क्लेयर बाई.... आमच्या ऑफ़िस मध्ये ही परदेशी बाई (बाई मणजे वाचायला आणी ऐकायला ऑड वाटतं माहित आहे पण .. असो मला म्हणायच आहे) तर क्लेयर बाई वय वर्ष ३०-३२ असाव... निळे शार डोळे... आणी गोरा (का पांढरा म्हणावा?) असा रंग वजन म्हणजे आता अजुन जास्त खाल्ल तर फ़ुटेल अस वाटत...इतक... उंची पाच दोन असावी.... अश्या सुंदर तरुणीने एका भारतीय तरुणावर प्रेम केलं ... आणी इंग्रज जरी देश सोडुन निघुन गेले आणी आपला देश स्वातंत्र झाला... तरी त्या बिचार्या तरुणाने आपलं पारतंत्र अस ओढवुन घेतल... (अस म्हणतेय कारण तिची मर्जी सांभाळण खरंच कठीण आहे)... अश्या तर्हेने क्लेयर बाईंच आगमन भारतात..मुंबईत झालं आता ती आमच्या परदेशीय शाळेमध्ये व्यवस्थापनात आहे... मी जेव्हा तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला जरा दडपणच आल होत.. एक तर तिची भाषा आणी माझ इंग्रजीच ज्ञान.. म्हणजे जरा कठीणच होत.. त्यातुन ती बोलते त्याला आपण फ़ारफ़ार तर पुटपुटण म्हणु... इतक्या हळु आवाजात बोलायची तिला सवय... पण तरीही कसबस मला तिच बोलण समजु लागल...आणी आता आम्ही गप्पाही मारु लागलो... पण मध्येच दोन आठवडे बाई रजेवर ? काळलं नव्हत... मग दोन आठवड्यांनंतर बाई आल्या त्या गुड न्युज घेउन... तशी खबर आम्हाला आधीच मिळाली होती ;) .. पण तिला गोड बातमी सांगीतल्यावर नव्याने आंनद दाखवावा लागला होता... आम्ही डेरी मिल्क देउन त्यांच तोंड गोड केल... त्या नंतर मग मज्जा सुरु झाली ... काय खायच काय खायच नाही... हे मला जेवढ माहीत तेवढ तिला आज्जी बाईंसारख मी सांगीतल....मग झाल बाई रोज विचारु लागल्या काय खाउ ते? पण ह्या इंग्रजांना डोक जरा कमीच या बाबतीत... हा निष्कर्श निघाला.. कारण बाई उलट्या होतात म्हणुन स्प्राइटची अर्धा लिटर बाटली दिवसाला रिकाम्या करु लागल्या.. एकदा असच ती स्प्राईट विकत घेत असताना तिला म्हणाले हे चांगल नाही तुझ्या साठी तर तिने ड्युक्स ची बाटली उचलली याला आता काय म्हणावं ? तिला म्हणाले पी बाई स्प्राइट्च पी... सांगुन तसाही काहीच उपयोग नाही... पलथ्या घड्यावर पाणी... बाईंना डोहाळे कसली तर मॅगडॉनल्ड्चा चॉकलेट मिल्कशेक आणी पनीर सॅल्सा खायचा... चायनीज नुडल्स... आणी देव जाणे अजुन काय ते.... तिला सफ़रचंद व फ़ळ खायला आवडत नाहीत... फ़ास्ट फ़ूड जिव की प्राण... आधीच वाढता वाढता वाढे... एकटा जिव असेल तर ठीक आहे हो... पण...
आता उत्सुकता आहे ते ते कार्टुन कार्ट कसं निघेल याची कारण क्लेयरशी लग्न केल तो केरळचा मल्लु आहे... त्याच वर्णन करण्याची गरज नाही तुम्हाला कल्पना आलीच असेल... :) आता सहा महिन्यांनी काय तो निकाल लागेल... तो पर्यंत क्लेयर बाईंचे डोहाळे पुरवण्याची जवाबदारी ऑफ़ीशीयल नसली तरी ऑफ़ीस मध्ये माझीच... देव करो तिला सुबुध्दी मिळो...
सोमवार, १७ मार्च, २००८
बुधवार, ५ मार्च, २००८
बरस जा बादल...
बरस जा बादल
मेरे ही अंगना...
मुझे पानी पानी होने दे...
आखो से बरसती मेघा
और तुझमे कोइ फ़र्क सा ना रहे...
बरस जा बादल मेरे ही अंगना...
आज मन मे बोहोतसा बोझ है
फ़िर भी मन हलका है
ये अजिब कश्म्कश मे मुझे खोने ना दे
तेरी रुह मे मुझे समेट ले
बरस जा बादल मेरे ही अंगना....
...स्नेहा
पहिल्यांदाच हिंदीत लिहितेय... माहित नाही कशी झाली आहे. तुमच्या प्रतिसादाची उत्सुकता वाटतेय... आणी भितीही... खर सांगा जमली आहे का नाही ते..
