रोजच्या त्याच त्याच चौकटीत जगताना.... मला नेहमी त्याच्या बाहेरच विचित्र चित्र बघायला मिळत थोड्याबोहोत प्रमाणात.... पण मग ते हादरवणार असत...मागच्या शनिवारी पुण्यात गेले होते.. मी अदिती अन काकु shoppingला गेले होतो... अद्याने आयुष्यात पहिल्यांदा तीन सडेतीन हजाराच shopping केल असेल ती खुप वेगळ्या मुड मद्ये होती... इतकी महागडी shopping स्वतःहाच्या पैशात केल्याचा आंनद... आणी काही वेगवेगळे भाव होते तिच्या चेहर्यावर... आम्ही जेवायला म्हणुन डेक्कनवर आलो... एक वेगळच चित्र दिसल आदयाला डोळ्यासमोर... लगेचच desturb झाली... थोड पुढे आल्यावर मला म्हणाली काय आहे ना मी एवढं shopping करताना काहीच विचार केला नाही, त्यांना पाहीलस? मी मागे वळुन बघितल तर खुप कसंस झाल मला... चारपाच फ़ुगेवाली लहान मुलं एकत्र बसली होती.. एकटक नजर होती त्यांची त्या काचेपल्याड असणार्या कपड्यांवर... ते दुकान त्याची झकपक... ह्या सगळ्याच कुतुहल त्यांच्या तोंडावर दिसत होत... आम्हा दोघींना काही सुचलच नाही काय कराव ते....दुसर्याच दिवशीच दुसर चित्र ती फ़ुगेविकणारी लहानगी.. ती मुल त्यांच्यापेक्षा अजुन लहान होती ६-७ वर्षाची किंबहुना त्यापेक्षाही लहान... रत्यावर होती... बहिण आणी भाऊ अस नात असाव त्यांच... वयात जास्त अंतर नव्हत.. दोघेही मस्ती करत होते रस्त्यवर ...खळखळुन हसत होते... यांना इतक सहज आणी सुंदर हसता कस येत?आज मी ट्रेन ने येत होते.. खिडकीत बाहेर लक्ष होत तर निराळच द्रुष्य बघितल... एक काठी त्या रुळाच्या बाहेर असलेल्या दगडांमद्ये रोवलेली.. त्याचा आधार घेउन त्याला एक टोक अन रुळाला दुसर टोक अशी झोळी बांधलेली होती... वर ऊन बाहेर त्या झोळीतल्या बाळाला झोका देणारी ४ ते ५ वर्षाची त्याची बहिण.. आजुबाजुला त्याचे आईवडिल ... कुठलस काम करत असलेले... त्यांना किंचीतशी पण भिती वाटली नसेल का येणार्या जाणार्या गड्यांची ?
मला आठवतो तो दिवस... आमच्या शाळेत ख़्रिसमस साजरा होत होता... इनमिन सात मुल आहेत शाळेत पण छानशी ख़्रिसमस ट्री सांताक्लॉज ..केक.. चॉकलेटस.. सगळी मज्जा सुरु होती.. पण मगे वळुन बघितल तर बांध काम करणार्या लोकांची चिमुरडी मुल सगळ आर्श्चयाने सगळा प्रकार बघत होती... मला काही सुचल नाही.. मी खाउची एक डिश आणी फ़ुगे त्या उघड्या पोरांना नेउन दिल... त्यांना बर वाटल असाव.. त्या मुलांनी तो केक कसा खायचा हेच समजत नव्हतं... मी खा म्हट्ल्यावर कशाच्याही विचार न करता खपाखप खन्यास सुरुवात केली... का कोण जाणे मिच जास्त सुखावले...
का आपल्या अन् त्यांच्या जगा मध्ये त्या काचेच अंतर राहणारच?डोळे उघडुन पहा आपल्या काचेपल्याड अपल्याला हे दृश्य दिसत...
३१ टिप्पण्या:
छान लेख.
"का आपल्या अन त्यांच्या जगा मध्ये त्या काचेच अंतर राहणारच?"
हे अंतर कमी करू पहाणार्या बर्याच संस्था आहेत. काही तरी करावेसे वाटणार्यांनी अशा संस्थांना काही ना काही मदत करावी.
हरेकृष्णाजी म्हणतात त्याप्रमाणे देवावर व्हायला लाखो रूपये असतात लोकांच्या खिशात. पण चांगले काम करणार्या सामाजिक संस्थांना नेहेमीच पैशाची चणचण असते. ही प्रवृत्ती बदलायला हवी.
its good article..well i want to give one good link regarding this issue..dont know how much one feel it is close 2 help these people..but worth visiting..
http://freerice.com/
Disclaimer:
Its not money making site or promotion..
सुंदर खूप विचार करायला लावणारं लिखाण. आमची पिढी तर असा विचार करणारच पण नवीन पिढी ही तितकीच संवेदनाशील आहे हे पाहून मन सुखावलं.
हे काचेच्या भिंती पल्याडचं जग नक्कीच त्याना खुलं होणार. तुमच्या पिढीचे प्रयत्न चालू राहू द्या.
