मंगळवार, ५ फेब्रुवारी, २००८

संवाद.. नाही वाद.. स्वतःचा स्वतःशी...

आपण मृगजळ नक्की कोणाला म्हणतो? आपल्या अपुर्ण स्वप्नांना.. का अशक्य असाध्य अश्या स्वप्नांना? की मनाच्या वेड्या हट्टांना? मनाचे वेडे हट्ट म्हणजे नक्की कात? मनाने बघितलेल एक वेड स्वप्नच ना? मग त्यालाही मृगजळ म्हणायच?कधीकधी वाटत म्रुगजळ म्हणजे स्वत:च्या अपयशाला दिलेल गोंडस नाव!छे! मृगजळ म्हणजे असाध्य स्वप्न नाही... ती एक वेडी आशा आहे... जगवुन जाणारी.. जगवणारी.. असाध्य अपुर्ण नाही पण वेड असावं अस एक स्वप्न आहे.. पुर्णत्वाच्या शंका असल्या तरी त्याच्या अस्तीत्वाची ओढ आहे.. मनाला सुखावुन टाकणारी एक शक्ती आहे... त्याला अपयश का म्हणाव?ते अपयशाचच चिन्ह आहे.. आणी म्रुगजल हे अस्तीत्व हे सांगण्यात कुठे आलयं शहाणपण? वेडं स्वप्न? काय करायचय वेड्या स्वप्नात जगुन? पुर्णत्वाच्या शंका असल्या तरि त्याच्या पाठी लगायच ? कुठली आली आहे शक्ती मनाला सुखावुन टाकणारी? सगळा खुळा खेळ आहे आहे हा... स्वतःशी स्वतः खेळलेला खुळा खेळ.. कधीही घातक ठरु शकतो...असु देत खुळा खेळ.. असु दे घातक..पण तो जगवतो.. रोजच्या शहाणपणात एक वेडेपणा माफ़ असतो.. आणी शहाण शहाण म्हणुन किती जगाव? एकदा वेडेपणा करुन बघावं ...इतका वेळ असतोच कोणाला? या शहाणपणाच्या जगात एकही वेडेपणाची चुक क्षम्य नाही... जग किती धावतय बघ.. त्याच्याबरोबर धावायच का आपल्याच विश्वात हरवायच? आणी एक चुक म्हणता म्हणता आपल्याला हजार चुका करायची सवय लागते... मग चुका करायच्याच कशाला? उगाच मनाचे फ़ाजील लाड?वेळ..वेळ काढला की मिळतो... आणी या शहाणपणाच्या शर्यतीत धावुन तोच तो पणा येतो..काय क्षम्य काय अक्षम्य सगळ शेवटी अपल्याच हाती असत... आणी जगा बरोबर धावता धावता अपण अपले असे किती उरतो? तो वेडेपणा स्वतःला भेटायला का होइना कामी पडतो.. बघ तुझ्या व्यव्हारी भशेत बोलायला लागले मी... पण हो मी हा असा स्वतःला भेटण्याचा प्रयत्न करते.. तुझ्याच भाषेत सांगायच झाल तर एक खुळा प्रयत्न....

१० टिप्पण्या:

Jaswandi म्हणाले...

chhan lihilays! pan mala kalayla 2da vachava lagla.. mhanje mi jara mand ahech ga! :)

असु देत खुळा खेळ.. असु दे घातक..पण तो जगवतो.. रोजच्या शहाणपणात एक वेडेपणा माफ़ असतो.. आणी शहाण शहाण म्हणुन किती जगाव? एकदा वेडेपणा करुन बघावं
right!! mi tech karate rojch..nemehich!! :D

स्नेहा म्हणाले...

हय मंद नाही म्हणु...:) मी पण आहे पण म्हणते का स्वतःला 'स्व' स्तुती होते ती ;)
thank u मना

तुमचा आनंद म्हणाले...

रोजच्या शहाणपणात एक वेडेपणा माफ़ असतो.. आणी शहाण शहाण म्हणुन किती जगाव? एकदा वेडेपणा करुन बघावं ...

हेच कळाळे...बाकि डोक्यावरुन... ;-)

म्रुगजळ ईतकं confusing असतं... बापरे...
मी नाहि जाणार तिथे आंघोळीला.... ;-)

Monsieur K म्हणाले...

evdha vichaar karu nakos.. jey manaat yeil, tey karat jaa.. as long as it makes u happy and it doesnt hurt anyone :)

Nandan म्हणाले...

khuLaa prayatn nahi, tar uttam prayatna/ swata:sheech ghatalela vaad :).

अनामित म्हणाले...

Mi 2-3 vela vachlyaa nantar ase vat-tay :::
it indicate dat how deeply u think about whatever u do !!!
u fight wit urself --- y even u don’t kno ?
u want to do sumthing (which u like to do) but u cant  ??
For the fact of matter don’t ever say म्रुगजळ म्हणजे स्वत:च्या अपयशाला दिलेल गोंडस नाव! Or
ते अपयशाचच चिन्ह आहे..
Haa mazaa tu lihelala lekh samjun ghenchyaa praytn hotaa…may be im wrong
……. तुझ्याच भाषेत सांगायच झाल तर एक खुळा प्रयत्न....

prasad म्हणाले...

Sadhya Aapan Philosophy madhye Phd. Karat aahat ka ?.. :)
Chaan Lihle aahe.. Mala Sudhha 3 welela wachayla lagle..

Mohan Lele म्हणाले...

Mirage:Mrugajal is a state of mind. I will like say, it is power of mind and need too.
It is said "Need is Mother of invention". Mrugajal does same work!
Mrugajal may not be existing at the place we think, but it is definately existing somewhere. Our prime duty is to find the easiest path, which approches to the real. It is not hypothetical way of thinking, all great people see the dreams, search the mirages and make them true.
Conflict state of mind helps one to think more. Proper Thinking is an art and that can be achieved by Dhyan Dharana! "Ni:shabda Ekant" after reading/study is also better way of positive thinking.

आशा जोगळेकर म्हणाले...

ए छान लिहिलं आहेस ग ! मृगजळ म्हणजे अपयश नाही मृगजळ म्हणजे आशा, झुलवणारी पण खचू न देणारी पुनश्च हरिओम करायला लावणारी।
जिद्द कायम ठेवायला मदत करणारी.

स्नेहा म्हणाले...

@ आनंद विनोद कमी कर रे जरा....

@ केतन विचार करण्याची सवय आहे .. नहि म्हणजे तेवढच लक्षात राहत डोक नावाचा भाग थोडा का होइना आहे शाबुत... :)

@ नंदन.. धन्यवाद.. बर वटल तुला तरी बहुदा(?) कळल मला काय म्हणायच ते

@ Anonymous इतकही अवघड नाही लिहल..मी

@प्रसाद... कोणी खेचायला मिळाल नाही का?

@काका आणि अशा ताई थन्क उ