मेरे ही अंगना...
मुझे पानी पानी होने दे...
आखो से बरसती मेघा
और तुझमे कोइ फ़र्क सा ना रहे...
बरस जा बादल मेरे ही अंगना...
आज मन मे बोहोतसा बोझ है
फ़िर भी मन हलका है
ये अजिब कश्म्कश मे मुझे खोने ना दे
तेरी रुह मे मुझे समेट ले
बरस जा बादल मेरे ही अंगना....
...स्नेहा
पहिल्यांदाच हिंदीत लिहितेय... माहित नाही कशी झाली आहे. तुमच्या प्रतिसादाची उत्सुकता वाटतेय... आणी भितीही... खर सांगा जमली आहे का नाही ते..
गुरुवार, २८ फेब्रुवारी, २००८
नाहि चिरा...नाहि पणती....
सौरभच नाहि चिरा...नाहि पणती.... वाचल आणी एकदम आठवल...मी १०वीत असतानाची गोष्ट आहे... करगील युध्द सुरु होत॥ शाळेत मग एक उपक्रम म्हुणुन आम्हा सगळ्यांना कोरे टपाल पत्र हातात दिली.. आणी सांगीतल की सैनिकांना पत्र लिहा.. सांगा आम्ही तुम्हाला विसरलो नाहीत... मला खरच नाही महीत इतर मुलींनी काय लिहल काय नाही.. पण मी खुप मनापासुन ते पत्र लिहल होत... नेमक काय लिहल हे नाहि आठवत.. पण लिहीताना डोळ्यात पाणी होत.. झाल.. ते पत्र कारगीलला जाउन पोहोचल... जशी सगळ्याची पत्र पोहचली... मग नंतर काही मुलींना त्या पत्राची उत्तर खुद्द सैनिकांकडुन आली... सगळी उत्तर औपचारीक होती... पण सैनिका कडुन पत्र? पेपरात छापुन सुध्धा आलेल.. मी जराशी हिरमुसले होते कारण माझ्या पत्राला कोणाचच उत्तर नव्हत मिळाल... तशि सगळ्यांना उत्तर नव्हती आली..पण.. तरीही... पण एक दिवस उजाडलाच पोस्टमन काकांनी मी शाळेत जाण्याच्या तयारीत असतानाच ते माझ्या हातात दिल... मला सुचतच नव्हत काय कराव... खुद्द एका सैनीकाने मला पत्र लिहल? काय असेल त्यात...? मग मी हळुवार्पणे ते आंतर्देशीय सैनिकी पत्र फोडल... आणी... पत्र वाचुन खुप भरुन आलेल...माझ पत्र कुण्या आर.के.पठानीया नावाच्या सैनिकाकडे पोहचल होत.. ते जणु माझ्याच पत्राची वाट बघत होते.. कारण ते बॉर्डरवर होते.. आणी पुढे वाचतील न वाचतील या शंकेत... त्यांच्या सख्या बहिणीच नाव होत स्नेहलता.. ते तिच्या पत्राची वाट बघत होते.. त्यांच्या सगळया अप्तिष्टांची पत्र त्यांना मिळाली होती फ़क्त बहिणीनेच पत्र पाठवल नव्हत आणी त्यांची ती लाडकी बहिण... पण ज्या वेळेस त्यांच्या हातात माझ पत्र पडल... त्यांना खुप समाधान मिळाल.. ते म्हणाले स्नेहा और स्नेहलता क्या फ़रक पडता है? त्यांनी त्या पत्रात बरच काही लिहल होत... पण सगळ्यातुन एकच जानवत होत ते म्हणजे त्यांना त्यांच्या बहिणीच पत्र मिळल याच समाधान.. मी सगळ नाही मंडु शकत... पण त्यांनी मला त्यॉहा पत्त आवर्जुन दिला होता... आणी बजावल होत... ये पत्त न किसीको देना अथवा फ़ाड देना... मला पत्राच उत्तर आल पण ते सगळ्यांपेक्शा वेगळ होत... माझ्या नकळत मला एक भाऊ मिळाला॥ तोही साधासुधा नाही तर सैनिक... त्या नंतर लगेचच राखी पौर्णीमा होती...मी राखी पाठवली... त्याचही उत्तर अगदि संक्षिप्त मिळाल॥ त्या मद्ये अस लिहल होत की ते मला ओवाळणी पाठवु शकत नाहीत कारण ते खुप वर होते॥ परतलो की पथवेन म्हणाले होते... पण अजुन मला माझी ओवळणी नाही मिळाली ना परत कुठल्याही पत्राच उत्तर...मी अजुन वाट बघतेय....
(मी पत्राबद्दल संक्षिप्तपणे नाही लिहु शकत॥ त्या बद्दल क्षमस्व।)
...स्नेहा
(मी पत्राबद्दल संक्षिप्तपणे नाही लिहु शकत॥ त्या बद्दल क्षमस्व।)
...स्नेहा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)