गुरुवार, १४ जून, २००७

ती आई होती म्हणोनी..

कुठुन सुरुवात करावी? असा प्रश्न मला क्वचित पडायचा पण आज खरच सुचत नाहिये सुरुवात कुठुन करावी? प्रश्न प्रश्न प्रश? की सगळ्याचि उत्तर सापडल्याच एक निराळच दुःख....? खुप भल मोठ वादळ कि त्या नंतर्ची भयान शांतता? काहिच सुचत नाहिये.. वाटय कुठल्याश्या प्रवाहामद्ये नुसतच वहण होतयं, जगण्यापेक्ष नुसतच श्वास घेण चालु आहे (तेही थांबवण हातात नाही म्हणुन) सगळचं विक्षिप्त... ती.. तिचा चेहरा डोळ्या समोरुन जात नाही... त्या वेदना.. ते ओरडण.. ते हताश होणं.. तो चेहर्‍यावरचा थकवा.. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न... ते वेदनेमुळे असह्य अन मोठे झालेले डोळे.. तो तास कसा गेला हे कळलच नाही.. सार काही अनपेक्षीत होत.. माझी सारी धड्पड..तिला बर वाटव म्हणुन होती... पण अचानक तीच बेशुध्द होण मला सहन झाल नाही आणी मी आई म्हणुन जो काहिई हम्बरडा फ़ोडला...ते मला आथवातही नाही मी कितिवेळ्तिला हाक मारत होते... मी त्या वेई कदाचीत पहीयांदाच इतक्या मनापासुन तीला हाक मरलि आसवी.............................
'आई' या शब्दात कितीस आणि काय काय दडलय? हे आइ असतान कधीच नाही उमगलं.. ती गेली.. नुसतीच्गेली नाही तर बरंच्काही घेउन गेली.. बरच काही.. अगदी वर्तमानात आणि भविष्यातले शब्धही.. त्या शब्दांपाठच्या भावना अन्खुपसं जे अव्यक्त्य आहे.. आत रोजच्या वापरातली बरीचशि वाक्यही पुसली गेली ''आई! अगं तुला ना काहीच कस गं कळत नाही?'' ''आई.. खुप भुक लगली आहे'' ''आई सारखी सारखी का बाहेर जातेस?'' ''अग. उन्हात भटकत जाउ नकोस.. आई आई आई...... आई! आता ही हाक ऐकणार कोणीच नाहि पण तरीही मन अजुन तिलाच साद घाल्तय.. खरं तर तिच्या शिवाय मला 'माझं' अस म्हणणार कोणीच नव्हत. ती नसण्याने आता जी पोकळी निर्माण झाली आहे.. नव्हे सर आयुष्यच रितं झालय.. मातीत मुळ घट्ट रोवुन उभ राहिलेलं झाड आचानक आलेल्या वाद्ळाने कोल्मडुन पडत अन मग कुठलुआश्या प्रवाहात हेंद्काळे खात नुसतच वाहात राहत तस काहिस झालय.. त्या झाडामद्ये आता प्राण आहेत की नाही ठाउक नाही त्याच भानही आत राहिल नाही ती माती सुट्ली याच दुःख.. छे त्याहुन निराळी भावना.तिची प्रत्येक आठवण मनामद्ये अजुनही दरवळतेय. तिच हसणं बोलणं अजुनही सर्याचा भास होतोय.. वाटत आत्ता फ़ोन वाजेल आणि ती विचारेल ''अगं दब्ब का नाही नेला?'' मग धडपड करत ऑFFईCE पर्यन्त आलि असति मग माझी सारी धावपळ बघुन म्हणाली असती ''काही गरज नाही ऑFFईCE ल जान्याची,खाण्यापिण्याच्या वेळा पळत नाही.. एवढ काम?''मग माझ आणि तिच गोष्टिवरुन जोरदार वाजल असत..माझ हट्टाने ऑFFईCEला जाण चालुच राहिल असतं आणि तिच घरी येयील त्याल माझ तक्रार करणं. मग या युध्दाचा शेवट मी एक दोन महिन्यांनंतर नोकरी सोडल्यावर झाला असता..तशी ती माझी आई असण्यापेक्षा मीच तिची 'आई' जास्त होते. तिला ओरडणं अगं अस नाही अस वाग अस नाहि अस बोल..याचा तगादा लवुन बसायचा... मग तिही एखाद्या टिपिकल मिली सरखी''मला सारख सारख काही ना काही का सांगत असतेस? मला आता सगळ कळत.