सोमवार, २५ फेब्रुवारी, २००८

समुद्राची गाज ऐकली आहे कधी?

समुद्राची गाज ऐकली आहे कधी?
उधाणलेल्या समुद्रची.. धीर गंभीर..
पण बोलकी तर कधी नुसतीच शांत.. स्तब्ध
वार्‍याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर
तो नाद अधिकच कानात शिरतो...
मग डोळे मिटुन वारा झेलत ती गाज
ऐकत बसायची....
तो सुर्यही त्या निनादाच्या ओढीने
समुद्राच्या जवळ येत असतो...
अन् मीही माझ्या नकळत ...
पण सुर्याची ओढ कदाचीत माझ्यापेक्षा जास्त असावी..
त्याला सहज एकरुप होता येत...
पण मी...?
समुद्राची गाज ऐकली आहे कधी?

...स्नेहा

८ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

खरच कधी ऐकलीच नाही आजवर समुद्राची गाज !
असे निवान्त क्शण आलेच नाही .
पण तू सान्गितल्याप्रमाणे नक्किच असेल ती गाज ...
अन ती गाज ऐकत असताना स्वत:चा शोध घ्यायलाही नक्किच आवडेल !
:-)
छान लिहिले आहेस ...

- सचिन

Monsieur K म्हणाले...

sit in solitude on the white sand, and hear the rustic sound of the waves rushing towards you... those are moments of reflection... moments of absolute, peaceful bliss :)

chhaan lihila aahes!

सुनिल सावंत म्हणाले...

Aga khup vela prayatna kela aahe me. Swata: la haravun takaicha asel tar me hech karato..[:)]

Kavita sunder aahe.

Jaswandi म्हणाले...

waah mastch!

aga pan mhantat na 'atiparichayat avadnya" tasa zalay alibagla 5 mintanvar samudra hota, pan kadhi tithe jaun asa prayatn kela nahi... muddamhun samudrachi gaaj kadhich aikali nahi!
hyavelela karun baghate prayatn! :)

HAREKRISHNAJI म्हणाले...

आपल्या विचारांचा पल्ला जबरदस्त आहे. आपल्याला असे का वाटते की आपण सागराशी एकरुप झालेले नाहीत, मग त्याची ही नित्य नवी रुपे जाणवणे म्हणजे त्या पेक्षा वेगळे असते काय? कितीजण ही निसर्गाची त्याच्याशी समरस होवुन अनुभुती घेत असतात ? किंबहुना त्यांच्यासाठी समुद्रकिनारे हे केवळ जावुन मौजमस्ती करणॆ ,भेळ्पुरी हाडदणॆ या पुरतेच असतात.

जेव्हा जेव्हा मी हा डुंबणारा मोहक सुर्य पहातो तेव्हा मला एक आश्वासक शेर आठवतो.

मौजे गम से कोई ना हो मायुस
जिद़गी डुबकर उभरती है !

काही वर्षांपुर्वी मला माझ्या आयुष्याचा मागोवा घेयचा होता , आता पर्यंत काय कमावले किती जमावले , कोठे जायचे होते ? कोठे पोहचलो आहे इ.इ. मग मी एकटा पोचलो, दिवे आगरला, सुंदऱ्या देखण्या समुद्रकिनारी , सागरतीरी मंथन करायला. मजा आली.

Sneha म्हणाले...

@ सचिन, केतन , सुनिल, जास्वंदी , हरेक्रुश्ण्षाजी

धन्यवाद....

पण बहुदा माझ्या कवितेचा आशय कोणालाच कळाला नाही... मला काही तरी वेगळ सांगायच होत..

Kamini Phadnis Kembhavi म्हणाले...

पण सुर्याची ओढ कदाचीत माझ्यापेक्षा जास्त असावी..
त्याला सहज एकरुप होता येत...>>>आह्हा......

जबरद्स्त ताकद आहे तुझ्या शब्दांमधे.

लखन जोतिराम चौधरी म्हणाले...

गाज