कधी कधी कळतच नसत अपण नक्की काय करतोय आणि आपल्याला नक्की काय हवंय ते॥ कदाचीत महित असत नेमक काय हव आहे पण ते शक्य नसत...स्वतःहा शिवाय कोणाचीच मर्जी शामील नसते त्यात॥ आणी कदाचित हीत दुसर्याच ऐकण्यात असत... पण मनाला कोण समजावणार? शेवटी मनाचे हट्ट न पुरवता मना विरुध्द जायच... काय चालु आहे हे? का पटत नाही मनाला? आता मी नाही हट्ट पुरवणार मनाचे.... जे आहे त्याच्या समोरे जायची ताकद आहे त्यात... आणी काय वाईट आहे मुंबईत? मला जायचच होत ना कधी ना कधी? का ऐकत नाही मन? आता प्रॅक्टीकल व्हावचं लागेल मग एवढा झगडा कशा साठी?पुण्यात कोण आहे आता? हाच असतो सगळ्यांचा प्रश्न....पुणं... काय दिल पुण्यानं? याचा हिशोब न लावलेला बरा... पण ते सोडवत नाही हे नक्की... खुप आठवणी आहेत.. चुटकीभरच का होइना पण माझ बालपण जगले मी इथे... यश अपयश यातुन तालुन सुलाखुन निघाले... अनेक नाती जोडली गेली... सख्ख्या पेक्षा जवळची नाती... माझे बाबा सुध्धा इथेच मिळाले मला हे विसरुन कस चालेल?नाटक... बालगंर्धवचा पुल... भरत.. गरवारे.. आणी अशी असंख्य ठिकाणं... आणि मुख्य म्हणजे माझं घर.... आणी माझी आई.. घरात अजुनही आईच अस्तित्व जाणवत.. आता... सुटणारी ट्रेन दिसते.. आणी नजरेस ठिपका होत जाणार पुणं.. मनामद्ये अजुनच सामवत जात... जणु सगळ मी बरोबर घेउन चाललेय ...मुंबईत जाताना एक अशा आहे की माझ जग असलेले मझे बाबा मुंबईत येत आहेत कधी माहित नसल तरी येणार म्हणुन का होइना थोड सोप्प जाइन...पुण्याला अल्विदा म्हणवत नाही त्यामुळे शक्य तितकं पुणं सोबत घेउन चाललेय.. कदाचीत पुण्याशी नाळ तुटतेय.. नव्या जगात जाण्या करिता... पण परतुन येण्याची इछ्छा आहे.. करण इथे मिळ्नारा विसावा आईच्या कुशीत आल्याचा भास कुठेच मिळनार नाही.. आणी पुण्याशी नाळ तुटली तरी नात कधीच तुटणार नाही..
तु खुप दीलस... घेतलस.. मी इथे किती मिळवल किती गमावल इतकी हिशोबी नव्हते पन तरिही मला खुप आठवणी आणी मुख्य माझे बाबा दिलेस.. त्या करिता शतशः प्रणाम...
२ टिप्पण्या:
kharach khupach chaan lihila aahe...
kharach khupach chaan lihila aahe...
टिप्पणी पोस्ट करा