एक्सक्युज मी मॅडम.... आय ऍम नॉट अ बेगर...ऍम एम.बी.ए स्टुडंट...ऍम स्टेयींग इन कॅम्प...सफरिंग फ्रॉम पॅरलायीसीस...प्लिज मॅम.. हेल्प मी आऊट.. गॉड विल ब्लेस यु.. प्लिSSSSSज
दाढी वाढलेली.. मळकट टी-शर्ट घातलेला.. धारेधार नाक आणि निस्तेज डोळे असलेला तो.. हेच स्वगत सगळ्यांना सांगत फिरतो.. नक्की कोण आहे तो? वेडा? भिकारी? का ड्रगज् हेडिक्ट? रोज सिग्नल वर फिरत असतो आणि आर्जवे करत असतो..
ही अवस्था का बर झाली असावी त्याची? त्याच ते बोलण ऐकताना सिग्नल सुटेपर्यंत ना ना विचार येउन गेले.. आजुनही उत्तर मिळत नाहित..
नक्की त्याच्या या परिस्थितीला कोण जबाबदार असेल? काहीही सुचत नाहिये खर तर.. तो वेडा(?) त्याची ती वाक्य.. मळलेला टी-शर्ट .. निस्तेज अन त्या कशालाही मेळ न खाणार त्याच ते धारेदार नाक...
(मी इथे हे सगळ का लिहल माहित नाही... जे वाक्य मनात आल ते जसच्या तस लिहीत गेले... का परत माहित नाही.. कदाचीत एका वाक्याचा दुसर्याशी सबंध नसेलही तरीही.. कारण ...माहित नाही...)
४ टिप्पण्या:
vedi !
he has taken your emotional control
truly sensible...!!
स्नेहा,
जे जाणवतं, ते त्या क्षणी शब्दात उतरलें ना कि दुसर्या संवेदनाशील मनापर्यंत थेट पोहोचतं.
का लिहिलम? याचं एकच उत्तर- जिवंत मन.
आणखी वाचायला आवडेल.
टिप्पणी पोस्ट करा