शुक्रवार, २९ ऑगस्ट, २००८

खो खो

सॅम ने खो दिला... या कव्यमय खो खो मद्ये जास्त काही न लिहिता माझ्या आवडत्या कविता लिहितेयं.
पहिली कविता... ही मी शाळेत केव्हातरी वाचली होती तेव्हा पासुन आवडते. बहिणाबाईंच जास्त काही वाचल नाही.. पण ही कविता वाचुन फ़ार अप्रुप वाटल होत...


मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं ते तंतर
अरे इचू साप बरा
त्याले उतारे मंतर

मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगु मात
आता व्हत भुईवर
गेलं गेलं आभायात

मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना
केवढं केवढं
आभायांत बी मायेना

देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं


... बहिणाबई



ही कविता ग्रेस यांची... खूप खूप भावलेली...



पांधर्‍या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला

त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या

पांढर्‍या शुब्र हत्तींनी मग दोंगर उचलून धरले,
अन् तसे काळजा खाली अस्तींचे झुंबर फुटले

पांढरे शुभ्र हत्ती , अंधारबनातून गेले,
ते जिथे थांबले होते, ते वृक्षही पांढरे झाले


... ग्रेस


सरते शेवटी सॅम थॅक्स् खो दिल्या बद्दल... आता माझा खो विरेंद्र आणि सौरभला

२ टिप्पण्या:

veerendra म्हणाले...

त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या

wa kay rachana ahe ..
dhanyawad sneha .. for sharing
ani tuza kho swikarlay ithe jaur paha

Jaswandi म्हणाले...

hey, mast ahet donhi kavita!