शुक्रवार, २५ जुलै, २००८

एक झाड ... उन्मळलेलं

आठवतेय ते झाड? त्याचा प्रवास? तुला कसा आठवेन म्हणा? उन्मळुन पडलेल ते झाड... कुठल्याश्या प्रवाहात वाहत होत... त्याची जमीन त्याची माती सगळ सगळ सुटल होत... मग एक दिवस एका नविन पण आपल्याश्या जमिनीत ते परत रुजण्याचा प्रयत्न करु लागल.. मातीही आपलीच वाटत होती त्याला.. मायेचा ओलावा होता त्या मातित.. आईचा स्पर्श होता त्या मातीत.. ती माती जमिन..सामावुन घेत होती त्या झाडाला.. ते झाड परत जगु लागल.. बहरु लागलं... पण कोणाची नजर लागली कोणास ठाउक त्या मातीने हिसकाउन दिल ते झाड... त्या जमिनीने उचकटुन टाकल त्या झाडाला स्वत:ह पासुन... परत कोल्मडल ते बिचार... पण आताशा त्याला सवय झाली होती या सगळ्याची... त्याच्या मूळाशी मुठभर माती शिल्लक होती.. आता जगण्यासाठी तेवढीही माती पुरे ... नुसते श्वास तर घ्यायचेय.. हे झाड जरा निराळच.. आता त्या मुठ दोन मुठ मातीसह बहरतय.. कोलमडल म्हणुन काय झाल.. जगण्याचा प्रयत्न तर करतय... ती जमिन अन माती अशी का वागली.. कदाचित चुकी झाडाचीच असावी.. करण काहिही झाल तरी जमिनही परकीच होती नाही का? पण कोणास ठाउक झाडाचा त्या मातीवर त्या जमिनीवर खुप विश्वास आहे.. कदाचित उन्मळलेल झाड परत उभ राहिलही.. झाडाचा त्या मातीवरचा विश्वास अजुन बहरवतोय झाडाला..