बुधवार, १९ डिसेंबर, २००७

कुजबुज

आठवतायेत ते स्पर्श
मुके पण खुप काही सांगणारे..
ते डोळे फ़क्त मला शोधणारे..
ती हाक मायेने गहिवरुन आलेली...
ती वाट...
जिथे तु माझी प्रतिक्षा करत असलेली..
ती वाट तिथेच आहे कदाचीत...
पण तिथे तुझे स्पर्श ..
तुझे भावनेने ओथंबलेले डोळे..
तुझे गहिरे शब्द
आणी तु...कोणीच उरलेल नाही...
नाही म्हणता म्हणता सगळच संपल
निमिषर्धान.....
एका हंबरड्यासह....
तो भयाण आवाज अन त्या नंतरची शांतता...
आजुनही कुजबुजते आहे कानात.....


स्नेहा

६ टिप्पण्या:

veerendra म्हणाले...

छान आहेत् कविता ! विशेषत: कधितरी नकळत मधल्या
"त्याला नाव देण्याचा हट्टं हि नसतो
असते ती मनाची आनामिक गरज
आनि स्वतःहाशीच
स्वतःहाने मांडलेला खेळ.."
ओळी आवडल्या ..

फक्त एक सुचवायच आहे .. कवितेमधे जरा लय हवी आहे .. कदाचित ते आतून कधीतरी बाहेर येईलच् !
आणि हो .. "शोध स्वत:चाच " अस योग्य आहे .. "हा" त्यात् नको आहे ..

पण् छान वाटलं वाचून ..
धन्यवाद

माझाही ब्लोग आहे .. http://bharakat-shabdanchi.blogspot.com/
टाक नजर कधीतरी .. आणि मला कौमेन्ट्स आवडतात् वाचायला ! ;)

अनामित म्हणाले...

best....kharach tu best kavi ahes....tyala maru deu nakos...

अनामित म्हणाले...

very disturbing actually!!!

Monsieur K म्हणाले...

Sneha,

u write really well! :)
thanks for the comment on my blog.

peace,
~Ketan

अनामित म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
अनामित म्हणाले...

अभिप्राय, कमेंट.... खर तर मी स्वतः अभिप्राय वैगरे देण्याच्या योग्यतेचा नाही .अगदी प्रामाणिकपणे नाही.पण बरेच वेळेला असं होतं... म्हणजे एखादी गोष्ट कींवा फार तर अनुभव म्हणू तुम्हाला अचानक प्रसन्न किंवा खिन्न करून जातो.आणि मग अचानक त्या अनुभनवाच्या मुळाशी असलेल्या व्यक्ती पर्यंत आपल्याला आपल्या भावना पोहचवाव्या वाटतात.स्नेहा तुझे हे पोस्ट वाचून मला असेच वाटले.तुझे पोस्ट वाचताना मला का कळत नाही पण 'देजा वू' सारखं वाटलं.'हे सगळं मी ओळखतो.हे माझ्यासोबत सुद्धा घडलय'अशी मनाची अवस्था होती.आणि एका क्षणी 'मला नेमकं हेच म्हणायचय्' अस वाटलं.

तुझ्या पोस्ट बद्दल साहीत्यिक मुल्य वैगरे नाही कळणार मला पण एवढ मात्र नक्की की मला ते मनापासून आवडले.पुन्हा वाचावेसे वाटले.आपलेसे वाटले.आणि म्हणुनच धन्यवाद ....

Hrushikesh Chidley