मागच्या जूनची गोष्ट आहे..मी खूप आनंदात होते.. माझी बढती झाली होतो.. ऑफिसमधली बैठी कामे करुन कंटाळा आला होता.. रुक्ष काम असल्यागत वाटायच (ते आहेच).. जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावर मराठीसाठी शिक्षक म्हणुन कोणाचीच नेमणूक झाली नव्हती.. त्यात आमची शाळा इंटरनॅशनल.. तिकडे मरठी भाषा माझ्या शिवाय कोणालाच अवगत नव्हती.. त्यामुळे मग काय मला मराठी शिकवायला सांगितले . मग आमची काय स्वारी भलतीच खूष झाली.. दिवसरात्र माझ्या डोक्यात फक्त एकच विषय.. मला शिकवता येईल का? मुलांना नक्की कस शिकवायच? पु.ल. आठवले ते म्हणाले होते शाळेत मराठी अस शिकवतात की त्या बद्दल प्रेम उरत नाही (मला त्यांचे शब्द जसेच्या तसे नाही आठवत पण.. )मग जबाबदारी आणि वाढली अस वाटल.. पण मी ठरवले होते मी वेगळ्या पध्द्ती ने शिकवणार.. तसही आमच्या शाळेत शिकवण्याच्या पध्दती खासच आहेत.. त्याचे प्रशिक्षणही शिक्षकांना दिले जाते ,पण मराठी बाबत अस कुठलच प्रशिक्षण नव्हत.. मूळात महाराश्ट्रात मराठी हव या राज ने केलेल्या हट्टाचा हा परिणाम होता नाही तर कदाचित मराठी आमच्या शाळेत शिकवलही गेल नसत.. (असो..) तर मग अशा प्रकारे शिकविण्याची संधी मिळालीमाझा वर्गात शिकवण्याचा पहिला दिवस... इ.७वी... मी मुलांना शिक्षक म्हणून पहिल्यांदाच भेटणार होते.. त्यामूळे अर्थातच उत्सुक होते.. वर्गात गेले तेव्हा द्रुश्य काहीस वेगळच होत.. मुलं वैतागलेली होती.. ''मराठी.. :( '' अशी त्यांची प्रतिक्रिया.. ''आम्ही फ्रेंच घेणार आहोत आम्हाला मराठी नकोय'' अस सरळ मला शिकायचे काही जणांनी सांगितले. मी शांतपणे ऐकून घेतल सगळ.. ''बर ठिक आहे.. आपण मराठी शिकायचे की नाही हे नंतर बघु.. आपण आधी गप्प मारुयात..'' मी सुरु झाले.. पण त्या मुलांची कळी खूलतच नव्हती.. ते बोलत होते पण काहीसा आव आणुन मोठ्या मुश्किलीने ते मोकळे झाले.. मग आमची मस्त गट्टी जमुन आली.. मी वर्गात गेल्या गेल्या आमची सगळ्यांची मस्ती सुरु व्हायची.. इतर शिक्षक डोकावून जात की वर्गात शिक्षक नसावा इतका गोंधळ.. पण मग इतरांनाही त्याची सवय झाली... मुलांशी बोलल्यावर मला कळल त्यांना मराठी का शिकायच नाही ते. ऐकुन मला धक्का बसला होता.. मला वर्गातल एक मुलगा म्हणाला 'माझा ड्राईव्हर मराठीत बोलतो' तर लगेच दुसरी मुलगी म्हणाली, 'माझी कामवाली बाई मराठी बोलते'. 'मराठी ईस चिप लॅन्गुएज.. एवढी खालची लोक मराठी बोलतात' ही माझ्या विद्यार्थ्यांची मत ऐकून आधी एकेकाच्या वाजवावीशी वाटली असती पण मला माहित होत ही त्यांची मत नाहीत.. मी त्यांच ते डिस्कशन ऐकुन घेतल आणि त्यांन म्हणाले तुम्हाला माहितेय तुमच्या टिचरची (म्हणजे माझी) मातृभाषा काय आहे? बहुतेक मुलांच्या माना नकारात्मक डोलल्या.. काही जण उगाच सांगायच म्हणुन गुजराथी मारवाडी बंगाली अस काहीस सांगीतल.. मग मी म्हाणाले नाही तुमचा ड्राईव्हर आणि कामवाली जी भाषा बोलते तीच माझी मातृभाषा.. मुलांना आश्चर्य वाटल.. आणि गिल्टीही.. मग त्यांना मी समजावुन सांगीतल कोणतीही भाषा असो ती श्रेष्ठच असते. मला कळतय की प्रत्येकाला आपलीच भाषा आवडते पण याचा अर्थ अस दूसर्या कुणाचीही