध्ही
मग बांधु लागतात...
हळवे बोलणे...
रुसणे.. फ़ुगणे..
चिंच आवळ्यासाठी
केलेली पोरकट भाड़णं..
एक वेगळ विश्वच असतं सारं.
मग आपल ते खोटं खोटं
घर घर खेळणं..
आज काय मग जेवयल?
पोळि भाजी ..वरण भात...
हे काय गं... रोजचचं काय ते?
हे बघ मुकट्याने जेउन घे अस दराडवणं
सगळच खोटं पण मानापसुन खेळणं
प्रत्येक खेळ मनापसुनचा असतो....
मग अचानकच तो का विस्कटतो...
हरवतो आपण आपल्यालाच...
गुरफ़टत जातो नव्या खेळात..
मग सारे पोरकट वाटु लगते..
स्व्तःहावरच हसु येउ लगते...
चिंच बोरं या व्यवहारत
जगणारे आपण..
कधी खर्‍या व्यवहारात हरवतो कळतच नसतं..
नंतर मात्र आथवणींशिवाय
कहीच उरत नसतं...
ती नकळत गुंफ़त गेलेलि घत्त
नात्यची विण कधि उसवते
हेही उमगत नसतं...
अगदी नकळतच.....


स्नेहा

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २००७

विरहात ...

विरहात अस वाहुन जायच नसत
हे मान्य आहे
पण विरहानंतर रदयच तळणं
अशक्यच आहे...
फ़क्त स्वःत त्यत भिजुन बुदुन जौ...
इतकही रडायच नसतं..
दोन सरीतच स्वतःहाला थंबवयच असतं..
कोणही अश्रु पुसणार नहि यचहि भान
ठेवायच असतं...
मग शुन्यात बघत
कोणलही शोधयच नसत...
इतकही कोणामद्ये स्वतःहाल हरवायच नसत...
विरहात अस वाहुन जयच नसत...
ज्य वळनावर भेटलो तिथे
परत कधी जायच नसत..
विरलेल्या क्षणांन परत
कधि शोधायच नसत...
खुळा खेळ असतो सारा मनानेच
मनाशी रचलेला....
मिटलेली कवाडं परत उघडत नसतात
वाजवण्याचे खुळे खेळ चालुच रहतात..
म्रुगजळच्य मागे मनं ढवत बसतं
कुठल्यश्या अठवणिंचे वेदे अर्थ लावत बसत...
विरहात अस वाहुन जायच नसतं..

स्नेहा....