मंगळवार, २२ जुलै, २००८

....

अबोला.. कधी कोणी स्वतःशी अबोला धरलाय?

वेड लागलय का तुला अस कोण करत का?

मग आपण का अस वागतो अबोला धरल्यासारखे?

..... निरुत्तर
हं सगळ जगावेगळ करण्याची हौस ना आपल्याला...

तु गप्प बसशिल का जरा... मला शांत बसायचय...

का पण ह्याला काय म्हणायच? कोण स्वतःशी करत नाही असा आडमुठेपणा मग..?

हे बघऽऽऽऽ जाऊ देत चल आपण काहीतरी वाचायला घेऊ
................


मला एक प्रश्न पडलाय?

आता कोणता?

बघ ना अस म्हणतात प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसत म्हणे..जर अस असेलच तर त्याला प्रश्न का म्हणाव?

कोण म्हणत प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाही म्हणुन.. असतात उत्तरं.. मग काही प्रश्नांची उत्तर का सापडत नाहीत?

मुर्ख ती असतात सापडत बसायची गरज नाही.. उत्तर आपोआप मिळतात.. काही प्रश्नांची उत्तर काळ ठरवतो...

काळ.. ????
हम्म

हा काळ काही वेळेला योग्य वेळी नाही येत त्याच काय?

वेळ योग्य की अयोग्य हे आपण ठरवत नाही आपली कर्म ठरवितात....

बापरे काय झाल तुला एक्दम कर्म वैगेरे? ही ही हीऽऽऽऽ बर बर जर ही कर्म ठरवितात तर मग कधी कधी आपण काहीच केल नसत मग आपण न केलेल्या चुकांची शिक्षा आपण का भोगायची?

परिस्थीतीशी झगडायच आश्यावेळी.. नाही भोगायच..

पण काही वेळा पर्याय नाही उरत झगडायला त्या वेळेस?

मग त्या वेळी मुकाट्याने सहन करायच.. पर्याय नसतो ना? सहन करायच आणी आपल्या वेळेची वाट बघायची .....

आपली वेळ?

ह्म्म स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेउन आपल्या योग्य वेळेची वाट बघायची in btw आपले कर्म करत राहायचे..

बापरे आपण फ़ार जड बोलायला लागलो... चला पुस्तकच वाचुयात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: