सोमवार, १ डिसेंबर, २००८

२६... पडसाद .. आणि...

भारताच्या इतिहासाच काळ पान.. जे काही होत ते प्रत्यक्ष बघितलं होत... रक्त.. जखमी.. आणि रक्तबंबाळ मृतदेह... रक्त रक्त रक्त.. सुरवातीला नातेवाईकांचा आक्रोश ऐकु येत होता पण नंतर काहीच ऐकू येयीनासे झाले.. सगळ शुन्य नजरेने बघणारी मी मला आला पैकी वाटु लागली आहे... या विषयावर इ नंतर लिहीन कदाचित पण आज नको.. कारण आजुनही गोळ्यांचा आवाज कानामध्ये घुमतो आहे..काल परत ताज आणि ओबेरॉयला जाऊन आले. २६ तारखेला रात्री सुरु झालेल युध्द.. काल बरच सावरलेल जाणवत होत.. त्या विभागात हे प्रकरण झाल्यापासुन तिकडे जाण्याची माझी ही तिसरी वेळ... पण काल गर्दी वाढली होती.. ताजकडे अजुन जाऊ देत नव्हते पण ओबेरॉय पाशी लोकांची झुंबड होती... आज लोक समुद्राकडे पाठ फ़िरवून होते... सगळे रिकाम्या ओबेरॉय कडे वास्ताविक पाहता त्याच्या फ़ुट्लेल्या काचांकडे आणि दहशदवाद्यांच्या गोळीबारामूळे काळवंडलेल्या खिडकीपूढे आज गर्दी करुन उभे होते... आज सगळ्याच्या हातात कॅमेरे होते... मला त्यांना एक विचारायचीखुप इच्छा होत होती की का? का काढताय फोटोज् आणि व्हिडिओ..? पण.. असो.. तिकडे एका ग्रुप ने विशेष लक्ष वेधुन घेतल... चार पाच टाळकी होती ती आपल्याच वयाची.. चार्ट पेपरवर काहिसे संदेशे लिहून आणले होते.. नंतर ते जमिनीवर ठेवुन सगळ्या लोकांना मेणबत्या देत होते... त्या पेपरवर काही संदेश लिहले होते जसे.. मुंबई आय अम विथ यु .. वैगेरे अशा आशयाचे ... मीही गेले एक मेणबत्ती लावली.. क्षणभर डोळे बंद केले.. पण मला काही केल्या शांतता मिळतच नाहीये... नंतर मी त्या मुलांशी बोलायला गेले.. त्यांच आधी अभिनंदन केल... खूप बर वाटल होत मला आत कुठेतरी कोणितरी आपापल्या पध्दतीने का होईना..पण पाऊल उचलण्याचा प्रयन्त करतय? त्यांना हे बोलुनही दाखवल.. नंतर मी त्यान्न विचारल तुम्हाला अस नहि वाटत का आपण अजुन काहितरी करायला हवय? आणि त्यांना जे काही शक्य होइल त्या बबत माहिती दिली (ती मी इथे देZणार नाही..करणं नंतर केव्हातरी) मला त्याच्या कडुन आशा होती.. पण चुकलच माझ त्या ग्रुप मधल्या एका मुलाने सरळ सांगीतल.. म्हणे नाही आमच्याने हे शक्य नाही .. करण काय तर आम्हला वेळ नसतो.. मी विचारल मग आज तरी का वेळ काधला? नो वि जस्ट वॉन्ट तु शो थे मुंम्बई डत वि आर विथ मुंम्बई... माझ टाळक सटकलच... मी Mहणाले अचुलि थॅकस् बट काही गरज नाहीये या सगळ्याची तुम्ही मुंबई बरोबर नाही मुम्बई तुमच्या बरोबर आहे तुम्हाला काही पर्याय नाही म्हणुन तुम्ही इथे आहात... आणि हे जे काही चार मेणबत्त्या जाळून तुमची शोक सभा दाखवताय किंवा तुमचा सपोर्ट दाखवताय याचीही काहीही गरज नाही.. इटस् ऑल बुलशिट.. मला कळतय तुम्ही हे का कर्ताय एक तर आज रविवार त्यामूळे वेगळा वेळ काढायची गरज नाही.. त्यात अस काही केल की 'आपण काहीतरि केल' अस समाधान मिळुन जात.. त्यात मिडिया वाले असतातच कोणास थाउक तिव्हीवर झळकायला पण मिळेल तेवढच कौतूक सगळीकडे(मी जेव्हा त्याच्याशी पहिल्यांदा बोलण्यास सुरवात केली होती तेव्हा ते मला पत्रकार समजले होते.. आणि नंतर कळल मी हे बोलायला नको हव होत)..मी खूप भडकले होते.. त्या वेळेस माझ्या डोल्यासमोर का कोण जाणे करकरे, साळस्कर, कामठे उभे होते.. संयम सुटला होता.. त्यांना म्हणाले तुमच्याशी बोलुन मी माझा वेळ आणी उर्जा दोन्हीही फुकट घालवली.. असो.. मी निघाले त्या मुलांपैकी एकाला काय वाटल कोणास ठाऊक त्याने मला माझा नंबर मागितला.. मी क्षणभरविचार केला आणी त्या मुलाला नंबर दिला.. तो म्हणाला वेट आय विल गिव्ह यु मिस कॉल.. आय सेद्ड नो नीड.. आय डोन्ट हॅव दट मच स्पेस इन माय मोबाइल.. वास्ताविक पाहता मी इतकी रुड कोणाबरोबर नसते.. पण तेव्हा माझ्या डोळ्या समोर पुर्ण २६ची रात्र होती.. आजुनही तो गोळ्यांचा आवाज घुमतोय.. अस म्हणता म्हणता आता त्या नंतर उरलेली निरव शांतता जास्तच किंचाळतेय तो आवाज त्या गोळ्यांपेक्षा कर्कश वाटतोय... आपण सगळेच काय करतोय आणी आपण काय करायला हवय? तुम्हाला काहीच छळत नाही का?
मला कळतय की मी खूप जास्त बोलतेय किंवा मी इतक बोलायला नकोय पण आत काहीतरी खूप खदखदतय.. मला एक मर्ग सापदलाय आणी त्या मर्गावरुन जाण्याचा निश्चय मी केलाय.. निदान मी प्रयत्न तरी करणार आहे.. तुम्हीही तुमचे मार्ग शोधा जर वेळ मिळालाच तर.. [ परत खवचट :( ]

