सोमवार, २० ऑक्टोबर, २००८

Happy Diwali......

दिवाळी म्हणजे आठवते ... आमची दिवाळी धनत्रयोदशी पासुनच सुरु व्ह्यायची.. त्या दिवशी आई किमान २५ जणांना घरी बोलवायची.. निमित्त तिथीने येणारा वाढदिवस... घर भरलेलं.. आईने गोडा धोडाचा घरातच घातलेला घाट... लहानपणापासून हेच बघत आलेले.. आई जाम खूष असायची... मी ज्या फ्रॉकवर बोट दाखवेन तो माझा असायचा.. बर्‍याचदा पैसेही नसायचे पण तरीही तो माझा व्हायचा.. कारण आई त्या वेळेस फक्त माझी असायची... आईने केलेले बेसणाचे लाडू.. ते फ़क्त माझ्यासाठी असायचे.. बाकी फराळातल्या गोडाला मी हातही नाही लावायचे.. ती चव आजुनही जिभेवर रेंगाळतेय.. मला दिवाळी अशी आठवतेय॥


शेवटची दिवाळी...ती पहाट.. सारस बाग.. आणि पणत्या... पहाटे पहाटे ऐकलेली गाणी .. अद्या ,मी ,आई ,काकू... आणि ती (चक्क) हवी हवीशी वाटणारी गर्दी.. ;)पाडव्याची पहाट आईने ती पहाटे पहाटे पैठणीची घडी मोडायला लावलेली.. मी वैतागुन ती घडी मोडली होती... पण दागीने कहीच घातले नाही म्हणुन आईच चिडणं आणि माझा माज .. जसे की साडी नेसुन मी तिच्यावर उपकारच केलेत... सर्रकन सरकतात आठवणी डोळ्यासमोरुन... आईची दांडगी हौस...


तिच्या शिवायची मागची दिवाळी स्मरतही नाही... कारण ती नेहमी सारखी घर भरलेली नव्हती.. मुळात मी माझ्या घरीच नव्हते... मला आवडलेला ड्रेस घेऊन द्यायला ती नव्हती.. पाडव्याच्या पहाटेची मैफील पण... कोणाच्या लक्षात न राहिलेली धनत्रयोदशी...
पण या वर्षी मी मला आवडणारा ड्रेस घेतला.. मला हवा तो... आईनेही तेच केल असत... मी साड्या घेतल्या माझ्या दोन आईसमान व्यक्तींसाठी... काही गंमती जिवाभावाच्या मैत्रिणींसाठी ... आता बाबांची वाट बघतेय... बाबांना हव ते घेउन ध्यायचय.. माझ्या दिवाळीची तयारी तर झाली.. आता दिवाळीही मजेत जाइल.. ती नक्कीच बघत असेल... :)


(वाक्याचा क्रम गंडलाय ठौक आहे तरीही जसे विचार आले तस लिहित गेलेय.. त्या मुळे समजुन घ्याल ही अपेक्षा)


तुम्हालाही दिवाळीच्या हर्दिक शुभेच्छा...

७ टिप्पण्या:

Jaswandi म्हणाले...

खुप मज्जेत जाईल गं तुझी दिवाळी!

happy diwali!

:)

Abhi म्हणाले...

Happy Dewali!!!

अनामित म्हणाले...

मला तुमचे लिखाण खूप आवडले. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या !!!

संवादिनी म्हणाले...

masta lihilays....avadala....tulahi diwalichya khoooop shubhechchha..

HAREKRISHNAJI म्हणाले...

Happy Diwali . Enjoy.

अनामित म्हणाले...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर

Sneha म्हणाले...

hay jas dhannyawad... kharach majhi diwali khuuup chaan geli...:)


innocent warrier & abhi.. thank u...

hay sam miss u yaar.. ye kadhitari ol.. nidan mail tari pathav..

harekrishnaji danyavad..

aniruddha thank u very much..