ऽअणि हो तु नाहि मी तुझी आई आहे कळल?'' मग आइ अशि वागते एइकत नाही म्हणुन माझि अधिकच चिड्चिड व्याय्ची.. मग आईइची बड्बड्चालु व्यायची मग मि चिडुन शांतच बसायचे आणि तुला हव ते कर म्हणुन आमच भआँदण संपवायचे. आम्ही प्रेमाने बोलण्याएक्षा भांडलोच जास्त आणि मि कदाचित जास्तच.. जसं एखद्या आईला मुलगि मोठी व्हावि म्हणुन जे काही वाटत असत तसच काहिस मला आई बद्दल वाटत होतं . मला नाही माहीत तिने मला कधी समजुन घेतल की नाही पण प्रत्येक वेळि मी तीला समजुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आले होते..पण काही वेळा मिही तिला समजुन नाही घेउ शकले.. ती मत्र बर्याच्दा मला चुकिच समजत आलि माझ्या वागण्याचे बर्याच्दा तिने चुकिचेच अर्थ लावले मीही स्पष्टीकरण देण सोदुन दिल होत अर्ठात स्वभावाप्रमाणेच..आमच्या नात्याच संपुर्ण आयुष्य याच सावळ्या गोंधळात गेल. आमच नात आई-मुलगी या चोरसात बसणार होत की नाहि ठाउक नाही पण होत ते हे असच होत... खरं तर मी या सगळ्याच गोष्टीना खुपच कंटाळले होते कारण या सगळ्यामद्ये मला लहान असं कुठेच होता आलं नव्हत आणि आई दिवसगणिक लहानच होत चालली होती तिचे हट्ट वाढतच चालले होते.. पण कशीही असली तरी ती मला हवी होती..ती माझी आई होती.तिने खुप सारं भोगल होत ..सहन केल होत.. तिनेच केलेल्या चुकांची फ़ळं ती भोगत आली होती आणि मी ..मी न केलेल्या चुकांचि....! खुप चिडायचे मी तिच्यावर.. का?माझ्याच बबतित अस का? मग हळुहळु कळत गेल ती मझ्याहुन जास्त सहन करत होति नंतर तिला या सगळ्याची इअतकी सवय झाली की तिला काहिच वाटेनास झाल.. कदाचित त्या सगळ्याच गांभीर्य कळलच नव्हत.. असो आता मला त्याबद्दलही बरच वाटतय अज्ञानात सुख म्हणतात ना..तेवढ का होइना तीला सुख तर मिळाल... पण या बद्दलही शंकाच येते... खरं तर मला तिला प्रत्येक सुख द्याय्च होत माझ्याकडुन.. ती जरा भोळिच होती..स्वतःहासाथी जगणारी पण स्वर्थी नाही स्वछंदी होती.. भाह्य सुखावर भाळणारी मझी वेडी मुलगीच होती..गाडी बंगला अशि स्वप्न बळगणारी स्वप्नाळु होती.. हे सगळ माहीत असुनही मला तीचि सगळि स्वप्न पुर्ण करायची होती.. मझ्या जण्याच कडाचीत हेच कारण होत... हे सगळच मला मिळ्वायच होत ते तिच्या साठीच.. पण सगळच कोल्मडुन पडल.. एखाद तैलचित्र रंगवताना अचानक पाणि सांडुन सगळ फ़िस्कट्त तशीच सारी स्वप्न फ़िस्कटली गेली.ऽअता काहीच उरल नाही कुठलेच प्रश्न नाही... आहेत काही प्रश्न पण त्याना आयुष्यात कधिच महत्व दिल नव्हत...त्यामुळे सगळ्याच प्रश्नाची उत्तर मिळाल्या नंतर आता कुठलाच प्रश्न नाहि हाच मोठा प्रश्न...पण आईची स्वप्न जगवत आहेत आणि जगवतेय ती एक व्यक्ती... आता नवा कँनव्हॉस्वर नवी स्वप्न फ़िस्कट्लेल्या रंगातुन नवा रंग शोधुन नवं चित्र रंगवाव लागणार .. उन्मळुन पडलेल्या झाडाच वाहवत जाण थांबवुन आता मातीत रुजण्याचा नवा प्रयत्न करावा लग्णार.. त्या शिवाय आत गत्यंतरच नाही... वाइट फ़क्त अवढ्याचचं की हे सगळ बघायला आई प्रत्यक्ष समोर नसणार...पण माझे बाबा माझ्या सोबत आहेत आणि कायम राहतील.. नवे रंग आणि नवं अस जगावेगळ नात... माझ्याच वयाचे माझे बाबा आता मला लहान होउन जगु देणार .. सोबत आईच्या आठवणी .. खुप सार ग्घेउन जगायच आहे.. आई साठी आणी माझ्या ज़गावेगळ्या बाबांसाठी...