९ टिप्पण्या:

AKS_AMOL म्हणाले...

hey sneha... khara mhanje majhya manatala sudhha bolalis tu...infact majhya tujhya kay pratyek samanya mansachya manat ashach akhand jwala dhag dhagat asatil ata... pan shevti aapla bharatiyatva aadawa yet asava saglyanchya... mhanje koni kahihi karo...gharat ghusun maru... kahi nahi..aamhi shok karnar aani nantar tyana maf karnar.. khara mhanje aaplya saglyanach jaga houn kahi tari karayala havay..pan parat to Rang de Basanti cha dialougue aathawato...ghar ki safai me haat gande karega kaun...
anyway.. mi hi tyala kahi apwd nahiye.. aapan kay karu shakto mhanun shant basun fakt pahatoy... manya aahe chuktay majha dekhil pan kharokhar kahich disha nahiye... varanvar janiv hote... chidahi yete saglyanchi..pan parat vichar karto ki kuthe tari suruwat jhalich pahije... tu jo kahi marg nivadala ashhil...mi tujhya pathishi aahe...

Kanchan Chavan म्हणाले...

काही होणार नाही स्नेहा. आपल्याकडची लोकं मुर्दाड आणि स्वार्थी आहेत. का आपण दोष द्यायचा दुसा-र्‍या देशाला? आपले विचारच आतंकवदाला किती पोषक आहेत. वेळ नाही म्हणे यांना. असाच वेळ हे डिस्को, पब मध्ये घालवतील पण देशासाठी यांना वेळ नाही. आपल्यासारखी आवाज उठवणारी लोकं 'दुसा-याच्या घरात शिवाजी जन्माला घालणारी असतात' बरं यांच्या मते.


हेल्मेट घातलं नसेल तर पोलिसाला लाच देतात, त्याच पोलिसांना कसं खडसावून विचारणार हे? पोलिस म्हणणार पगार कमी आहे, मग हे त्यांना पोलिसात भरती होण्याआधी माहीत नसेल काय?


मीडियावाले आपापल्या वॄत्तपत्रांचा खप वाढवण्याच्या नादात परस्पर्विरोधी बातम्या एकाच आवॄत्तीमध्ये देतात आणि वॄत्तवाहिनीचा टी. आर. पी. वाठवण्यासाठी वार्ताहर, कॉमन सेन्स गहाण टाकून थेट प्रक्षेपण करतात. पोलिस दलाकडून समज मिळेपर्यंत हे त्यांना समजलंच नाही?


आमच्या देशाची प्रेरणागीतं काय, तर जिंकू किंवा मरु.. मग कशाला कोणाला स्वारस्य असेल सैन्यात जाण्यासाठी? सैन्यात जाणं म्हणजे फक्त मरणं का?


