पाऊस! पावसाच्या सरिंसोबत कित्येक आठवणी सुध्दा भिजतात ना? जणु प्रत्येक पावसाबरोबर त्याच्या सरींसोबत प्रत्येक आठवणी ओल्या होतात.. त्या कधी हसर्या असतात तर कधी नुसत्याच ओल्या...लहानपणी मज्जा म्हणुन डबक्यात मारलेल्या उड्या.. अन मग पाठुन बसलेले आईचे धपाटे ... आनि मोठेपणी जाणुन बुजुन व्हिनचिटर विसरुन मुदाम पाससात भिजणं अगदि रोजचच.. मग आईसाहेबांच्या बोलण्या... कशाचीच मुभा न राखता मनसोक्त भिजत रहायचं...प्रत्येक थेंबाबरोबर नवी आठवण अन मग पावसाची नि त्या आठवणींची चढाओढ.. मग कळत्रच नाही की आपण त्या आठवणींमध्ये जास्त भिजतो का त्या पावसात? साराच खुळा खेळ पण हवाहवासा.. कधी ते आठवणींचे क्षण पावसाशिवाय भिजवतात..तर कधी पवसासकट...तो पाऊसही तसाच आठवतो. तो गार वारा.. वेगाने येणार्या सरी.. मातीचा सुगंध.. मग माझ मलाच विसरुन त्या पावसाच्या सरि झेलणं .. नुसतच भिजत राहण... तशी मी वेडीच आहे पावसाकरिता.. पावसाच येण म्हणजे माझ भान हरपुन पावसाचचं होण... सगळ जग विसरुन जाऊन मन बागडु लागत.. त्या वेळेस मनाच वयं विचारायच नसतं.. सगळ्या सिमा रेषा ओलांडुन ते पावसाशी एक्रुप होत.. गाणं गुणगुणनं.. गिरकी घेण.. सगळ माझ्याही नकळत होत उरतो तो फ़क्त पाऊस अन मी (?)... त्या दिवशिही तसच झाल.. मी एकटीच होते पावसासोबत... आजुबाजुला कुणीच नाही.. त्या मुळे माझा अन पावसाचा जणु मुक संवाद चालु झाला.. त्याची प्रत्येक सर झेलण्याचा माझा खुळा प्रयत्न सुरु होता.. मी अन तो गुणगुणतच होतो... हाताच तळ करुन पावसाला साठवत होते मी.. मध्येच एखादी गिरकी घेत होते... एकुणच सगळा वेडा प्रकार (जगाच्या द्रुष्टीने) सुरु होता.. मी हरवुन गेले होते पावसात तित्क्यात तो आला.. माझ्या नकळत.. कठड्याला टेकुन उभा रहिला.. माझ्या कडे बघतच... मला कळलच नव्हत त्याच येण.. मी मनसोक्त भिजत होते आणि तो फ़क्त माझ्याकडेच बघत होता... एखाद्या कादबरीत किंवा पिक्च्र मद्ये घडाव तसा प्रसंग होता.. मी एक गिरकी घेता घेता माझ लक्ष त्याच्या कडे गेलं.. तो तसाच उभा होता माझ्याकडे टक लावुन... क्षणभर मला काही सुचलच नाही ... आणी चक्क चक्क मी लाजले (?) माझ मलाच आश्चर्य वाटल की मी लाजु शकते?.. असो त्याला भानावर आणत आणी मुख्य म्हणजे मी स्वतः भानावर यायला क्षण दोन क्षण तरि गेलेच असतील... संभाषणाला सुरुवात करावी म्हणुन मी विचारल, '' येतोस भिजायला?'' नंतर लगेचच दाताखाली जिभ गेली आणी स्वतःशीच पुटपुटले काय विचारल हे? तो नुसताच हसला.. मानेनेच नकार देत कोरदा चिट्ट तो म्हणाला अताच भिजलो... दोन मिनिटे मला कळलच नाही तो काय म्हणाला ते आणी जेव्हा समजल तेव्हा सुचलच नाही काय कराव ते... भिजलेली मी अन माझ मन पावसाच्या सरींमद्ये जास्त भिजलो का त्याच्या शब्दामद्ये कळलच नाही....
...स्नेहा
१२ टिप्पण्या:
fantastic post sneha!! :)
Apratimmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
hey, kasla cute romantic ahe! ;)
तो नुसताच हसला.. मानेनेच नकार देत कोरदा चिट्ट तो म्हणाला अताच भिजलो
zakaas!!
hya pavsat vachayala milalela...pahilach mast post..ani manapasun aavdala... mala 'life in metro' madhala scene aathvala Kangna Ranaut bhijat aste na... :)
तुझ्यातला बदल खुप आवडला.. मनापासुन ..पावसापेक्षाही जास्त आवडला!
Kahi khara nahi "Golu"ch..
Pavasat bhijate kay.. Kuni haluch pahatay kay.. ani golu invite karate kay....
Kay challay kay "Pavasat"... ;-)
Majja aahe buaa ekaachi... "Pavasat"..
ek dumm chaaannnnnnnn
me hi bhijalo 2Min.............
baryach divasanni Pavasa baddal kahitari Orig. vachayala milale
Good Good
Keep it up...............
Ashich Bijawat raha......... :)
केतन जुगल thanx
bhaagyashrii... :)
कोहम.. thank u
jas हा बदल वैगेरे नाही गं वर्षापुर्वी लिहिल होत गेल्या पावसाळ्यात या पावसाळ्यात पोस्ट केल इतकच... :) तसे बदल झालेत खुप तुला तेही आवडतील पोस्ट next वाच
आनंद हे अती होतय... :)
निनाद .. thats mu plasure
मी नाही बघितला mero... :(
प्रतिक खुप मोठी दाद आहे चला मी शब्दांने का होईना कोणाला तरी क्षण दोण क्षण भिजवु शकले ;)
Khup Khup Chhan !
Apratim Lihile aahes .....
Baher aata Paaus nastanna dekhil Bhiju aalyasarakhe vatat aahe :-)
Sahich !
sunder........... lage raho
HI
Sneha ..
Mastch lekh aahe agadi bhannat....
Paus nasatana hi bhijanyacha anubhav pahilyandach aala..........
Khup chan lihalayasssss
Keep it up
Aani shubhecha
टिप्पणी पोस्ट करा