बुधवार, २५ जून, २००८

मरणाचा सोहळा

खुप प्रयत्न केला तरी आपण काही गोष्टी टाळू नाही शकत... हे पोस्ट मला आठवड्यापुर्वीच टाकायच होत पण नको म्हणुन थांबवल स्वतःला.. पण काही करुन मनातुन हा विषय जात नाही.. नुसत आठवल तरी तळपायाची आग मस्तकाला जाते... इथे काहीतरी खरडुन शांतता मिळेल अस नाही..पण.. माहीत नाही इथे मोख़ल करावस वाटतय...नेहमीप्रमाणे त्या दिवशीही सकाळी ऑफिसला गेले.. काही वेळाने एका माणसाने सांगितल की काल मॅडमची आई गेली... जास्त वाईट वाटायच कारण नव्हत त्यांच वय खूप झाल होत .. म्हणुन नेहमी प्रमाणे गोराई प्रवासला सुरुवात .. प्रवासात गप्पा गाणी बडबड सगळ नेहमी सारख चालु झाल... परत ऑफिस मध्ये येई पर्यंत डोक्यात मॅडम त्यांची आई हे विषय पुसुन गेले होते... दिवसाला सुरुवात झाली नेहमी प्रमाणे.. मग क्लेयरने सांगितल की आपल्याला चर्च मद्ये जायच आहे दुपारी.. आणी दुपारी आम्हा सगळ्यांची स्वारी दादरकडे निघाली... निघण्या पुर्वी सगळ्या स्टाफला येण्याच विचारण्याच काम माझ्या कडे सोपविण्यात आल होत.. तिथे पहिला आश्चर्याचा धक्का बसला... माणसं अशीही असु शकतात अस वाटुन गेल... एका शिक्षिकेला विचारल तु येणार का? तेव्हा तिने प्रति प्रश्न केला कोण कोण येणार... तिथपर्यत ठिक होत पण ती येणारहि नव्हती पण दुसर्‍या वर्गातल्या शिक्षिका येणार तर सरांच्या नजरेत आपण येउ मग आपल्य नोकरीला धक्का आहे वैगेरे विचार ती मांडत होती मला तिचा रागच आल होत.. मि सरळ तिला म्हणाले मनात नाही तर येऊ नकोस तिथे कोण आल आणी कोण नाही हे बघत बसायल कोणालाच वेळ नसेल आणी कोणी त्या मनस्थितीतही नसतील...(खुप पल्हाळ लावतेय पण ही घटना महत्वाची आहे) आणी आम्ही दादरला निघालो.. माला त्या दिवशी काय झाल होत माहित नाही.. मि अशी कोणाला तरी भेटायला चालले आहे तरी मस्त मज्जा मस्ती चालु होती संपुर्ण प्रवासात... नंतर गाडी ददर मद्ये शिरली आणी एका घरा समोर उभी राहीली तशी मी अचानक शांत झाले आणी मला परिस्थितीच भान आल... वर त्या आजींचा म्रुतदेह होता त्याच अंतिम दर्शन घ्यायला अम्ही आलो होतो... सगळे वर गेले.. मला अशा ठिकाणी जायला खरच नकोस होत... पण मीही धिर धरुन वर गेले.. खाली येताना खुप हळवी झाले होते आज परत एका मुलीने तिच्या आईला गमवल याची जाणीव होऊन मन हळव झाल होत.. खाली उतरले तर जिन्याच्या बाहेरच सर आणी आमच्या ऑफिसचा स्टाफ हसत आणी खिदळत उभे होते.. हा दुसरा धका..त्या नंतर आम्ही चर्चमध्ये गेलो... माझ मन सुन्न झाल होत... चर्च मध्ये ५०० लोक होती.. पण ती फक्त गर्दी होती शाळेत त्या शिक्षिकेला जी भिती वाटली होती त्या भिती पोटीच ही माणस जमा झाली होती... माझा जिव तिकडे गुदमरत होता... त्यांच्या प्रार्थना सुरु झाल्या.. माझ्या ऑफिस मधल्या एका महामयेने मला त्या वातावरणात दात काढत विचारल तुझे विचारल स्नेहा जमता तुझे जमता है ना इनके जैसा उठक बैठक करना ही ही ही... मला त्या क्षणी तिच्या कानाखाली जाळ काढण्याची इतकी इच्छा झाली होती.. कारण ती बाई मैतीला आलो आहोत अस विसरुन फ्युनरल पार्टीला आली आही आशा आर्विभावात वागत होती... नंतर फक्त तिच तस वागत नाही हे समजाल आणी माझ्या चहुकडे माणुस या नावाखाली वावर्णारे कुठलेसे विक्षिप्त नालायक आणी भावनाशुन्य प्राणी आहे हे जाणवल.. पण उशिर झाला होता प्रार्थना सुरु झाल्या होत्या आणी मी जरा आतल्या बाजुस उभी असल्या मुळे मला निघताही येत नव्हत... दोक्यात प्रचंड चिड राग दुःख सगळ एकत्र झाल आणी दोळ्यातल पाणी मी थांबवु नाही शकले... तिथे उभ राहण अशक्य होत पण पर्याय नव्हता... माझी नजार राहुन राहुन मॅडम कडे जात होती... किती संयम आहे त्यांच्याय वयाने इतका संयम येत असावा... ह्या बाईने आज आइला हरवल पण जास्त रडारड नाही.. त्यांच्य पध्द्ती आणी रुढी प्रमाणे सगळे सोपस्कार करत होत्या.. मला हेवाच वाटला त्यांचा... खुप आदर वाढला.. पण....त्या दिवशी देवाच्या मनात काय होत कोण जाणे ? चर्च नंतर आम्ही स्मशानात गेलो.. माझ्या मनात काय काहुर माजल होत मलाच माहित... पाय आणि मन सुन्न सगळच झाल होत... तिकडच द्रुश्य बघुन तर ... काय कराव कळेना.. खुप शिव्या घालाव्याश्यासुटलो वाटत होत्या सगळ्यांना... मेलेल्याच्या टाळुवरच लोणी खाणारे होते सगले.. दोन थडग्यांच्या मध्ये चालायला वाट केलेली असते हे विसरुन लोक थडग्यांवरुन पाय देत पुढे जात होती.. काही जण चक्क धडग्यावर उभे राहुन मरण सोहळा बघत होते... मला सगळ अनावर होत होत... मी त्या गर्दीचा एक भाग आहे ही भावना ...शब्द नाही सापदत मला... शेवटी तोही विधी संपला.. वाटल त्या आजी मॅडम आणी मी तिघेही एकदाचे सुटलो... म्हणजे या मरण सोहळ्याच्या अंकाचा इथे शेवट झाला... या लोकांमध्ये त्या खड्यात माती टाकायची पध्दत आहे मी तिथपर्यन्त जाण टाळल... तर आमच्या क्लेयर बाईंना काय हुक्की आली कोण जाणे तिला वाटल मी सगळ्याला घाबरतेय की काय.. म्हणे चल आपण दोघी जाऊन माती टाकु... ती ते अश्या पध्दतीत बोलली जस ..जाऊ देत... तिच्या साठीही तो सोहळाच होता हसण खिदळन..सगळच तिठली लोक सहज करत होते... अम्हि निघालो.. तिथला एक एक क्षण इतका जड जात होता.. मी डोळे मिटल्यावर मला माझी आई दिसत होती.. माझ मन माझ्या बाबांच्या कुशीत धाव घेत होते... पण त्यतल सगळ्च अशक्य होत आहे.. हि जाणिव होत होती.. माझा घराकडे प्रवास सुरु झाला... मध्ये मैत्रिणिकडे ही चिड चिड बोलुन झाली.. डोळ्यासमोर सतत मॅडम त्यांच्या डोळ्यातुन आलेले ते आष्रु .. माझी आई आणी...ऑफिस मधल्या मैत्रिणि बरोबर बोलताना हा विषय निघाल मला तिने विचारल काल तुझ्या डोळ्यात पाणी का होत... मि उत्तर दिल एक मुलगी पोरकी झाली म्हणुन.. तिल एवढच झेपण्यासारख होत... तर तिच उत्तर ऐकुन सगळ्यत मोठा धक्क बसला... तिच्या निरिक्षणाला दाद दिली पाहिजे... ति म्हणाली स्नेहा उधर सबसे दुखी सिर्फ़ तुही लग रही थी .. ओर तु किस बेटी की बात कर रही है? तुने देखा नही वो सिल्क की अच्छीखासी प्रेस की हुयी साडी ऑर लिप्स्टिक लगाये हुवे आयी थी उसकीही मॉ के फ़्युनरल पर... तु ना पागल है ज्यादा सोचती है...छोड॥
मी निशब्द्च होते...

