गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

काचेपल्याड

काल मी धारावीला गेले होते. या आधी धारावी गाडीतुन बघितली होती. येणारी दुर्गंधी आणि बाहेरची घाण बघुन काचा आपोआप वर झाल्या होत्या. पण काल वस्तीत जाण्याची संधी मिळाली. हॉस्टेल मद्ये एक मैत्रिण आहे.. सोशल वर्कर म्हणुन काम करते. तिला तेथुन बोलावण होत. एका बाबाजी नामक इसमाचं. त्याच एकुणच प्रस्थ मोठं हे कळायला वेळ लागला नाही आणि म्हणे तोही सोशल वर्कर म्हणुन काम करतो. (मला त्यांच्या कामाची आणि एकूणच त्यांच्याबद्दलची काही कल्पना नाही त्या मूळे मी त्या बद्दल काही लिहिणार नाही.) तर त्या इसमाच्या घरी जाण्याच्या निमित्तने का होईना मला धारावी बघायला मिळाली. म्हणजे तशी फक्त तोंड ओळख झाली असं म्हणाव लागेल.
पण परत एक वेगळ जग दिसल.. वेगळी माणसं.. परत एकदा तिच काच समोर आली.. हेही काचेपल्याडच जग... पण हे विश्व निराळ.. इथे मजबुरी.. गरिबी.. याची पुट चढवलेल्या माणसचं... यांची घरं बाहेरुन झोपडी आणि आतून ? वेल फर्निशड् घर... बर मी गेले त्यांच्या घराला झोपडी पण म्हणता येणार नाही... वितभर बंगला म्हणता येईल... अतिशयोक्ती नक्कीच नाही ही..
मला नक्की काय जाणवल थोडक्यात सांगते... या लोकांमध्ये काच ओलांडायच सामर्थ आहे पण इच्छा? इच्छा आजिबत नाही.. इथली मुलं मोठ होण्याच स्वप्न बघत नाही अस मुळीच नाहीये.. ते ती बघतात पण सगळ्यांच एकच स्वप्न आहे मला हिरो किंवा हिरोइन बनायचं.... ही का घडतय? वस्तीत शौचालय असतात मान्य आहे पुरेसे नसतील पण जे आहे ते वापरण्याची अक्कल? पैसा आहे पण तो दागीने आणि शानशौकी साठी विनिमय करायचा स्वच्छतेच्या बबतीत सगळीच बोंब .. काचेपल्याडचे जग ते बघताना त्यांचा दृष्टिकोन खुप वेगळा असतो.. का? शिक्षणाचा अभाव... संस्कार या गोष्टीकारणीभूत आहेत का याला... आणि या सारख्या बर्‍याच गोष्टी... पण आपण हा दृष्टिकोन बदलायच्या दिशेने कधी पाउल उचलतो का? नाही ना? मी हा प्रश्न स्वतःला विचारला हेच उत्तर मिळालं. आणी एका गोष्टिची गरज भासली आपलाही दृष्टीकोन बदलायला हवा आता... मला जास्त माहिती नाही पण पुण्यातली एक संस्था आठवली.. जी अशा लोकांसाथी विशेष्तः मुलांसाठी काम करते.. अगदी शौचालयाचा वापर कसा करावा कशी स्वच्छता असावी पासुन आई वडलांचा आदर कसा करावा.. बोलताना भाशा कशी वापरावी पर्यंतचे सगळेच स.स्कार तिकडे केले जातात.. त्या संस्थेत खूप कमी दिवस होते मी पण त्या मुलांमधले बदल आणी त्यॉहे विचार बघुन एकच जाणवल काचेवरची धुळ पुसतायेत ती मुलं आणी बाहेर येण्याचा प्रामाणीक प्रयत्नही करतायेत..
अशी कुठलीच संस्था धारावी साठी नाही? किंवा तमाम भारतातल्या झोपडपट्ट्यांसाठी नाही? असेलही मग ते कार्य लोकांपर्यंत पोहचु देत ना.. अशा मानसिकतेची माणसं तयार होऊ देत ना... आपल्या इथे माध्यमांना राखी सावंत किती दिवसाचा गणपती बसवते हे जाणून घेण्यात आणि लोकांपर्यंत पोहचवण्यात रस आहे पण आपणही काहीतरी पाऊलं उचलावीत...
काचेपल्याड जग आहे माहीत होत.. पण अशा वेगवेगळ्या काचाही आहेत याची जाणिव नव्हती...दुर्गंधी येतेय येउ द्या.. उघड्या डोळ्याने आणी नव्या दृष्टीने बघा... गाडीच्या आपोआप वर जाणार्‍या काचा तशाच स्तब्ध होतील. निदान माझ्या काचा तरी वर जाणार नाही..

३ टिप्पण्या:

मी रेश्मा म्हणाले...

Kachepalyad ........
Navala sajesa asa uttam lekh
Agadi jagachya dolyavachya kache lahi saf karel.. itak sundar lihalays ..

अनामित म्हणाले...

waaaaaaaaaa Chan........

Bhagyashree म्हणाले...

वा.. मस्तच लिहीलेस गं.
अवघड असतं गं अशा आपल्या काचांपलिकडचे पाहणे. मी नसते जाऊ शकले धारावीमधे. काही पूर्वग्रह आहेत म्हण..
धारावी मधे गुंडच राहतात असा काही समज होता माझा.. का कोण जाणे.. असा (गैर)समज असलेल्या ठीकाणी संस्था पोचणं गरजेचं आहे.
बाकी, बाहेरून झोपड्या वाटणारी घरं आतून वेल फर्निश्ड आहेत? धक्काच बसला!
असो.. खूप वेगळ्या विषयावर लिहीलंस. आवडलं..