गुरुवार, २८ फेब्रुवारी, २००८

नाहि चिरा...नाहि पणती....

सौरभच नाहि चिरा...नाहि पणती.... वाचल आणी एकदम आठवल...मी १०वीत असतानाची गोष्ट आहे... करगील युध्द सुरु होत॥ शाळेत मग एक उपक्रम म्हुणुन आम्हा सगळ्यांना कोरे टपाल पत्र हातात दिली.. आणी सांगीतल की सैनिकांना पत्र लिहा.. सांगा आम्ही तुम्हाला विसरलो नाहीत... मला खरच नाही महीत इतर मुलींनी काय लिहल काय नाही.. पण मी खुप मनापासुन ते पत्र लिहल होत... नेमक काय लिहल हे नाहि आठवत.. पण लिहीताना डोळ्यात पाणी होत.. झाल.. ते पत्र कारगीलला जाउन पोहोचल... जशी सगळ्याची पत्र पोहचली... मग नंतर काही मुलींना त्या पत्राची उत्तर खुद्द सैनिकांकडुन आली... सगळी उत्तर औपचारीक होती... पण सैनिका कडुन पत्र? पेपरात छापुन सुध्धा आलेल.. मी जराशी हिरमुसले होते कारण माझ्या पत्राला कोणाचच उत्तर नव्हत मिळाल... तशि सगळ्यांना उत्तर नव्हती आली..पण.. तरीही... पण एक दिवस उजाडलाच पोस्टमन काकांनी मी शाळेत जाण्याच्या तयारीत असतानाच ते माझ्या हातात दिल... मला सुचतच नव्हत काय कराव... खुद्द एका सैनीकाने मला पत्र लिहल? काय असेल त्यात...? मग मी हळुवार्पणे ते आंतर्देशीय सैनिकी पत्र फोडल... आणी... पत्र वाचुन खुप भरुन आलेल...माझ पत्र कुण्या आर.के.पठानीया नावाच्या सैनिकाकडे पोहचल होत.. ते जणु माझ्याच पत्राची वाट बघत होते.. कारण ते बॉर्डरवर होते.. आणी पुढे वाचतील न वाचतील या शंकेत... त्यांच्या सख्या बहिणीच नाव होत स्नेहलता.. ते तिच्या पत्राची वाट बघत होते.. त्यांच्या सगळया अप्तिष्टांची पत्र त्यांना मिळाली होती फ़क्त बहिणीनेच पत्र पाठवल नव्हत आणी त्यांची ती लाडकी बहिण... पण ज्या वेळेस त्यांच्या हातात माझ पत्र पडल... त्यांना खुप समाधान मिळाल.. ते म्हणाले स्नेहा और स्नेहलता क्या फ़रक पडता है? त्यांनी त्या पत्रात बरच काही लिहल होत... पण सगळ्यातुन एकच जानवत होत ते म्हणजे त्यांना त्यांच्या बहिणीच पत्र मिळल याच समाधान.. मी सगळ नाही मंडु शकत... पण त्यांनी मला त्यॉहा पत्त आवर्जुन दिला होता... आणी बजावल होत... ये पत्त न किसीको देना अथवा फ़ाड देना... मला पत्राच उत्तर आल पण ते सगळ्यांपेक्शा वेगळ होत... माझ्या नकळत मला एक भाऊ मिळाला॥ तोही साधासुधा नाही तर सैनिक... त्या नंतर लगेचच राखी पौर्णीमा होती...मी राखी पाठवली... त्याचही उत्तर अगदि संक्षिप्त मिळाल॥ त्या मद्ये अस लिहल होत की ते मला ओवाळणी पाठवु शकत नाहीत कारण ते खुप वर होते॥ परतलो की पथवेन म्हणाले होते... पण अजुन मला माझी ओवळणी नाही मिळाली ना परत कुठल्याही पत्राच उत्तर...मी अजुन वाट बघतेय....
(मी पत्राबद्दल संक्षिप्तपणे नाही लिहु शकत॥ त्या बद्दल क्षमस्व।)


...स्नेहा

सोमवार, २५ फेब्रुवारी, २००८

समुद्राची गाज ऐकली आहे कधी?