राजकारण म्हणजे गजकर्ण. बाप मुलाला सांगतो, एक वेळ भीक माग पण राजकारणात जाउ नकोस.
तू, मी मुली आहोत. आपल्या घरचंच उदाहरण घे. आपण म्हणालो राजकारणात जातोय, तर घरचे मुलगा बघायला लागतील, ही आपली मानसिकता आहे.


जर मानसिकताच बदलत नाही तर परिस्थिती कशी बदलणार?


जिजाउंनी शिवबा घडवला, तेव्हा काय त्या आईला माहीत नव्हंतं, ती काय करतेय? आता जिजाउच नाही, तर शिवबा कुठे?

Sneha म्हणाले...

malaa ithe tumha doghanna 1k sangavas vatatay...

specialy kanchan yaanaa.. apaNas kuthelyahii raajkaranyalaa dosh laavanyaache karan naahii naa apalyaalaa to hakk aahe.. he mi sagalyannach uddeshun bolatey malahi... apan matdan karata kaa? aani karat asal tar jo kon neta nivadun yeto tyachya samor kadhi kuthela saval khada karata ka?
aamhala kuthe kimmat aahe amhi samany asa mhanat.. aapan aapal aayushya raajkaranyaana dosh denyat ghalavato...
polis... mala prachand aadar aahe aata tyanchyabaddal.. tumhi nehami bhatrachar karanare police baghata.. aani tyanchyavar tika karatat pan mi 26ratrabhar tya thikaNi hote.. polis disale ki mala salute karayachi ichcha hote mala aata.. ajunahi muthebhar kaa hoina pramanik .. kartavyadaksh police aahet deshat.. karkare kamathe salaskar.. hotech na system madye tyancha jivantpani itaka gajavaja jhala nahi to?
na mediane kela na tumhi...?

rahata rahila prashn mediacha.. baryachdachukate mahiti aahe pan amachya ithe INDIA TV sarakhya channelschech TRP rate ka high asatat yach uttar mala ajun nahi milat...


tumhi shivajiche udaharan dil .. tumhi ka nahi prayatn karat shivaji honyachaa... navya shivajichi tumhihi vatach paatay naa?

अनामित म्हणाले...

अग स्नेहा,

मुम्बई म्हणजे शो अप , ७-११ ला नाहि का...काहि तासात पुर्व पदावर आलेल्या मुम्बई ला "मुम्बई स्पिरिट" अस गोड नाव देवुन नाही का गप्प बसवल गेल. मुम्बईत येणारे हे "पोटार्थी" मुम्बई ला देणार ते काय? वर "कुठे गेला राज ठाकरे या वेळी ?" असा उद्दाम उर्मटपणा किन्वा निर्लज्जपणा चा कळसच म्हण, करणार आणि सोयिस्कररित्या आपल्या बिळात लपुन भिकारडी हिन्दि चेनेल्स बघत बसणार. त्यात दाखवलेल्या "खवचट कोट्या" ना बातम्या मानुन मराठि लोकाना टार्गेट करणार. शिव्या देवु नाहि शकत पण थाम्बवु पण नाहि शकत. या लोकाना वाचवण्या साठि आमच्या कर्तव्यदक्ष अधिकारयानी प्राणार्पण केल? शेम ऑन ब्लडि कॉवर्ड रेट्स. शेम ओन देर शो अप ऑफ़ हीपोक्रेटिक इन्डियननेस. दे आर ब्लडी हीपोक्रेट. हीपोक्रेसी द नेम इज मुम्बई... हीपोक्रेसी द नेम इज इन्डिया... हा हा हा.......

sunya

Kanchan Chavan म्हणाले...

मला नाही वाटत, मी तुझ्या ब्लॉग वर लिहिलेल्या कमेंट मध्ये एकाही राज्यकर्याला वा राजकारण्यांना दोष दिला आहे. माझ्या ब्लॉग वर म्हणशील तर, त्यांन दोष देण्यापेक्षा, त्यांनी काय करावं याची मी माझ्या नजरेतून लिहिलेली समीक्षा आहे. मी एक सर्वसामान्य माणुस आहे आणि मी जे काही लिहिते त्याची दाखल घेतली जाते, एवढे कारण मला लिहिण्यासाठी पुरेसं आहे. माझ्या लेखांमधुन मी त्यांना विचारलेले प्रश्न आहेत, कारण मी मतदान करते आणि मलाच नव्हे तर या देशाच्या प्रत्येक नागरिकाला असे प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. उद्या राज्यकर्त्यांच्या उदासीन भूमिकेमुळे जर पूर्ण देशात कोणी मतदान केलच नाही तर?? राज्यकर्ता हा सामान्य माणसामधूनच निवडला जातो, तो काही आकाशातुन पडत नाही.

