बुधवार, २३ एप्रिल, २००८

नुसतीच साद..

साद घालतेय मी
कुणीच दाद देत नाही
सादही मुकीच माझी
मनातुन दिलेली फक्त
कदाचित कुणाच्याच
अंतरापर्यंत न पोहचणारी
तरिही साद घालतेय मी...

शब्दांसह बोललं
तरीही नेमका भावार्थ
पोहचत नाहीच..
मग शब्दच खोटे वाटतात
कागदी फुलांसारखे...
पण शब्दांना तरी का दोष द्यायचा?
समोरच्याला ते ऐकायचच नसत
ते बहुदा त्यांना हव तेच ऐकतात..
नाहीतर फ़क्त गैरसमज होतात...
नुसतीच साद घालतेय मी .......

...स्नेहा

६ टिप्पण्या:

veerendra म्हणाले...

मस्त जमून आलय .. कागदी फुलाची कल्पना आवडली.. मला वाचून हे सुचलं ते देत आहे. कस वाट्लं ते सांग ..

न पोचणारी आरोळी की
आतल्या आत घुमणारी
मनाला स्पर्श न करणारी की
वरवरच विरणारी ..
माझी साद

जशी रिकाम्या डोहात
घुमणारा आवाज..की
व्यक्तपणाचा अस्पष्ट नाद
एकटेपणाचा एकसुरा राग
माझी साद

श्वास कोडून जगावं
की मरावं ओरडून
यात कुठेतरी अडकलेला
माझा आवाज ..
माझी साद ..



हे मला सुचलं होत कालच.. पण आज लिहायला वेळ झालाय..

सुनिल सावंत म्हणाले...

प्रतिसाद देणार कुणी असेल
तर साद घालण्याला अर्थ आहे
ऐकणारं कुणी नसेल तर
किन्चाळणेही व्यर्थ आहे........ [:)]

ऑयला.... "मी पण माझा"... ?? नाह्ह्ह्ह्ही

वाह... वाह....वाह....वाह.... क्या बात है...!!

असो, छान जमली आहे कविता.

सुनिल सावंत म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
अनामित म्हणाले...

mast liheles bagh !!!

Unknown म्हणाले...

अप्रतिम्म्म्म्म
सुन्दर आहे तुझी कविता ............

Unknown म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.