समुद्राची गाज ऐकली आहे कधी?
उधाणलेल्या समुद्रची.. धीर गंभीर..
पण बोलकी तर कधी नुसतीच शांत.. स्तब्ध
वार्‍याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर
तो नाद अधिकच कानात शिरतो...
मग डोळे मिटुन वारा झेलत ती गाज
ऐकत बसायची....
तो सुर्यही त्या निनादाच्या ओढीने
समुद्राच्या जवळ येत असतो...
अन् मीही माझ्या नकळत ...
पण सुर्याची ओढ कदाचीत माझ्यापेक्षा जास्त असावी..
त्याला सहज एकरुप होता येत...
पण मी...?
समुद्राची गाज ऐकली आहे कधी?

...स्नेहा

शोध..(?)

मन कुठे ते सापडेना
काही केल्या काहीच उमगेना..
मग कळाल सारच व्यर्थ शोध असतात..
आपल्या सावल्या आपल्या हातात कधीच येत नसतात..
...स्नेहा

बहुदा माझा मुड हा सद्या असाच आहे.... कुणास ठाउक परत मझ्या नकळत परत कसलासा शोध सुरु होइल...

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २००८

संवाद.. नाही वाद.. स्वतःचा स्वतःशी...

आपण मृगजळ नक्की कोणाला म्हणतो? आपल्या अपुर्ण स्वप्नांना.. का अशक्य असाध्य अश्या स्वप्नांना? की मनाच्या वेड्या हट्टांना? मनाचे वेडे हट्ट म्हणजे नक्की कात? मनाने बघितलेल एक वेड स्वप्नच ना? मग त्यालाही मृगजळ म्हणायच?कधीकधी वाटत म्रुगजळ म्हणजे स्वत:च्या अपयशाला दिलेल गोंडस नाव!



छे! मृगजळ म्हणजे असाध्य स्वप्न नाही... ती एक वेडी आशा आहे... जगवुन जाणारी.. जगवणारी.. असाध्य अपुर्ण नाही पण वेड असावं अस एक स्वप्न आहे.. पुर्णत्वाच्या शंका असल्या तरी त्याच्या अस्तीत्वाची ओढ आहे.. मनाला सुखावुन टाकणारी एक शक्ती आहे... त्याला अपयश का म्हणाव?



ते अपयशाचच चिन्ह आहे.. आणी म्रुगजल हे अस्तीत्व हे सांगण्यात कुठे आलयं शहाणपण? वेडं स्वप्न? काय करायचय वेड्या स्वप्नात जगुन? पुर्णत्वाच्या शंका असल्या तरि त्याच्या पाठी लगायच ? कुठली आली आहे शक्ती मनाला सुखावुन टाकणारी? सगळा खुळा खेळ आहे आहे हा... स्वतःशी स्वतः खेळलेला खुळा खेळ.. कधीही घातक ठरु शकतो...



असु देत खुळा खेळ.. असु दे घातक..पण तो जगवतो.. रोजच्या शहाणपणात एक वेडेपणा माफ़ असतो.. आणी शहाण शहाण म्हणुन किती जगाव? एकदा वेडेपणा करुन बघावं ...



इतका वेळ असतोच कोणाला? या शहाणपणाच्या जगात एकही वेडेपणाची चुक क्षम्य नाही... जग किती धावतय बघ.. त्याच्याबरोबर धावायच का आपल्याच विश्वात हरवायच? आणी एक चुक म्हणता म्हणता आपल्याला हजार चुका करायची सवय लागते... मग चुका करायच्याच कशाला? उगाच मनाचे फ़ाजील लाड?



वेळ..वेळ काढला की मिळतो... आणी या शहाणपणाच्या शर्यतीत धावुन तोच तो पणा येतो..काय क्षम्य काय अक्षम्य सगळ शेवटी अपल्याच हाती असत... आणी जगा बरोबर धावता धावता अपण अपले असे किती उरतो? तो वेडेपणा स्वतःला भेटायला का होइना कामी पडतो.. बघ तुझ्या व्यव्हारी भशेत बोलायला लागले मी... पण हो मी हा असा स्वतःला भेटण्याचा प्रयत्न करते.. तुझ्याच भाषेत सांगायच झाल तर एक खुळा प्रयत्न....