आज मला पोलिसच काय पण कोणीही सामाजसेवक दिसला तर सल्यूट करावासा वाटतो. पोलिस भ्रष्टाचार करतात कारण आपण त्यांना तो करू देतो, शेवटी पोलिस सुद्धा सामान्य माणुसच ना? शिवाय त्या भ्रष्टाचाराचं कारणही मी आधीच दिलं आहे. करकरे, साळसकर साहेबांसारखीच माणसं यात बळी जातात कारण त्यांनाच खरी चाड असते नितीची आणि त्याची भीती असते त्यांच्याच आसपास अनैतिक काम करणा-या कित्येक जणांना.

I think India TV has a maximum TRP because they have initiated process in many things. You should have watched them today. I dont know the TRP of Saam Channel but they are good too! here I am talking about the commonsense which none of the news channel showed on Wednesday.


माझ्या बाबतीत म्हनशील, तर मी आधीपासूनच एका एन. जी. ओ. सोबत काम करतेय, त्यांचं नाव कदाचित मी पुढे मागे माझ्या लेखांमध्ये स्पष्ट करेन. फक्त एवढंच सांगेन, याहीवेळी, देशात देव न करो पण असा प्रसंग पुन्हा उदभवलाच, तर सामान्य नागरिकाने पॅनिक न होता आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याची मी माहिती गोळा करत आहे आणि त्यासाठी मला फक्त अंदाज बांधून चालणार नाही, त्यासाठी त्या, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ ब्यक्तीला भेटणे आवश्यक आहे, because terrorism is the thing, you can retaliate but you can't prevent.

ट्रेनमध्ये स्पिकरची चोरी, रस्त्यावरच्या गटारांच्या झाकणाची चोरी अतिरेकी करत नाहीत पण पैशाची भूक माणसाचा सैतान बनवते. सैतान अणूरुपातुन संघटीत झाला, तर तो अतिरेक होतो आणि याला आपण रोखण्याऐवजी हा प्रश्न दुस-याला विचारतो की तू शिवाजी होणार का?

Sneha म्हणाले...

कांचन...
अगं मला व्ययक्तीक तुझ्या प्रतिसादाच अस वाईट नाही वाटल.. पण मी आजतागायत सगळ्यांना राजकारण्यांना शिव्या किंवा दोश देतानाच ऐकतेय.. पोलिस भ्रष्टाचारी आहेत.. सगळ वातावरणच दुषित वैगेरे वैगेरे गोष्टी ऐकतेय.. वर सुनिलने लिहलेलि कमेंट बघ काही जण त्याच्यासारख हसतात... किंबहुना सगळेच अशिच प्रतिक्रिया देतात.. इथे सगळेजणं शिवाजी वैगेरे उदाहरण देतात.. पण काम? अगं आपण आपल्या पासुन सुरवात करायला हवि.. मी इंडिया टिव्हीच उदाहरण दिल कारण तिथल्या बातम्यांमध्ये सत्य किती असत याही पेक्षा ते असलच तर कस दाखवल जात? आणि मी किती लोक सांगू जे सुशिक्षीत आहेत परंतू अशीच चॅनलस् बघतात..
खरतर मी खूप चिडलेय.. मी सामान्य माणुस आहे या वाक्यावर.. आपण तु म्हणलिस तस आपणच निवडून देतो वैगेरे खरयं... पण जो निवडुन येतो त्याने काम केल नाही म्हणुन जाब विचारायला गेल्याच दिसुन येत नाही.. हे मी बोलतेय कारण मी आमच्या इथल्या नगरसेवकाला विचारायचे.. जेव्हा मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हाही विचारल होत आणि मिळाला तेव्हाही हक्कने सांगात्यचे मी मत दिलय पण तुमच काम?
इथे सामान्य माणुस आपाळ्या पोटामागे धावतो.. मन्य आहे.. पण त्याच्यावरही काहितरी जवाब्दारी असायला हवी.. थोडा वेळ यासाठी काढण नक्कीच अवघड असेल पण अशक्य मुळीच नाही.. आता जाग होण गरजेच आहे...

मला या पोस्ट नंतर बरेच मेल आले कोणाला आवडल तर कोणाशी वाद झाले .. कारण सगळेच जण इतरांना दोष देत होते.. एका मित्राने तर चक्क मला सांगितल मला नाही अवडल कारण वाचुन डिप्रेस व्ह्यायला होत.. पण सगळ्याना एकच सांगण आहे हेच सत्य आहे.. मी खुप कमी शब्दात आणि तुटक मांडलय तरी.. एकच सांगावस वाटतय सुरवात कुठुन तरी म्हणजे आपल्या पासूनच व्हायला हवी कारण आपणही कमी पडतोय कुठेतरी अस नाही वाटत का?

