मंगळवार, १ एप्रिल, २००८

भरकटं... एक उनाड दिवस

आज मला फ़क्त मोकळ व्हायला लिहायचयं... (नेमकी गोची कुठे होते माहित आहे का? माझ नाव चक्क इथे दिसत.. म्हाणजे कधी कधी वाटत टोपन नावाने जर ब्लॉग सुरु केला असता तर काय बिघडल असत? मग अश्या वेळी जास्वंदी आणी संवादिनी सारख्या लोकांचा हेवा वाटतो असो) तरीही आज मी मोकळेपणाने आणी काहीही विषयावर म्हणुन लिहणार नाही.. केवळ मुक्तछंद... मला नेमकं काय लिहायच आहे माहित नाही पण लिहायच आहे काहितरी... विचित्र मनस्थिती आहे ना ही... म्हणजे खुप साठलय नेमक कशावर लिहु कळत नाही....मी ना आज काल जरा विचित्र वागायला लागले आहे.. म्हणजे अस काही करते जी ते केल्यावर 'मी'अस केल? असा प्रश्न मलाच चकीत करुन जातो.. आता परवाच बघा ना? रविवारचा दिवस.. हॉस्टेल मधुन घरी जायची इच्छा नव्हती (हे घरच्यांनी कोणी वाचल तर माझी वाट लागेल इतक नक्की) तर मला घरी कोणाकडे जावस वाटत नव्हत... होस्टेलवर नुसत बसुन राहण स्वभावात नाही.. नक्की करु तरी काय? हे असे प्रश्न पुर्वी मला कधी पडले नव्हते कारण मुळात मी उद्योगी पण मी कधी काळी खुप उद्योगी होते हे अत्ताच्या मला बघुन कोणी म्हणनार नाही हे नक्की... (मी वाहवत चालले आहे ना?) हं तर मी शेवटी रविवारी पहाटे १० ला उठले... परत काय करायचा हा मोठा प्रश्न आ वासुन उभा होता जणु... पटापट आवरल आणी दादरचं प्लाझा गाठलं... एकटीने पिक्चर बघायची ही माझी पहिलीच वेळ... पण आमच्या प्रिय मित्रांपैकी बर्‍याच जणांना माझी दया वाटायची की मी केवळ ते दुर आहेत आणी कोणाची सोबत नाही म्हणुन सिनेमे बघत नाही... :( पण मग त्यांचेच उद्देश एकटी जायच सरळ... मग शेवटी मीही धाडस केल... आणी वळुच तिकीट काढल... थेटरमध्ये शिरताना द्विधा मनस्थिती होती... येस आपण एकटे आलो.... लोक शेजारी बरी मिळु दे रे देवा...पण मग काहीच वाटल नाही एकदा तो सिनेमा सुरु झाला की माझ कुठे लक्ष जात कोणाकडे? मद्यांतरात दोन सामोसे आणी एक कॉफ़ी एकटीनेच मट्टम केली.. पिक्चर संपला आवडला..पण लोकांना आवडला इतका नाही.. ते जाऊ देत.. तर बाहेर पडले आता पुढे काय हा प्रश्न परत दत्त म्हणुन आमच्या समोर उभा... तर मी परत मला आहो आश्चर्यम वाटेल अस काम केल... त्याच थेटर मध्ये रेस लागला होता बघण्याची विषेश अशी इच्छा नव्हती तरीही लायनीत उभी राहीले... आणी तिथे एक मुलगी स्मित हास्य देत आली ''मेरे लिये दो तिकिट्स निकालोगी प्लिझ...'' म्हणाली असही आम्हाला कोणाला नाही म्हणता येत नाही आणी म्हटल बर आहे कोणी टवाळ पोर नको शेजारी त्या पेक्षा हिच बरी म्हणुन तिन तिकिट्स काढली तिच्या हातात दोन सोपविली आणी मी माझ्या वाटेला जाणार तितक्यात तिने तिच्या मित्राची ओळख करुन दिली.. मी विषेश रस नाही दाखवला करण मी स्वतःची कंपनी एनजॉय करत होते.. पण ती दोघे कदाचित जरा जास्तच चांगली होती... त्यांना बिचार्‍यांना मझा एकटेपणा बघवला नाही आणी झाल त्यांची बडबड सुरु.. माझ्यातल पुणेरी मन खर तर जाग होत होत पण मी आडवल.. मग जवळ जवळ जबरदस्तीनेच मला शेजारच्या हॉटेलात नेण्यात आलं आणी मला न विचारता पेप्सी मागविण्यात आल... डोक खरतर फ़िरत होत पण मी सगळ्याला हसुन सामोरी जात होते का याच उत्तर मलाही माहीत नाही... मला ना समोरच्याला दुखवता येत नाही ते दोघे अनोळखी होते पण असे वागत होते जसे मी त्यांच्या बरोबरच आले आहे.. झाल आश्या प्रकारे आमच्या सुखावर विर्जण पडल (कारण एकटेपणाचा कंटाळा आलेली मी खुप महिन्यांनंतर तो एनजॉय करत होते).. मग काय त्यांच्या सोबतच परत आमची स्वारी थेटरात... एकदाचा पिक्चर सुरु झाला.. आणी त्या निशा नामक मुलीची टकळीही तिही हिंदीत.. मला नं नाटक सिनेमा या मध्ये कोणी बडबड केली की डोक्यात जाते .. सांगावस वाटत की आपण तो तास नंतर ठेउ ... मग शेवटी मी तिला सांगीतल बाई सिनेमा कसाही असो पण मला तो सहन करता येतो पण शेजारच्यांची बडबड नाही... अर्थात अगदी अस नाही सांगीतल.. आणी खरच तो सिनेमा पाहण्याचा निर्णय घेण्याची दुर्बुद्धी आम्हांस कुठुन सुचली असे वाटुन गेले.. इतका वाईट होता... झाल एकदाचा संपला सिनेमा... मला टेन्शन आल की हे दोघ आता मला कुठे जाण्यास विचारु नये म्हणजे मिळवल माझ्या डोक्यात आता पुढे काय याच उत्तरही होत...त्यांनी तसा प्रयत्न केला पण तो मी फ़ोल ठरवला... सरळ सांगीतल की मठात जातेय... ते सरळ निघुन गेले मला बाय म्हणुन.. चांगले होते बिचारे.. झाल मग मठात जाउन आल्यावर वेगळाच फ़्रेशनेस जाणवला मग चालत चालत स्टेशन गाढल... आणी परत होस्टेल ... मी गादीवर पडल्या पडल्या स्वतःशी हसले हे अस काही करेल अस स्वप्नात वाटल नव्हत... पण हा दिवस उनाड पणे जगले.. आणी खरच जगले..
[फ़ार पाल्हाळ लावल आहे वाटेल.. पण काहीही विचार न करता लिहीत सुटले होते.. पण इथेही उनाड्पणे लिहल आहे.. जे सुचेल ते :P]

