सोमवार, १७ मार्च, २००८

क्लेयर बाईंचे डोहाळे... :)

क्लेयर बाई.... आमच्या ऑफ़िस मध्ये ही परदेशी बाई (बाई मणजे वाचायला आणी ऐकायला ऑड वाटतं माहित आहे पण .. असो मला म्हणायच आहे) तर क्लेयर बाई वय वर्ष ३०-३२ असाव... निळे शार डोळे... आणी गोरा (का पांढरा म्हणावा?) असा रंग वजन म्हणजे आता अजुन जास्त खाल्ल तर फ़ुटेल अस वाटत...इतक... उंची पाच दोन असावी.... अश्या सुंदर तरुणीने एका भारतीय तरुणावर प्रेम केलं ... आणी इंग्रज जरी देश सोडुन निघुन गेले आणी आपला देश स्वातंत्र झाला... तरी त्या बिचार्‍या तरुणाने आपलं पारतंत्र अस ओढवुन घेतल... (अस म्हणतेय कारण तिची मर्जी सांभाळण खरंच कठीण आहे)... अश्या तर्‍हेने क्लेयर बाईंच आगमन भारतात..मुंबईत झालं आता ती आमच्या परदेशीय शाळेमध्ये व्यवस्थापनात आहे... मी जेव्हा तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला जरा दडपणच आल होत.. एक तर तिची भाषा आणी माझ इंग्रजीच ज्ञान.. म्हणजे जरा कठीणच होत.. त्यातुन ती बोलते त्याला आपण फ़ारफ़ार तर पुटपुटण म्हणु... इतक्या हळु आवाजात बोलायची तिला सवय... पण तरीही कसबस मला तिच बोलण समजु लागल...आणी आता आम्ही गप्पाही मारु लागलो... पण मध्येच दोन आठवडे बाई रजेवर ? काळलं नव्हत... मग दोन आठवड्यांनंतर बाई आल्या त्या गुड न्युज घेउन... तशी खबर आम्हाला आधीच मिळाली होती ;) .. पण तिला गोड बातमी सांगीतल्यावर नव्याने आंनद दाखवावा लागला होता... आम्ही डेरी मिल्क देउन त्यांच तोंड गोड केल... त्या नंतर मग मज्जा सुरु झाली ... काय खायच काय खायच नाही... हे मला जेवढ माहीत तेवढ तिला आज्जी बाईंसारख मी सांगीतल....मग झाल बाई रोज विचारु लागल्या काय खाउ ते? पण ह्या इंग्रजांना डोक जरा कमीच या बाबतीत... हा निष्कर्श निघाला.. कारण बाई उलट्या होतात म्हणुन स्प्राइटची अर्धा लिटर बाटली दिवसाला रिकाम्या करु लागल्या.. एकदा असच ती स्प्राईट विकत घेत असताना तिला म्हणाले हे चांगल नाही तुझ्या साठी तर तिने ड्युक्स ची बाटली उचलली याला आता काय म्हणावं ? तिला म्हणाले पी बाई स्प्राइट्च पी... सांगुन तसाही काहीच उपयोग नाही... पलथ्या घड्यावर पाणी... बाईंना डोहाळे कसली तर मॅगडॉनल्ड्चा चॉकलेट मिल्कशेक आणी पनीर सॅल्सा खायचा... चायनीज नुडल्स... आणी देव जाणे अजुन काय ते.... तिला सफ़रचंद व फ़ळ खायला आवडत नाहीत... फ़ास्ट फ़ूड जिव की प्राण... आधीच वाढता वाढता वाढे... एकटा जिव असेल तर ठीक आहे हो... पण...
आता उत्सुकता आहे ते ते कार्टुन कार्ट कसं निघेल याची कारण क्लेयरशी लग्न केल तो केरळचा मल्लु आहे... त्याच वर्णन करण्याची गरज नाही तुम्हाला कल्पना आलीच असेल... :) आता सहा महिन्यांनी काय तो निकाल लागेल... तो पर्यंत क्लेयर बाईंचे डोहाळे पुरवण्याची जवाबदारी ऑफ़ीशीयल नसली तरी ऑफ़ीस मध्ये माझीच... देव करो तिला सुबुध्दी मिळो...