काल दिवसभर सिग्नल वर झॆंडे विकणाऱ्यांच्या मुलांचे फोटो काढायला मी भटकलो. लिहायचे होते पुढच्या प्रजासत्ताक दिनी यांच्या हातात हे झॆडे विकण्यासाठी नव्हे तर अभिमानाने मिरवण्यासाठी हवे, यांच्या हाती पाटी पुस्तक हवे, पण प्रत्यक्ष मुले पाहीली तेव्हा त्यांचे फोटो काढावेसेच वाटले नाहीत.
या मुलांचे दुर्दैव दुसरे असे की ज्यांचा स्वःताचाच जगण्याचा ठावठिकाणा नाही असे आईवडील त्यांना जन्म देत असतात व रस्तावर जगण्यासाठी जोडुन देत असतात.
chhan lihilays!
काचेच्या पलिकडे बघताना आपल्याला आपण खुप सुरक्षीत असल्याचा भास कायम होत असतो. पण प्रत्यक्षात मात्र चित्र एकदम वेगळं असत. . . याचा एक सुंदर अनुभव देणारा लेख आहे हा, अतिशय संदर अशा शब्दात मांडलेलं एक निराळ्या माणसांच एक निराळ भावविश्व. आपलं सुरक्षीत जीवन आणि प्रत्यक्षात असलेलं सत्य यातंल फरक दाखवणारा लेख. . . . . . सुंदर !
मला दरवेळेस ह्या मुलांसाठी काहीतरी करण महत्वाच आहे अस वाट्त पण नेमक काय? यातल्या प्रत्येक मुलाला अपण शिक्षणासाठी मदत केली अगदी एकट्याने नाही जमल तरी मित्र-मैत्रिणींनी मिळुन तरी खुप आयुष्य उभी रहतील सुरुवात कुठुन करायची कळत नाही ना? तुम्ही मदत कराल मला? सगळ्या मुलांआ नाही जमणार पण एकाच तरी भल करु या... मला तुमच्या मदतीचा हात हवा आहे... द्याल?
sure
List of all NGO's are available on
http://www.karmayog.org/
unfortunately I have no idea how individually we can help them. But may be thru some geneious organisation we can help them.
malaa hii madat kuthalyaahi santhe through nahi karavishii vatat aapan swatahun rastyavar utarun group ne 1ka mulaachi tyari javabdari gheu yaa asa vatat....
lekh uttam.. manat thode kahur majale..ki apan kityek goshti sahajpane baghun na baghitalyasarakhya karato... ani tyache vishesh kahi vatat dekhil nahi..ti janeeev parat ekda karun dilyabaddal thnks:)
Good Blog!
Poverty makes man helpless. Poverty does not allow to celebrate independance. A poorer naturally becomes submissive to superiors, and those do not always get rise in the life.
We are superior to someone and inferior to even many, but it does not mean, we are unhappy all the time. Happyness is self realization within surroundings/ environment.
Many times, we feel that, we should help others who have basic needs. We must help them immediately and forget that I have donated something. This reduces burden of protection of the things that we posessed & burden of ego that might have generated by donation. Poverty is social decease, it can be iradicated only by education, hard work, self respect and egearness for improvement.
आपल्या मताशी मी सहमत आहे.
खर सांगायचे म्हणजे माझाही या समाजसेवी संस्थांवर फारसा विश्वास नाही, या मधल्या खरोखरीने तळमळीने कार्य करणाऱ्या किती व मिळणाऱ्या पैशासाठी उभ्या राहिलेल्या किती हे सांगणॆ कठीण असते. मध्यंतरी वर्तमानपत्रात यांना किती करोडो रुपयाची परदेशातुन मदत मिळते या संबधी एक बातमी वाचण्यात आली होती.
बऱ्याच वेळा आपली काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असते, पण नक्की करायचे काय हे ठावुक नसते , परत करायला गेलो तर प्रत्यक्षात त्यांच्या साठी काही करणे वैयत्तीकरीत्या कठीणच होवुन जाते. आपल्या कडे तेवढे पैश्याचे, वेळेचे, व विचारांचे पाठबळ नसते व प्रशिक्षणही नसते.
आपण स्वःत या मुलांना किती मदत करु शकतो या बाबत माझ्या मनात शंका आहे, यांना केलेली दोनपाच वेळा पैश्याची, जेवणाची मदत तशी काही कामाची नसते, परत त्यांची कायमस्वरुपी जबाबदारी घेतांना कायदेशीर बाबी देखील निर्माण होवु शकतात. यांच्या साठी आपण काय करु शकतो हे मी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना विचारुन सांगतो.
आपण १० ते १५ जण मिळुन एका मुलाची जवाबदारी नाही का घेउ शकत?
One family can absorb expenses of one child easily. I always request my friends who has taken advantage of any Govt reservation/ scheme/ scholarship in the life, then they should pass that advantage to at least one student through out the life. I will not like to tell you, what I do? because I forget it immediately once it is given.
