शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २००८

पर्व ....

सगळच बदलतय... परत एकदा नव्याने गवसायला लागलय काहीतरी... काहीतरी हरवल्याच दुःख मागे कुजबुजतयं पण... मागचं मागे ठेवायची सवय आताशा मनाला लागली आहे.. मुठभर आठवणी सोबत ठेवायच्या पुढच्या प्रवासासाठी.. तोपर्यत सवयही होते.. मग काही दिवसांनी त्या आठवणींचही ओझ होत... पण ती वेळ यायला वेळ आहे.. मध्ये बरच काही घडतं... एकटेपणा छळछळ छळतो.. मनाला अडकून राहण्याची सवय असते ना.. त्याला त्या मोकळेपणाचा वैताग येतो.. अजून बरच काही.. पण आपण आपल्याला आपलीच सवय करुन ध्यायची.. मी म्हणुन मला कधी भेटायचेच नाही कधी.. ती भेट घडवयची... काही कप्पे बंद करायचे.. का आणि किती दिवसांसाठी माहित नाही पण बंद नक्की करायचा.. जग नव्याने सापडु लागत आणि दिसुही... बघ असही जगून... मरण यातना वाटतील पण नंतर तुच या सगळ्यावर हसशील... सगळच बदललय नाही? हा बदल खुप शिकवतो.. आणि मग प्रत्येक बदलाबरोबर आपण शिकतच जातो... सगळ्यांना हे माहित आहेच पण तरिही इथे हे स्वतःसाठी... एक पर्व संपल म्हणायचं .. नाह... ही नव्या पर्वाची सुरवात आहे...
माझी खळबळ केव्हाच संपली.. तरी मी एक वादळ असं का?

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Aaj Pahilyanda ha blog vachala aani aajachi post avadali.
Kharach ase athavaninche kappe baand karun pudhe jaanach taar jeevan aahe na?
Aapan ugach kashat hee adakoon padato.
बघ असही जगून... मरण यातना वाटतील पण नंतर तुच या सगळ्यावर हसशील...

Chaan lihila aahes.
Mast.

---Girish

Innocent Warrior म्हणाले...

Too Good!!!