व्हेलेंटाइन डे जवळ आलाय.. हे कॉलेज मध्ये गेल्यावर कोणी ना कोणी याची आठवण करुन देतच.. मला त्याच्यात काही सोयर ना सुतक.. (हे हे म्हतार्यांसारख बोलायला लागलेय).. मी एकतर माझ्या व्हेलेंटाइन डेला माझ्या आई कडुन गिफ़्ट उकळायचे... आणि आई मला कौतुकाने द्यायची.. आणि मी माझ्या जवळच्या लोकांना म्हणजे माझ्या छोटुस काहितरी द्यायचे.. मजा यायची.. पण आता.. खरच कशात इट्रेस्ट उरला नाहिये.. (जास्त टेन्शन वैगेरे घेऊ नये.. मी खूष आहे..). पण आहे ते असं आहे...
माझ्या आयुष्यात 'तो' जर आलाच तर बिचार्याची काय अवस्था होइल देवास ठाऊक.. ('तो' कोण हे अजुन माहित नाही.. कळल्यास तुम्हालाही कळवेन)
तर इथे मी अशी आणि माझ्या ऑफिस मद्ये एक पिउन आहे (वाय वर्श ४५ दोन मुलांची आई तेही बर्याच मोठ्या).. ती मला आज सांगत होती मला ना १४ला सुट्टी हवी होती नवर्याबरोबर व्हेलेंटाइन साजरा करायचा होता.. आणि नेमक रविवार असून ऑफ़िस आहे.. मला यावर काय बोलाव सुचेना.. मला म्हणे ''मी त्यांच्या साठी दोन शोर्ट शर्ट घेतलेत..'' मी फ़क्त हसले.. म्हणाले जमल तर लवकर जा आणि मजा करा..
किती सही ना?? आपल्या जवळ आपली माणसं असली की प्रत्येक सण सण म्हणुन साजरा करता येतो..