बुधवार, ३० एप्रिल, २००८

ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...

ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...
तो धावत होता
पण हाती येण्यासाठीच
पण कधीतरी चुकतोच अंदाज
मग खुप दुर होत जात अंतर
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

कधी येतो तो हातात
मग राज्यही तोच घेतो
आपण धावतो अन तो पकडायला येतो
मग जणुन बुजुन आपण त्याच्या हाती लागतो
मह्णतो आपण बास आता
शांत बसु या... पण हट
कळाला अन कदाचित त्यालाही हे मान्य नसत
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

कितीही धावल तरी
लवकर हाती सापडतच नाही
मग दमतो आपण..
तो मात्र दमत नाही
धावत सुटतो दुर दुर
आपनही पळत असतोच
पण त्याचा वेग आता वाढत जातो
तो आपल्याला विसरुन
दुसर्‍याच डाव खेळु लागतो
आपण मात्र.....
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

...स्नेहा

६ टिप्पण्या:

ऍडी जोशी म्हणाले...

Changala lihita aapan.


KLA

Adi Joshi

Jaswandi म्हणाले...

वेगळचं लिहिलं आहेस नेहेमीपेक्षा... आवडलं! :)

HAREKRISHNAJI म्हणाले...

किती खोलवर अर्थ आहे या काव्यात

HAREKRISHNAJI म्हणाले...

mastch

अनामित म्हणाले...

mast !!!!

सुप्रिया.... म्हणाले...

छान लिहीलय....[:)]