Kanchan Chavan म्हणाले...

मला समजून घेताल्याबद्दल आभारी आहे, स्नेहा. मी जी मानसिकता महणते ती हीच. सर्वांना काहीतरी घडावंसं वाटतं पण ते दुसा-याने करावं अशी अपेक्षा असते पण म्हणून आपण खच्ची होऊन करणं सोडायचं नाही. मलासुद्धा ई-मेल येतात, फोन येतात, त्या सर्वांचा सूर हाच असतो की काहीतरी मस्त असं भारतासाठी घडायला हवं, ते तू करू शकतेस. व्वा! काय म्हणू मी याला?

मी पण सर्वसामान्य माणसाप्रमाणे पाकिस्तानला शिव्या दिल्या, रडून रडून माझा राग व्यक्त केला पण पुढे काय? हेमंत कारकरे गेल्याची बातमी ऐकल्यावर जो विचार पहिल्यांदा मनात आला होता, तो नंतरच्या दोन दिवसात कुठेतरी खोल दडी मारुन बसला होता. त्यादिवशी गुरखा रात्री जोरजोराआत दांडूका आपटत गेला आणि डोळे खाडकन उघडले, मनातला तो विचार एकदम उसळत वर आला, त्यावर लिहावं की नाही असा विचार करून शेवटी रात्री '360 डिग्री' लिहिला. सुज्ञ लोकांनी कमेंट मध्ये काही न लिहिता ईमेल करून, काही व्हीडीओज पाठवून त्यांचं समर्थन दर्शवलं.

आपल्या लोकांनी आता पाकिस्तान, राजकारणी आणि सुरक्षा यंत्रणांना दोष देणं बंद करावं आणि स्वत:चा बचाव स्वत: करण्यासाठी काय करता येईल, याकडे जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतंय. मी यावर पण एक आर्टिकल लिहिलं आहे, जमलं तर वाच. खरं सांगू, आपल्याकडे करण्यासारखं भरपुर आहे पण करण्याची ईच्छाच कोणाला नाहीए.

काल कोणाचंतरी लग्न झालं, तो फटाके वाजावतोय, टूरिस्ट कंपन्यांनी वर्षअखेर सहलींचे प्लान्स सादर केलेत. जनजागॄतीची सुरूवात कुठून करावी लागणार हे कळतंय ना तुला? मला सांग, तुझ्या एरियातील नगरसेवकाचा राग आला तुला; तू होशील नगरसेवक? मला वाटतं तू होशील कारण केवळ पेटून उठणं आणि विझून जाणं एवढीच तुझी भूमिका मला दिसत नाही. यालाच सामान्य माणसातील असामान्यत्व म्हणतात आणि ते जप. मी आता आमच्या इथल्या नगरसेवकांना जाउन भेटणार आहे, त्यांनी जे अकलेचे तारे तोडलेत, त्यासाठी. आता त्यांना ठाण्यात शहीदांचं भव्य स्मारक बनवायचंय. कशाला? कावळे, चिमण्यांना आणि कुत्र्यांना इतर जागा नाहीत का ? त्यांना जर इतकी चाड आहे शहीदांच्या बलिदानाची, तर तोच पैसा त्यांनी हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या ईलाजासाठी किंवा अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा, पण नाही.

हे सर्व आपणच थांबवू शकतो, स्नेहा. लोकांना शिवाजी हवा आहे, आपण बनू या. फार फार पुर्वी एका टू व्हिलरची जाहीरात यायची, त्यात आमिर खान म्हणायचा, "अकेले होती है, हर नयी शुरुवात, अगर शक्ति है पास तुम्हारे, तो जमाना देगा साथ." मला ते स्लोगन अजूनही लक्षात राहीलंय आणि मला वाटतं आपण तेच करायला हवं. आपली शक्ति आपणच आहोत. लेट्स स्टार्ट.

Sneha म्हणाले...

hmm kanchan lets start... tujhyahi blogvar hich comment keli hoti jamalyas bagh.. vachalay tujha blog...
aata thambun upayog naahi..

अनामित म्हणाले...

mi kuthetari wachalay...
"pratyek sainikach kartavya he apalya deshasathi marane nahiye, tar.. samorchyala tyachya deshasathi marayla lavane aahe"

http://my.opera.com/prabhas/blog