The problem is it's the street children we are talking about.
Let me make inquiry around
आपण काय करु शकतो हे http://kshiprasuniverse.blogspot.com/ या बॉग वर मिळु शकते.
http://www.palakneeti.org/aboutkhelghar.htm
बघुन सांगता का. किंवा तीच्याशी संवाद साधाल का ?
..
:speechless:
harekrishnaji मी तिला तिच्या ब्लोग वर comment टाकली आहे आता बघु काय दाद मिळतेय ती... आणी विरेद्र speechless होउन कस चालेल काही तरी सुचवा...
स्नेहा,
very good post.
खाली काही संस्थांची नावे आणि मोबाईल नंबर देत आहे.
सर्व संस्था पुण्यातील आहेत. शिवाय खेळघरात u r always welcome :)
street children बरोबर काम करणारी संस्था
1. Integrity Foundation
Contact Person : Namrata Date
Mobile no - 9822294993
Platform children बरोबर काम करणा-या संस्था
1. Doorstep
Rajani Paranjape
110 anand park, Aundh, Pune
Mobile No 9371007844
2. सर्व शिक्षा अभियान
भूषण नलगे
मोबाईल - ९९७०५८००००
अजून काही मदत लागली तर अवश्य करीन.
कोहम आणि संवेद म्हणतात तसे marathi bloggers मिळून देखील काही
करू शकतील.
Thanks Kshripra
dhanyavad kshipra...
वा तुमचा ब्लोग फारच छान आहे. मला कविता आवडल्या. शुभेच्छा..
khup chan lihilays.. :)
chan lihile aahes...mala jeva pahili salry milali hoti..teva aamchya sarani sangitale hote...hyabaddal...tyancha frends cha ek group ahe..te milun asha mulansathi kam kartat..mhanje varshalach 2-3 but they took full responsibility of thr education aani te konala paisa hata det nahit...svatahun sagle..kam baghtat...
we can do it...
sneha,
tujhya likhanatun tu tar distesach, pan te likhan dolya samor tech chitra ubha karta je tu baghitlaes....aprateem
धन्यवाद
suhrud
parag
Anonymous
sudhanWa...
:)
aga meLghaTat mula kuposhanane Tacha ghasun marat asatana sai babanchya sinhasanala 9 koTi rs cha sona chaDhavaNaryancha ha desh aahe.jya phakirane ayushyat sonya-chandikade tuCchatenehi baghitala navhata tyala sinhasan deun apali baudhik divalkhori jahir keliye. pan bicchhare khare parameshvar tya meLghaTAt upashi basalet he koNalach kaLAt nahiye.
सौरभ १००% सहमत. आयुष्यभर फ़किरा सारखा रहिलेला माणुस जेव्हा सोन्याच्या सिहासनावर डोक्यावर रत्नजडित मुकुट मिरवत बसलेल पाहताना मन स्विकारत नाही. म्हणुनच मे शिर्डि ला ना कधि गेलो ना कधि जाणार. मल नक्कि माहीत आहे, साई-बाबा शिर्डि सोडुन कधिच गेले आहेत. आता रहिल ते भक्तिचे अवडम्बर.
@स्नेहा
अग आपण काहि करु शकलो नाहि तरि य गोष्टि चा विचार तरि करतो ग. मी पहिलेल प्रसन्ग तुला सन्गितल तर तु विचारशील "जगात अशि पण माणसे असतात?". मी घाटकोपर ला एक मन्गल कर्यालया समोरुन जातन पाहिल, एका धनिकचा लग्न समरम्भ संपल्या नन्तर उरलेले अन्न बहेर फ़ेकुन देत होते, पन त्या कडे भुकेने व्याकुळ होउन आघाश्या सरखे पहाणारया ( खरतर अन्न पाहुनच पोट भरणारया ) गरिब मुलान, "स्टेटस" ला बाधा येइल म्हणुन हुसकावुन लावत होते. अन्न देन तर दूरची गोष्ट.
असो, तुझ्या लेखना विषयि म्या पामर काय लिहिणार? नेहमि प्रमाणे "अप्रतिम"
किती संवेदनशील !
मी जिथे काम करत होते त्या शाळेतील लाखो रुपये फी भरणारी मुलं आणि शाळेजवळ थोड्याच अंतरावरची 'काचेपल्याड' च्या जगातील मुलं
यांच्यातलं अंतर ही तितकंच अस्वस्थ करणारं... मग शाळेतल्या मुलांना उद्दुक्त करून त्यांच्या जवळ असणार्या जरूरीपेक्षा जास्त गोष्टी -
वह्यांची कोरी पाने, कपडे दिले...पण हे अंतर जरा जास्तच आहे असं नाही वाटत....? नेहेमीच अस्वस्थ करत राहणारं...........???
मजिद मजिद चा चिल्ड्रन ओफ हेवन बघ....फारच टची !तुला आवडेल नक्की.
I am currently working with Palakneeti.org
If you need more info please contact me.
Palakneeti is organization of committed people.
टिप्पणी पोस्ट करा