सोमवार, १५ ऑक्टोबर, २००७

धुरकट झालेल्या वाटेवरुन...

धुरकट झालेल्या
वाटेवरुन चालत जाताना
कित्येक काटे पायात रुतले
रक्ताळलेले पाय झाले
तरिहि कुठलिच सल जाणवत नव्हती
धुरकट झालेल्या वाटेवरुन...

मद्येच वळणावर
फ़ुलासारखे दिसणारे
भासही होते फ़सवे
मन रेंगाळलं
पण पाय नाही थांबले तिथे
दुरकटलेल्या वाटेवरुन
दिसत होता तो सुर्य
लालबुंद सुर्य
तोही कधी ढगा आड लपलेला
छळ्च जणु चालु होता त्याचा
पण द्यास होता तो फ़क्त सुर्याचा
रक्ताळलेल्या पायांना
येणार्‍या प्रत्येक वळणाच काही नव्हत
सुर्या पर्यत पोहोचण इतकच
कय ते भान होतं
संपणार अस वाटणार अंतरही
फ़सवंच होत
पण ढगा आड तर कधि लखाखणार्‍या
सुर्याच तेज डोळ्यात होत..
धुरकट झालेल्या वाटेवरुन...

...स्नेहा

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

don khush hua

अनामित म्हणाले...

kharach atishay sunder liheles...
mi baracyah vela tuzi hi kavita vachtoo...