१३ टिप्पण्या:

हरिप्रसाद म्हणाले...

छान स्नेहा... मस्त लिहले आहेस. बऱ्याच वेळा आपले असं होतं की वततं आज मस्त एकटा पाहिजे तसा दिवस घालवयचा पण आपण इच्छा असुन सुद्धा लोकांना टाळू शकत नाही. हिच गोष्ट एकदम साध्या, सरळ, सोप्या भाषेत मांडली आहेस.

मी पण असा दिवस घालवयचा खूप निष्चय करतो पण जमत नाही, कोण ना कोण तरी टपकतेच ... असो. लगे रहो ...

अनामित म्हणाले...

Kadhitari Ase UNADpane vagneee…haa ek veglach anubhav astooo…yachi tu janiv karun dilis..

pratyak manasallaa ase vatatte(kadhi naa kadhi..) ki apan purnapane isolated vhavee…tasech tula vatle asnaar… hooNaaa ?

Monsieur K म्हणाले...

mast lihila aahes.
i agree - ekta phirnyaat kaahi veglich majaa aste. aani asha veles, dusra koni nako asta barobar. :)

मोरपीस म्हणाले...

मस्त लिहले आहे. मला पण असे खूप वेळा वाटते पण नेमके त्याच वेळी कोणीतरी येते आणि जेव्हा वाटत नाही त्यावेळी कुणीच येत नाही.