१० टिप्पण्या:

Hemangi Pitkar म्हणाले...

sneha aji war... ki mavashi var mhanu?:D
tula hava te ha sneha:)
tar tuzyavar ata sagalaya arthane ek MOTHTHTHI jababdari ahe ga baai!!!
kiman office madhe aseparyant tari clair baai che sagale dohale neet pure hotat ki nahi neet laksha thev ani tila PANI PURIche dohale lagale ki mag malahi bolavun ghe.. mi yein tumhaala company dyayla

Anand Kale म्हणाले...

Chaaaaaaaan aahe bare.. Dohale...

Tila jari tasa khavasa vatala tari neet samajavun sang ki baii he bara nahi chotusaathi :)..

Tashi tula kalaji kashi ghyavi he sangane na laage..

-- Ek aajoba :)

Monsieur K म्हणाले...

bhaltich mothi jabaabdaari aali aahe tujhyavar!
have fun! :)

सुनिल सावंत म्हणाले...

स्नेहा बाई,

तू 'प्रीनेटल काउन्सिलिन्ग' चा 'साईड बिझनेस' सुरु करायला हरकत नाही. तू आश्लेशा ला दिलेल्या टिप्स ( सुक खोबर नी सफ़रचन्द भरपुर खा बाळ गोर होइल ई.ई.) क्लेअर बाई ला दिल्या असशिलच यात शन्का नाहिच.

वेल, सुन्दर लिहिल आहेस. तुझ्या नेहमीच्या गुढ लिखाणाशी फ़ारकत घेत लिहिल्या बद्दल अभिनन्दन.

सुनिल.

Prasad म्हणाले...

hmm..Mag pagar kadhi wadhnar :)

अनामित म्हणाले...

waaa...
u already proved : tu atisahy sunder ase ghudd likhaan karu shaktes...ani
te servanii manya dekhil kelay..


N now u proved dat u can write something different than as usual...
kharech...tuzyvar aslelei
MMOtHii javabdari tu..servansobat share kelis...

kiti mothi hii javabdari...tu tiii yogya ritinee paar padshil yaabaddal kahi vaad nahii...karan..kalevar bai CLEVER ahhet..tya ektil ase nahii vatat
nahi mala...tari tumchee kaam mhaunun tumhi tilaa Suggestion chaa DOSE det rahacHHH....

kalevar bai + keral chaa MallU bhannat combination ahhee...

yaa combination chaa result allyvar..asach lekh lihun servann kalvaaa...Sneha AAji..

:) Win

संवादिनी म्हणाले...

masta ga...asach chalude...

Sneha म्हणाले...

हेमा तिच तर गोची आहे तिला पाणीपुरी व तत्सम पदार्थ नाही खावेसे वाटत... त्या मुळे मला तिच्या बरोबर चॉकलेट मिल्कशेक प्यावा वाटतो... असू तिच्या वतीने आपण खात जौ यात पाणीपुरी.. :) तसही आपल्याला कारणच लगत नाही.....

आंनद अरे पक्की हट्टी आहे ... आणी तिचा राग येतो करण भारतात राहते पण भरतातल जेवण आवडत नाही तिला... असो होत असेल मि इंग्लन्ड मद्ये जाउन वरण भात नाही खाउ शकले तर माझीही चिडचिड होइलच.. तस काहिस तिच्या बब्तित घडतय... मि सांगायच काम करतेय... आता बाकीच तिच्या वर आहे...

केतन जवाब्दरी कोणी दिली नाही पण शेवती माझी जित्याची खोड आहे मेल्याशिवाय......

सुनिल आइडिया चांगली आहे...
आणी धन्यवाद

प्रसाद पागार बिगार वाढणार नाही रे :( काश तु माझा बॉस असतास ;)

प्रविण जवाब्दारी नाही हा मझा स्वभाव आहे... आता बघु कितपत ऐकतयेत क्लेयर बाई..

स.वादिनी ध्यन्यवाद... :) बर वातल तुझी कमेंट मझ्या ब्लॉग्वर वाचुन...

आणी सगळ्यांना निकाल काय लागेल ते नंतर नंतर सांगेलच.. :)

Jaswandi म्हणाले...

hehe, mast lihilays!

aga sneha tu bloggerch hindi vapartes ka blog lihayla? karan kay hota na khup chuka aslya ki vachanyatli majja nighun jate ga!

pan tarihi SAHI jamalay!!!
and All the best "mavashi aaji" :D ::D

Monsieur K म्हणाले...

'je je uttam' karta tulaa 'kho' dilaa aahe :)