एक अजुन निर्लज्ज गोष्त म्हणजे या मरण सोहळ्याचे फोटो काढले जात होते

५ टिप्पण्या:

sonal m m म्हणाले...

true...speechlessness is what, that can happen to you !!!

Anand Kale म्हणाले...

Such a shameful act...
Any aapan yala modern people mhanato...
Ashya lokanchaa dhikkar aso... jyanna manasachi kadarach rahili nahi...

And feeling sorry for u as ur in company of such heartless peoples..

अनामित म्हणाले...

Dear madam
i can understand what u feel. pan mala ek gost sangavisi watate, ki tya aaji khupach old hotya tyamule tyanchya marananantar sagalya relatives na free vatale aasel. vachaila he jara strange aahe pan its true.dusare aase ki dukhhacha jor ekda osaralavar tyavishaei kahich watat nahi.tumhi pan anubhavale aasel ki anandacha or dukhhacha kshan(bhar)osaralyavar 2-3 tasanantar aapalya emotions tivra rahat nahi. office madhalya lok tachech waganar karan dusaryancha dukhhane dukhhi honyache divas sampalet(pan exception aahet)

Monsieur K म्हणाले...

this is really disturbing... u feel helpless in such situations.. but thats the way, life is.. sad, but true..

:(((

मी रेश्मा म्हणाले...

Sneha ,
Kay reply dyava yala kharach niruttar aahe mi karan..
Manus makad hota he aikal hot
pan tuzya ya lekha varun Pratyaksha te makad pan itak lajavel itaki nishtur asalyachi kalpana dolyasamor ubhi rahili.....

Agadi dokyat jatat asale lok...