Bhagyashree म्हणाले...

wa..mast lihles.. ani tu ektini asa njoy karu shaklis te ajun bhari! mala asa karu shaknarya lokancha heva ch vatato..karan mala jamat nahi te. satat company lagate barobar..so, tujha post vachun mala pan ektine undarav asa vatayla laglay! :D mast ch lihles post!

pan ek agau(puneri) suchana karu ka? jarraa shuddhlekhana ch bagh na plz.. changla vachtana adathaLe alyasarhe vaatatat..

कोहम म्हणाले...

zakaas!! malahi asa ekaTyaane picture baghayala jayacha ved hota mumbait asatana. Gardit ekaTa asatana jo nivantapaNa milato na to kaShatach naahi....

संवादिनी म्हणाले...

mastach lihilays ga....

Jaswandi म्हणाले...

sahiye!!
mala kadhich nahi jamat ga asa...

Anand Sarolkar म्हणाले...

Me pan barechda ektach picture baghayla jaycho..pan ata ektyala jaycha kantala yeto...

स्नेहा म्हणाले...

हरिप्रसाद... धन्यवाद.. वेळ काढायचा स्वतःसाठी :)

प्रविण.. () अगदी अस नव्हत वाटल पण .... :)

केतन.. हम्म...thanx :)

मोरपिस... हे हे हे.. असच असत... पण मग एकट्याने एनजॉय करायला शिकायच.. (अता हे मी बोलु शकते..)

भाग्यश्री.. अगं मला ही आधी हेवाच वाटायचा अश्या लोकांचा पण आता कळल इतकही अवघड नसत... मज्ज येते... आपण नव्याने आपल्याला भेटतो... बघ प्रयत्न करुन एकदा... आणी हो अगं माझ्या शुद्धलेखनाच्या चुकांच खरच काहीतरी केल पाहीजे... माझा आळस कारणीभुत आहे याला... मी भरभर लिहते म्हणजेच टाईपते... आणी न वाचता पोस्ट करुन टाकते...
:(

कोहम... खरय रे.. मुंबईत येण्या आधी गर्दीचा तिटकारा होता.. पण नंतर हळुहळु सवय झाली... आणी तु म्हणतोस तसा निवांतपणा जाणवला... तु जब भी मेट बघितला आहेस... सिनेमातल एक वाक्य मला खुप आवडल.. भिड भिड क्या करना? जो की हम भी उस भिड का एक हिस्सा है| (जसच्या तस नाही पण अश्याच भावार्थाच होत ते वाक्य)

संवादिनी.. थॅकस

जास्वंदी... अगं एकदा जाऊन बघ... आवडेल तुला...

आनंद... असेल कदाचित पण मला नाही आला.. उलट मज्जा आली... आणी काही क्षण एकटे जगताना वेगळाच एक अनुभव मिळतो तो मिळाला.. :)

Sunil म्हणाले...

धिस इज नॉट फ़ेअर. तुज़्या बरोबर 'वळु' पहायचा म्हणुन आम्ही दोघ आमचा शेड्युल एड्जस्ट करत होतो आणि तु......एत तु ब्रुटस... असो , तु एन्जॉय केला ना 'उनाड दिवस' .... बास... खुप बर वाटल. सही लिहिल आहेस....

Shardul म्हणाले...

Hello.....

mi jast kahi lihinar nahi....

facta kahi diwas athawale....jevha mi pan punyahun aurangabad la janya sathi kadhi talam-tal keli hoti....aani asach ekatyane kahitari kele hote.....pan ekach mahatwache....aaj pan tya goshti sathi "No regr8s"...

neways....

chan lihites.....keep it up !!!

me म्हणाले...

chan lihites, in fact mazihi sort of ashich kuchambana hote barechda. ki lihawasa watate pan kashat lihaw te kalat nahi. pan tula ek gosht sangu icchite, satat gholakyat rahun aapan apali swatahachi wicharkshamata ghalawun basato, ya kalapachya wicharsaranipasun door jayala ha asa 'me i am with myself' cha break khup garjecha aahe, mumbai ani punyat donhikade khup ekti phirale aahe mhanun sangte, jag ektyachya najaretun jitke sunder diste titkech gardit ugly disate,enjoy wondering(alone)!:)