भाषा निच वगैरे आणि पेशा वरुन स्टेटस या वरुन भाषा ठरत नसते... मग मी लता मंगेशकर वैगेरे उदाहरणं दिली.. मुलांना त्यांची चुक उमगली.. आमच्या वर्गात एक मुलगी तर थेट अमेरिकेवरुन भारतात आलेली.. ही मुल ३री ते ७वी ची पण एकालाही मुळाक्षरे आणि बाराखडी येत नव्हती सगळाच उजेड.. मुळात परिक्षार्थी असलेली ही मुल भाषेची गोडी यांना समजलीच नव्हती.. मग काय.. मी निरनिराळे प्रयोग सुरु केले.. हे सगळ मजेच्या स्वरुपात चालु होत.. मी मुलांना कधीच सांगितल नाही मी त्यांना शिकवतेय.. मी त्यांन पहिल्यांदा गाणी म्हणायला सांगितली.. पण प्रत्येकाने शक्यतो आपापल्या मातृभाषेत गायला सांगितले.. मग माझी वेळ आली.. मी त्यांच्यासाठी ''ससा रे ससा कापुस जसा गायले..'' मुलांना फार आवडल गाण मग हळूहळू त्यांआ ससा म्हणजे काय वैगेरे सांगायला सुरवात केली.. अश्याने त्यांचा शब्दकोष वाढत चालला.. दुसरी कडे मला त्यांच्या बाराखडीच काहीतरी करायच होत.. तेही त्यांन कळू न देता मग मी युक्ती लढवली.. माझ्या नाटकाची एक एक्झरसाईज् आठवली.. मी फळ्या वर 'क' काढला.. मुलांना विचारले हे काय आहे? वर्गात एकालाही लवकर ओळखता आला नाही.. मग मीच सांगितल की हा आहे 'क'.. आता आपण एक गेम खेळू यात'' .. मग मी फ़ळ्यावर लिहीले.. कंक कंकण कंकई कंकईला.. आणि उचार करुन दाखवला.. आता मी अनुक्रमे प्रत्येकाकदुन हे म्हणुन घेत होते.. काहींची उगाच बोबडी वळत होती.. काहींना लाज वाटत होती.. पण नंतर सगळ्यांनाच त्याची मजा वाटु लागली.. मग हे रागात.. रडत हसत..लाजत.. मोठ्यांदा हसत.. अशा वेगवेगळ्या एक्सप्रेशन मद्ये त्यान्च्या कडून करुन घेतल... त्यांचा 'क' कच्चा न राहता एतका मस्त पक्का झाला तेही हसत खेळत.. मग क ख ग.. करत बाराखडी पुर्ण झाली.. सोबत उच्चारही अस्खलीत.. एव्हाना मुलांची मस्त मैत्रिण झाले होते मी..ते पण त्यांची सुख-दुःख ते माझ्याबरोबर वाटत होते.. ५वीतल्या एका मुलाने तर मला मस्त कॉन्मल्पीमेंट दिली.. निकुंज सरांची.. :) मुलांन खूप आनंद झाला होता.. त्यांना बरखडि न अडखळता लिहिता आणी म्हणता आली होती तेव्हा.. आणि मला त्यांच्या पेक्षा जास्त ..पण कुणास ठाऊक काय नजर लागली? ऑफिसमधल्या राजकारणामुळे.. माझ्या कडून शिक्षकपद काढून घेतल.. आणि वरकढनी सांगितल ''रेग्युलर टिचर नाही होऊ शकत तू पण सबस्टिट्युट टिचर म्हणुन तू आहेस..''खूप वाईट वाटल होत मला.. नवीन शिक्षिका वर्गात जेव्हा गेली तेव्हा कित्येक दिवस मुल हिरमुसून बसलेली असायची.. मी तर मुलांच्या समोर जाण टाळायचे.. समोर आली की हात पकडुन ठेवायचे आणि विचारत राहयचे तुम्ही का नाही येत.. मी शुन्य नजरेने त्यांच्या कडे बघायचे.. काही सुचायच नाही बोलायला.. इतकच म्हणायचे नविन टिचरही छान आहेत.. त्यांच ऐकत जा.. पण मुल हट्टने हात सोडायची नाहीत.. एकदा शेवटी त्यांच्यावर ओरडले.. मनात नसताना.. सरख विचारत जाउ नका... :( आणि कसंबसं तिकडून निघुन आले..आता इतक्या महिन्यांनी आम्हा दोघांनाही सवय झाली.. आणि सत्य कुठेतरी अम्ही स्विकारलं अस वाटत होत.. पण परवा ३रीतल्या निमेषने परत विचारल तुम्ही केव्हा येणार म्हणुन तेव्हा परत त्या प्रश्नाने मन हेलावल..
