शुक्रवार, २२ ऑगस्ट, २००८

होरपळ

आता तुझ्याशिवाय जगयाची सवय झाली गं
पण मग तुझी आठवण मधुनच का छळते?
धावपळीत नाही जाणवत कधी
पण एकांतात
तुझ्या चितेची आस
मला अजुनही आत कुठेतरी जाळते..
ती अग्नी अजुन शमलीच नाही
आसवांना तिला विझवण अजुन जमलच नाही
आता आसवेही आटली आहेत
कदाचित त्या चितेनेच त्यांना
आपलस केल असाव...
माझ्यातल बरच काही तिच्या सोबत जळुन गेल
आता उरलिये ती फक्त त्या चितेची धगधगती आग
आणि त्याच्या भोवती घुटमळणारी माझ्यातलीच मी...
...स्नेहा