प्रत्येकालाच असते...
स्वप्नांनी व्यापलेल
भावनांनी साठलेलं
आपलं अस परिघ..........
पण शुन्यही पण गोल असतो
त्यालही परिघ असतेच ना?...
त्याचा नेमका अर्थ काय?
हे कुणालाच ठाउक नसते
सारा बहुदा शुन्याचा खेळ
शुन्याने शुन्याला गुणायचं
अन शुन्य म्हणुनच उरायच...
का दिवसेंदिवस व्यापत जाणार्या
त्या परिघात हरवायच?
...स्नेहा
शुक्रवार, २८ डिसेंबर, २००७
Bye Bye 2007
नविन वर्ष... आता नाही म्हणता म्हणता नवीन वर्ष उजाडतय.... २००७ ने बरच काही हिसकावुन घेतल... बरीच नवीन वळण दाखवली... आयुष्य असही असत ह्याची जाणिव करुन दिली... या वर्षात खुप काही हरवल मी आयुष्यातल... माझी आई सुद्धा... पण नव्याने जगवायला लावणार २००८ समोर दत्त म्हणुन उभ आहे... काय गवसल आणी गमवल या विचारांपेक्षा आता काय करयच हे ह्याच वर्षात मी शिकले...या पुढे कधी हताश व्ह्यायच नाही हा येणार्या वर्षाचं रेझोल्युशन... या पुढे नवी स्वप्न नव्या दिशा स्वगतासाठी सज्ज झल्या आहेत... आकाशही निरभ्र पणे सज्ज होऊन माझ्या झेपेची वाट बघतय... ही नवी सुरुवात आहे नव्याने जगण्याची... नव्या वर्षाच स्वागत असो....
शनिवार, २२ डिसेंबर, २००७
हे हे हे..... :)
हे हे हे..... मी उद्या किंवा परवा पुण्यात येत आहे............... :) मनावरच मळभ निघुन गेलय... नुसत्या विचारांनी मन खुश होतय.... सही... खुप आनंद झालाय.. मन अचानक उड्या मारु लागलय.... तब्बल अडिच महिन्या नंतर माझ्या घरी जाणार मी...:)पवसाळ्यात कधी कधी खुप दाटुन येत... सगळ जग मरगळलेल वाटु लागत आणी..मग.. अचानक खुप दिवसानंतर सुर्यदेवाच दर्शन घडत... तसं काहीस वाटतय.... मी खरं सांगु मला कळत नाही मी काय लिहित आहे आणी का? पण खुप खुश आहे इतकच महिती आहे मनाला... सगळीच मरगळ निघुन गेली मनावरची... आता लक्ष ते पुण्याला जाणार्या गाडीवर... सो मित्र-मैत्रिणींनो भेटुया...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)