४ टिप्पण्या:

कोहम म्हणाले...

Thanks for sharing....and all the best

अनामित म्हणाले...

पिल्ला, बाबा आहेत पाठीशी... काहीही झालं तरी बाबांचे दोन्ही हात पाठीवर असतील. बाबा दूर असले म्हणून काय झालं? बाबांच्या दहा मनांपैकी एक मन सारखं पिल्लाच्या घरट्यावर घिरट्या घालत आहे... बाबांचं घरटं पिल्लासाठी नेहमीच उघडं आहे...

आणि स्वत: बाबांचे पंख ह्या क्षणी थोडे दुबळे असले, तरी पिसारा झडेपर्यंत ते पंख पिल्लावर सावली धरतील... बाबांचं स्वत:चं घरटं जरी वठलेल्या झाडावर असलं, तरी आता पिल्लासाठी ते झाड नक्कीच मोहरेल...

मात्र तिथे दूर पिल्लाला गिधाडांपासनं स्वत:लाच वाचवावं लागेल... बाबांच्या तडफडीचं हे एक कारण... पिल्लाला आता खूप अभ्यास करून खूप मोठं व्हायचंय...

पिल्ला, बाबांसाठी नाही जगायचं... स्वत:साठी जगायचं!! बाबा असतीलच, पण-पण-पण जोपर्यंत तू स्वत:साठी जगणार नाहीस, तुझ्यात ती उमेद येणार नाही... 'बाबांसाठी जगायचंय' एव्हढाच उद्देश ठेवून जगलीस तर पिल्लू पिल्लूच राहील...

तुझं स्वत:चं घरटं तुला बनवायचंय... बाबांसाठीही बनवायचंय, स्वत:त ती उमेद आण, उंच उड... कमी उंचीवर फक्त मेलेला वारा, खुरटी झुडुपं आणि कुत्रीमांजरं असतात... उंच उड, वारा झेल, उंच फांद्यावरून जग बघ, आणि वर घारींशी लढण्यात जी मजा आहे, ती कुत्र्यामांजरांशी नाही...

तुझं घर आहे बेटा... बाबा आहेत, आई पण येईलच... आहोत आम्ही... थोडा दम धरायचाच...

कोहम म्हणाले...

wah...

RAVSAHEB म्हणाले...

Sneha....tu ugachach swathala dosh det ahes....aga tuzya aaine tuza naav sneha muddamach thevlela....tu sneha ahes..tu saglyana nehmi sneh,aapulaki ani kalaji diliye...mag tyat tuzi chuk kashi asu shakel....ani mala purna khatri ahe tine dekhil tula kadhich chukicha samajala nasnar...karan Aai ahe ti...kontihi aai aaplya pillala kadhich chuk nahi samjat jari tyane kitihi chuka kelya tari...tichi mamta kadhich sampat nahi....tichya mayecha pazar nehmi pajharat asto... bagh ti jari devaghari geli asli tari ti tithun sudhha tuzich kalaji karat asnar.... ani ata tuza kaam ahe ki tu ata tichya sagalya ichha,aakanksha ani swapna swathachi samjun purn kar...ani swatha sudhha swathachya pawalawar ubhi raha....ti sadaiv tuzya pathishi asel...