ती रात्र काळी कुळकुळीत... कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी राहवत नाहिये.. आज्काल माझी चिडचिड वाढली आहे अस सगळ्यांचच मत आहे... माझ्या सारखी मुलगी राग व्यक्त करतेय. माझे पेशन्स् कमी झालेत... मी खूप जास्तच रिअक्ट होतेय..वैगेरे माझ्या-मित्र मैत्रिंणींच मत आहे.. हो माझे पेशन्स् नक्किच कमि झालेत.. चिडचिड वाढली आहे.. पण तिला कितपत अवास्तव म्हणाव हे कळत नाहीये..मी २६ तारखेला घटणा स्थळी होते.. एका नामांकित वाहिनीसोबत.. जे तुम्ही टिव्हीवर पाहात होता ते मी प्रत्यक्ष पाहिलय.. त्या वेळी स्वत: खूप हतबल झाल्याच जाणवत होत.. किंबहुना मी.. मी काय तिकडे असलेले सगळेच्जणं मला तसे वाटत होते.. हतबल!! आपण सगळा तमाशा डोळ्याने बघतो परंतू काहीच करू शकत नसतो... माणस येतात जखमी अवस्थेत असतात... तडफ़डत मरणाच दार ठोठावतायेत असा वाटुन जात... नातेवाईकांचा अक्रोश सुरवातीला ऐकू येत असतो परंतू नंतर सगळ सुन्न होत... ताज मधला गोळीबार ऐकलाय मी.. पोलिसांची धावपळ बघितलि आहे मी... हॉस्पिटाल बाहेरचे रक्त.. रस्त्यावरचे रक्ताचे ओघळ काही केल्या डोळ्यासमोरुन हटत नाहीत.. मी जास्त नाही लिहणार या बाबत.. मला खूप त्रास होतोय.. त्रास या बबत नाहि की मी हे बघितल आहे.. उलट बघायला मिळाल हे बर.. सत्य जाणुन घेण्याची क्षमता मला कळलि.. पण स्वतःच्या हतबल पणाची कीव येतेय... आणि परत परत तिच दृष्य येतायेत डोळ्यापुढे...
आणि एक कटु सत्य जे माझ्या मागच्या पोस्टवर झळकलय.. ते मात्र पचयला कठिण गेल होत.. अताशा तेही सवयिच झालय.. आज मला माझा एक मित्र म्हणाला का काही पाउल उचलायची भाषा कर्तेस.. का वढि भडकली आहेस.. आम्हीही भडकलो होतो पण आमची आग क्षमली.. तु ज्या लोकांसाठी करायच म्हणतेस तेच अशी भाषा बोलतात.. पण माझ उत्तर अजुनही एकच आहे.. कोणासाठी म्हणुन नाही करायचय .. करण मला करायच आहे... कोण याची दखल घेउ देत अगर नको घेउ देत मी माझा मर्ग शोधतेय.. मी माझ्या पासुनच सुरवात कर्तेय.. कोणाच्या सोबतीची आशा न ठेवता.. येणारे येतील मी मत्र आत थांबणार नाही
३ टिप्पण्या:
तुझ्या या निर्णयाला शुभेच्छा.
जे करशील ते विचारपूर्वक कर..
Kay bolanar ???
A big question mark....
टिप्पणी पोस्ट करा