रविवार, ४ जानेवारी, २००९

हे हे हे ही ही :P

हसण हसवण
मला जगायचय विदुषकाच जिणं

एक मुखवटा चढवायचाय पर्मनंटली
चिटकवायचाय चेहर्‍यावर
त्याचे रंग मात्र पक्के हवेत
कुठल्याच पाण्याने न पुसणारे
हसण हसवण
मला जगायचय विदुषकाच जिणं

तस सगळच मस्त नाट्यमय आहे..
फक्त तोच तोच चेहरा
मला अन् सगळ्यांनाच नकोसा झालाय
आता जरा वेगळा चेहरा हवाय
अजुन जगण्यासाठी...
हसण हसवण
मला जगायचय विदुषकाच जिणं

...स्नेहा

1 टिप्पणी:

HAREKRISHNAJI म्हणाले...

मस्त. स्वंताचे दुःख विसरुन दुसऱ्याला हसवणाऱ्या विदुषकाची गोष्ट ठावुक आहे ना.