सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

झगर-मगर

झगर-मगर झगर-मगर
दुनियाच साली झगर-मगर
लख लख लखकतेय पण च्यायला
हातीच काय लागत नसतय
फूस लावून स्वप्नांना नुसतीच
चमकत राहतेय..
झगर-मगर झगर-मगर
दुनियाच साली झगर-मगर

वाटंवरुन जाताना
फुललेली झाड..
नी मोठ्यालं तळं दिसतय
जवळ जाऊन पाहिल तर तिथ कुणीच नसतय
सर नुसतच फसवतय
झगर-मगर झगर-मगर
दुनियाच साली झगर-मगर

ठरवल सोनं नसल तर सोन उगळायच
व्हत्याच नव्हत सगळच करत्यात
अपन मात्र नव्हत्याच व्हत करायच
वांझोट्या जमिनीवर पेरायच
नुसत्याच झगरमगर दुनियेला
चमकुनच दावायच.. तवर चालु दे तिची
झगरमगर झगरमगर
साली.. दुनीयाच..

...स्नेहा

६ टिप्पण्या:

सखी म्हणाले...

हा attitude आवडला बयो

ठरवल सोनं नसल तर सोन उगळायच
व्हत्याच नव्हत सगळच करत्यात
अपन मात्र नव्हत्याच व्हत करायच
वांझोट्या जमिनीवर पेरायच
नुसत्याच झगरमगर दुनियेला
चमकुनच दावायच.. तवर चालु दे तिची
झगरमगर झगरमगर..........

मस्तच!!

नितिज..... म्हणाले...

अगदी झगर मगर लिहिल आहेस स्नेहा.... खरच दुनियाच साली झगर-मगर :)

Jaswandi म्हणाले...

sahich lihilays! mastch...

Bali म्हणाले...

kon banoga karodpati? chya set warti amitabh bachhan chya aiwaji mala baswala aasta tar!!!!!

akhhe karod tulach milale aaste te pan withaut tax.

Good one!!!

Anonymous म्हणाले...

अप्रतिम ...... मी तुमचे बरेचसे ब्लॉग वाचले फावल्या वेळात ...... खरोखरीच मराठीतून मांडलेले इतक्या सुन्दर पद्धतीचे विचार वाचताना मन मोहरून गेले.... कीप इट अप !!!!!!!

Sneha म्हणाले...

@ sakhi nitij jawanidi thanks..



@ bali... khupach chan pratisad hota...thank u...


@ vikrant thank u so much...