१३ टिप्पण्या:
well done
खूप सुंदर अनुभव आहे स्नेहा! एखाद्या शाळेत शिकवणं तेही international शाळेत ’मराठी’ हे आव्हानात्मक असतं.
आईच्या शाळेतल्या मुलांबाबतीतचा असाच अनुभव मी लिहीणार होते; आणि आज तुझं हे पोस्ट वाचलं:)
छान काम केलंयस....शुभेच्छा!!
absolutely fantastic!
MIND BLOWING!!!
अनुभव छान शब्दबद्ध केलाय! :-)
तुमच्या अनुदिनीवरील "आदरपूर्वक श्रद्धांजली" खूप आवडली!
@ कोहम.. केतन धन्यवाद
@ सखी.. अगं आव्हानात्मक होत.. पण नंतर मुलांना विषय आवडल्या नंतर काहिच वातल नाही.. मराठी सारखा तास त्यांना जास्त वेळ हवा असायचा.. मधल्या सुट्टीतही बाहेर न पळता वर्गात बसून राहयचे म्हणायचे आम्ही नंतर खाऊ.. :) मज्जा यायची..
अणि अगं लिही की आवडेल वाचायला तूझ्या आईचा अनुभवही..
@ केतन .. thanx
@अभिजीत धन्यवाद.. आणि
''आदपूर्वक श्रध्दांजली''ते चित्र विरेंद्रने बनवलय त्याच श्रेय त्याला जात आणि ओळी अर्थातच ग्रेसांच्या.
Sahi lihila ahes.Good!
Yavar upay mhanje ata sachin Tendulkar la Marathi cha 'brand ambassador' kela pahije :)
आपली ओळख नाही. परंतु "सहज सुचलं म्हणून" वरून इकडे आलो. हा स्वानुभव खरच एका पुलप्रेमीला शोभणारा आहे. भाषा पुस्तकातून काढून ती हसण्यात वागण्यात बोलण्यात आणणं हेच आपले शिक्षक विसरतात. तुझा प्रयत्न सुंदर, अभिनंदन!!
मला संस्कृतची मनापासून आवड! म्हणून अभियान्त्रिकीबरोबरच संस्कृत पदविकाही घेतली. पण या वर्षी जेव्हा खऱ्या अर्थाने संस्कृतमधून बोलता येऊ लागलं तेव्हा खरी मजा आली!!
त्यामुळे लेख वाचताना अधिक आनंद झाला.
changla post aahe!! khup aavadla!! shikshan kasa asaava hyacha ek uttam udaaharan aahe...
vastavik bhaasha vishayaatle dhade aaplyala barach kaahi sangnya sathi astaat, pan te baryach vidyarthyanna kalat nahi aani te samjavun denya cha prayatna shikshak karat nahit...
@ makarand thanx..
@ vinay
mala kharach mahit nahi majhi padhat ek uttam udaaharan hoti kinva navhati... majha taa ya adhi shikshan kshetrashi sambadh navhata... paN mala kasa nako aahe te mahit hot so ha ek prayatn hota..
काही माणसं वेगळ्याच मिशनवर ह्या जगात येतात गं... तू शिक्षक झालीस तर तुझं आणि तुझ्यामुळे कित्येकांचं सोनं होईल!
Regards!
hey hi! अनेक महिन्यांनी तुझ्या ब्लॉगला भेट देतोय! हा लेख वाचून खूप बरं वाटलं. आणि तुझी पध्दत उत्तम आहे. तु सिल्विया ऍश्टन-वॉर्नर ची "टीचर" वाचली आहेस? नसशील तर वाच. मला तु ज्या पध्दतीने त्यांचे शब्दभांडार वाढवलेस ते वाचुन या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण झाली. या शिवाय त्तोत्तोचान वाच. लक्षात ठेव विद्यार्थ्यांना हवंहवंस वाटणारा/री शिक्षक असण्यासारखा सन्मान नाहि असं मला वाटतं. मला चाणक्य सिरीयल मधल आर्य चाणक्यांचा धनानंदा बरोबरचा एक संवाद आठवतो - "शिक्षक को सामान्य समझने कि भूल मत करना धनानंद!! निर्मिती व प्रलय दोनो उसकी कोख मै खेलते है! और तुमने मेरे जिस ग्यान को ललकारा है गर उस ग्यान मै ताकद रहि तो मेरा पालन करनेवाले सम्राटों का निर्माण मै खुद कर लुंगा, उसके लिये मुझे किसी धनानंद कि आवश्यकता नहिं है!!!"
टिप्पणी पोस्ट करा